या 'मॅन होल क्लिनर्स' आणि दुरुस्ती कामगारांना भेटा ज्यांनी नुकतीच दहावी शालांत परिक्षा उत्तिर्ण केली आहे!

या 'मॅन होल क्लिनर्स' आणि दुरुस्ती कामगारांना भेटा ज्यांनी नुकतीच दहावी शालांत परिक्षा उत्तिर्ण केली आहे!

Thursday June 22, 2017,

2 min Read

मिरॅकल-२३ च्या या चमूला भेटा, ज्यात २१ पुरुष आणि २ महिला आहेत ज्यांनी अनेक वर्षापासून शाळेबाहेर राहिल्यानंतर आता नुकतेच दहावी शालांत परिक्षेत यश मिळवले आहे. मुंबई महापालिकेत काम करणा-या चवथी उत्तिर्ण असलेल्या या झाडू कामगार, मॅनहोल सफाई कामगार, तसेच रस्ते आणि पाईपलाईन दुरूस्ती कामगार यांना महिन्याला दहा हजारपेक्षाही कमी उत्पन्न मिळते, दहावी उत्तिर्ण झाल्याने त्यांना पगारात तीन हजारांची वाढ मिळणार आहे.


image


नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या निकालात यांच्या यशावर प्रकाशझोत पडला, ते २३-५० या वयोगटात आहेत, सहायक महापालिका आयुक्त उदयकुमार शिरोडकर यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार डोंगरी येथील रात्रशाळेत करण्यात आला. निलेश सावंत ३७ यांनी ६२ टक्के गुण मिळवून शालांत परिक्षा उत्तिर्ण केली आहे. “ पुन्हा शालेत जाण्याची कल्पना न झेपणारीच होती, पण आमच्या सहायक आयुक्तांनीच पुढाकार घेतला आणि आमचे अर्ज भरून आम्हाला शक्य ती सारी मदत केली. काही पारंपारिक कामागारांनी विरोध केला ते यात सहभागी झाले नाहीत. पण आता ते चिंतेत आहेत. पुढच्या वर्षी आणखी शंभर जणांच्या चमूला ही परिक्षा देण्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे.” ते म्हणाले.

आयुक्त, ज्यांनी डोंगरी येथील महापालिका शाळेत भेट दिली, त्यांना वाटले की कामगारांनी जर पुन्हा शाळेत जावून शिक्षण घेतले तर त्यांचा फायदा होईल. ते म्हणाले की, “ माझ्या गाडीच्या चालकाच्या प्रवेशासाठी मी गेलो होतो, आणि लक्षात आले की, शाळा बंद पडत चालली आहे, कारण पुरेश्या प्रमाणात विद्यार्थीच नाहीत. त्यामुळे माझ्या प्रभागातील कामगारांना शिकण्यासाठी या शाळेत पाठविण्याचे मी ठरवले.”

२३ पुरूष कामगारांमध्ये दोन महिला, कल्पना जाधव (३२) आणि जयश्री कांबळे (३२) या रोज कामासाठी आणि शाळेसाठी डोंगरी येथे पनवेलहून येतात, जे ४४ कि.मी.चे अंतर आहे. याबाबतच्या वृत्तानुसार मासुम ट्रस्टने त्याच्यासाठी शिक्षणाचा आणि इतर खर्च प्रायोजित केला होता. मिरॅकल २३ च्या चमूने आता मिरॅकल १००चा संकल्प केला आहे. पुढच्या वर्षीच्या परिक्षेत त्यांनी त्यांच्या शंभर सहका-यांना दहावी शालांत परिक्षा उत्तिर्ण करण्याची तयारी केली आहे!