‘नवरंग’ म्हणजे हस्तकलेत निपुण असलेल्या कारागिरांची संजीवनी

0

‘मेक इन इंडिया’ अभियानानंतर सरकार ‘हँडमेड इन इंडिया’ कडे वाटचाल करत आहे. यासाठी एक व्यापक अशा हातमाग धोरणाचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. हा प्रस्ताव हातमाग, हस्तकला आणि खादी तसेच ग्रामीण उद्योगांदरम्यान सामंजस्य वाढवण्याचे काम करेल. या धोरणानुसार सिंगल ब्रँडद्वारे अशा प्रकारच्या सर्व वस्तूंची ई-कॉमर्सच्या माध्यमातून विक्री करण्याचे काम करेल.

हाताने तयार केलेल्या उत्पादनांची ( Handmade Products) मागणी पुन्हा वाढू लागली आहे. कमीतकमी मेट्रो शहरांमध्ये ‘हाय नेट वर्थ’ व्यक्तींची (HNWIs) संख्या वाढत आहे. या व्यक्ती चांगल्या प्रकारे तयार करण्यात आलेल्या हस्तकलेच्या वस्तू किंवा हातमागावर तयार केलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी अतिरिक्त खर्च करायला मागेपुढे पाहत नाहीत. ‘फॅबइंडिया’चे यश हे याचेच एक उदाहरण आहे. ग्रामीण भारतातील कुशल कारागिरांनी बनवलेल्या कपड्यांची विक्री एक चेन स्टोअर असलेले ‘फॅबइंडिया’ करते.

ही संकल्पना लक्षात घेत सोनल गुहा आणि राजर्षी गुहा यांनी ग्राहकांना हस्तरकलेद्वारे बनवलेल्या अस्सल (original)वस्तू उपलब्ध करण्याच्या उद्देशाने ‘नवरंग’ ही संकल्पना साकार केली. नवरंगचे सह-संस्थापक राजर्षी सांगतात, “ हस्तकलेद्वारे निर्मिती वस्तू आणि हातमागावर तयार करण्यात येणा-या उत्पादनांची उपलब्धता कमी झाली आहे. यासोबतच कुशल कारागीर देखील आश्चर्यकारकपणे कमी झाले आहेत. नकली उत्पादने मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. या कारणामुळे भारताची समृद्ध परंपरा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी ‘नवरंग’चा विचार पुढे आला.”

सोनल आणि राजर्षी यांनी आपल्या स्वत:च्या ताकदीवर नवरंग सुरू केले. दोघांनी सुरूवातीला २५ लाखांच्या प्राथमिक गुंतवणूकीद्वारे हा उपक्रम प्रत्यक्षात उतरवला. गुंतवणूकीची ही रक्कम विशेषत: उत्पादन उपलब्ध करणे, दिल्लीत एक कार्यालय सुरू करणे आणि वेबसाईट विकसित करण्यावर खर्च करण्यात आली. आत्तापर्यंत एखाद्या प्रवर्तकाच्या माध्यमातून काहीही फंड गोळा करण्यात आलेला नाही.

विशेष सेवा

नवरंग हे भारतात विविध भागांमधून विशेषत: पारंपारिक आणि हस्तकलेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या साड्या उपलब्ध करणारे पहिले आणि एकमेव पोर्टल आहे असा नवरंगचा दावा आहे.

नवरंगच्या सह-संस्थापिका सोनल गुहा सांगतात, “ आम्ही स्थानिक कारागिरांकडून उत्पादने मागवतो. याच अर्थ आम्ही पटियालाहून फुलकारिस आणि शांतीनिकेतनहून कांथा मागवतो. ज्यांची सरकार दरबारी नोंद झालेली आहे आणि जे हस्तकलेद्वारे आणि हातमागावर तयार करण्यात आलेली विश्वसनीय उत्पादने पुरवतात अशाच अधिकृत विणकर आणि कारागिरांची आम्ही सेवा घेतो. अशा प्रकारे आपण योग्य किंमतीवर असली ( original) उत्पादने मिळवू शकतो. ग्राहक अधिग्रहण आणि मार्केटिंगची किंमत कमी ठेवण्यात आली आहे. याद्वारे लवकरच आम्ही नफा कमावण्यायोग्य बनू शकू. इंटरनेट आणि कम्यूनिटी मार्केटिंगच्या माध्यमातून सुद्धा विक्री केली जाणार आहे.

नवरंग आणि इतर व्यासपीठांमध्ये काय फरक आहे असे विचारल्यानंतर राजर्षी सांगतात, की अधिकतर उपलब्ध व्यासपीठे बाजारपेठ मॉडेलला स्वीकारत आहेत. इतर व्यासपीठे विशेष हातमाग आणि हस्तकलेद्वारे तयार केलेले हँडिक्राफ्ट फॅब्रिक आयटम्सवर जोर देत नाहीत. इतकेच नाही, तर ते थेट कारागिरांकडून उत्पादन घेत नसल्यामुळे उत्पादनाच्या विश्वसनीयतेची काहीएक हमी नसते. नवरंग थेट सरकारी यादीत समाविष्ट असलेल्या विणकर आणि कारागिरांकडून उत्पादने मागवते. शिवाय नवरंग राष्ट्रीय पारितोषिक जिंकणारांवर विशेष लक्ष केंद्रीत करते.

सोनल गुहा सांगतात, “ भारतातील सर्व राज्यांत नवरंग उत्पादनांचा विस्तार करणे हा आमचा उद्देश आहे. सध्या आम्ही सात राज्यांमध्ये काम करत आहोत. या वर्षाच्या शेवटपर्यंत आम्ही आमच्या ग्राहकांना देशातील कोणत्याही राज्यातील कारागिरांच्या किंवा विणकरांच्या हातांनी बनवलेली आणि हस्तकलेद्वारे कलाकुसर केलेले कापड उत्पादने पोहोचवणार आहोत.”


आव्हानांचा सामना


मूळ, अस्सल ( ओरिजनल) आणि विश्वसनीय उत्पादने मिळवण्यासाठी नवरंग उपक्रमाला मध्यस्ताच्या हस्तक्षेपाचा सामना करावा लागतो. जिथे ख-या अर्थाने हस्तकलेचे काम होते अशा शहरांपासून अत्यंत दूर असणा-या गावांपर्यंत पोहोचणे देखील अतिशय आव्हानात्मक असते.

या व्यतिरिक्त ज्यांना चांगल्या प्रकारे फंडिंग होते अशा व्यासपीठांशी देखील नवरंगला सामना करावा लागतो. ही व्यासपीठे आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग करू शकतात. परंतु नवरंगचा संपूर्ण जोर विश्वसनीय हातमाग उत्पादने उपलब्ध करून देण्यावर आहे.


उद्योगासोबत उपक्रम देखील विकसित होत असतो


भारत हा हस्तकलेद्वारे विणलेल्या कापडाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. या व्यतिरिक्त हातमाग आणि हस्तकलेद्वारे विणकाम केलेल्या कापड निर्मितीबाबत जागृती वाढताना दिसत आहे. ही परिस्थिती एकप्रकारे विकासासाठी इंधन पुरवण्याचे काम करत आहे.

राजर्षी गुहा यांच्या मते देशाच्या अर्थव्यवस्थेत हातमाग क्षेत्राचे एक विशेष असे स्थान आहे. हे क्षेत्र एका पिढीपासून दुस-या पिढीकडे कौशल्याचे हस्तांतरण करत आल्यामुळे टिकलेले आहे. या क्षेत्राचा वेगळेपणा, उत्पादनातील लवचिकता, नाविण्यपूर्णता आणि पुरवठादाराच्या गरजेनुसार जुळवून घेण्याच्या क्षमतेबरोबर या क्षेत्राची समृद्धशाली परंपरा यातच या क्षेत्राचे बळ सामावलेले आहे. अनेक प्रकारचे धोरणात्मक निर्णय, क्लस्टर दृष्टीकोनासारख्या पद्धती, आक्रमक मार्केटिंग आणि समाज कल्याणासाठी घेतलेला पुढाकार या गोष्टी हातमाग क्षेत्रात होणा-या सकारात्मक वाढीसाठी कारणीभूत ठरल्या आहेत. यामुळे विणकरांच्या आर्थिक स्तरात देखील सुधारणा झाली आहे.

भारत सरकारने हातमाग आणि हस्तकलेद्वारे निर्मिती करण्यात आलेल्या आयटम्सना यंत्रमागाच्या माध्ममातून अनुकरण करण्यापासून वाचवण्यासाठी एक अध्यादेश पारीत केला आहे. या अध्यादेशाला ‘रिझर्वेशन आर्टिकल फॉर प्रोडक्शन अक्ट १९८५’ या नावाने ओळखले जाते. हस्तकलेद्वारे तयार करण्यात आलेल्या उत्पादनांना जे प्रोत्साहन देतात, अशा उपक्रमांना हा अध्यादेश विकासाची संधी उपलब्ध करून देतो.

राजर्षी सांगतात, “ हस्तकला आणि हातमागाद्वारे तयार करण्यात आलेल्या उत्पादनांना येणारी वाढती मागणी आणि बाजारात असलेल्या चांगल्या पुरवठादारांची कमतरता यामुळे नवरंग सारख्या उपक्रमांचे महत्त्व वाढले आहे. बाजाराच्या मागणीची पुर्तता करणे हे आमचे लक्ष आहे. वर्तमान परिस्थिती ही उद्योग आणि उपक्रम अशा दोन्हीच्या विकासाला मदत करेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories

Stories by sunil tambe