...आणि ३० मिनिटात निश्चित झाले भविष्य

...आणि ३० मिनिटात निश्चित झाले भविष्य

Wednesday October 28, 2015,

3 min Read

कोलकत्याचे रितेश सिंघानीया आणि समीक बिस्वास यांची एनआयटी, वारंगल महाविद्यालयात भेट झाली. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे महाविद्यालय निवडता यावे या साठी सल्ला देऊ शकेल अशी एक स्टार्टअप कंपनी सुरू करण्याच्या विचारात ते दोघे होते. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर दोघांनी बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी धरली. नोकरी करत असताना देखील त्यांनी आपली नवी कंपनी सुरू करण्याची कल्पना मुळीच सोडून दिली नाही. दरम्यानच्या काळात ‘कॅनन पार्टनर’चे राहुल खन्ना यांच्या सोबत ‘गुगल हँगआऊट’ने त्यांच्या नवी कंपनी सुरू करण्याच्या स्वप्नांना नवे पंख आणि आकार देण्याचे काम केले.

रितेश सांगतात, की राहूल खन्ना यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या त्या ३० मिनिटांनी गोष्टींकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोनच बदलून टाकला. ते म्हणतात, “ त्या ३० मिनिटांमध्ये आम्हाला आमच्या भविष्यातील नव्या कंपनीबाबत एक व्यापक दृष्टीकोन आणि दिशा मिळाली.” त्यानंतर त्यांनी त्यांचे तिसरे सह-संस्थापक असलेले गौरव मित्तल यांच्यासोबत हात मिळवणी केली. गौरव हे कंपनीच्या तांत्रिक बाजू सांभाळत होते. अशा प्रकारे सुरू झाला प्रॅक्लीचा (Pracly) प्रवास

'प्रॅक्ली' ही कंपनी म्हणजे उद्योजकांसाठी एक सल्ला देणारे व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून एखादा उद्योजक त्या क्षेत्रातील तज्ञांना फोन करून अथवा वन-टू-वन मुलाखतीद्वारे आपल्या समस्या सोडवून घेऊ शकतो. यात दोन्ही पक्षांचा फायदा आहे.

image


पहिला फायदा म्हणजे एक तर जे लोक तरूण उद्योजकांना मार्गदर्शन व्हावे या प्रयत्नांत असतात, अशा लोकांना विविध क्षेत्रातील तज्ञ लोकांसोबत बोलण्याची संधी मिळते. आणि दुसरा फायदा म्हणजे तज्ज्ञांना सुद्धा आपल्या वेळेचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे शक्य होते. शिवाय आपल्या अपॉईंटमेंटचे शेड्यूल निश्चित करणेही त्यांच्यासाठी अगदी सोपे होऊन जाते.

तिघांनी मिळून ‘प्रॅक्ली’ ही कंपनी सुरू तर केली, परंतु त्यांना आणखी चांगल्या संधींची गरज होती. रितेश सांगतात, “ आम्ही त्यावेळी कोलकत्याला होतो. ही जागा स्टार्टअप कंपनीसाठी फारशी अनुकूल नव्हती. मग आम्ही पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे आमची भेट विजय आनंद यांच्याशी झाली आणि आमची 'इन्क्युबेशन' कार्यक्रमासाठी निवडही झाली. 'इन्क्युबेटर'ची (इन्क्‍युबेटर म्हणजे उद्योजकता विकास संबंधी कार्यक्रम ) आम्हाला खूपच मदत झाली.”

'प्रॅक्ली' या कंपनीला नोव्हेंबर २०१३ मध्ये लाँच केले गेले. आज कंपनीच्या बोर्डावर २५ तज्ज्ञ आहेत. रितेश सांगतात, की ते आपल्या बोर्डावर असलेल्या तज्ज्ञांच्या संख्येत आणखी वाढ करण्याची योजना आखत आहेत. सुरूवातीला कंपनीचे उत्पादन मोफत आहे, परंतु पुढे एखाद्या तज्ज्ञां शी बोलायचे असेल किंवा मग त्यांची भेट घ्यायची असेल तर त्यासाठी फी द्यावी लागणार आहे.

रितेश सांगतात, की ज्यांना एखाद्या विशेष विषयात सहकार्याची गरज आहे असे पहिल्या पिढीचे उद्योजक मोठ्या प्रमाणात जोडले गेले आहेत. ज्यांना अद्ययावत तंत्रज्ञानही अवगत आहे. या कारणामुळे या क्षेत्रात प्राथमिक उत्पादन प्रमाणीकरण (इनिशीयल प्रोडक्ट व्हॅलिडेशन) चांगल्या पद्धतीने होते. आता परिणामांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर ‘प्रॅक्ली’च्या मॉडेलला अधिक चांगले आणि वेळेच्या मागणीनुसार तयार केले जाणार आहे.

रितेश सांगतात, की कल्पना प्रमाणीकरण( आयडिया व्हॅलिडेशन) , डिजिटल मार्केटिंग, एसईओ, अधिक चांगला विकास अशा विषयांवर मदतीचा शोध सर्वात जास्त घेतला जातो. अधिकाधिक ग्राहकांना कसे आकर्षित करावे हा सर्वात सामान्य ( कॉमन) प्रश्न असतो. आणि दुसरा सामान्य प्रश्न म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने एखादी कल्पना किती चांगली किंवा वाईट आहे हा असतो. यामध्ये आमचे हे व्यासपीठ एका संरक्षकाची (पालकत्वाची) भूमिका पार पाडत असते. रितेश सांगतात, “ ज्या तज्ज्ञांना कधी पाहिलेले नसते किंवा मग ऐकलेले नसते, अशा तज्ज्ञांकडून एखाद्या व्यासपीठावर जाऊन सल्ला घेण्याच्या कामात उद्योजक जरा कचरतात. पैसे देऊन सल्ला घेण्यासही ते कचरतात, मात्र ज्या लोकांनी आमच्या व्यासपीठाचा वापर केलेला आहे, अशा उद्योजकांना याचा खूप फायदा झालेला आहे.” आता इतर क्षेत्रात देखील अशाच प्रकारची सेवा उपलब्ध करून देण्याची प्रॅक्ली या कंपनीची योजना आहे.