प्रामाणिक राजकारणी असलेल्या या माजी आमदाराला आज रस्त्यावर राहण्याची वेळ आली

0

कोणे ऐके काळी शिंगारा राम शाहूंगरा बहुजन समाज पक्षाचे आमदार (कायदेमंडळाचे सदस्य) होते. पण आज पंजाबमध्ये घरशंकर या शहरात कुटूंबासोबत रस्त्यावर राहण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.

भाड्याचे घर शोधेपर्यंत शाहूंगरा आणि त्यांच्या मुलांना पावसापासून बचाव करण्यासाठी ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. तर त्यांच्या पत्नीला पदपथाच्या बाजुला स्वयंपाकाची चुल पेटवावी लागली. जिच्या जवळ सोबत असलेल्या काही चिजवस्तु होत्या आणि त्यांना शेजा-यांचे प्रसाधनगृह वापरावे लागत होते. “ मला हे दिवस त्यामुळेच पहावे लागत आहेत की मी भ्रष्टाचार करण्यास नकार दिला” त्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार जरी ते अनुसूचीतजातीच्या समाजातून आले असले तरी, शाहूंगरा यांनी घरशंकर येथील सर्वसाधारण जागेवरून १९९२ आणि १९ ९७ मध्ये निवडणूक लढविली होती. “मला कांशीराम यांच्या कुटूंबियाकडून दूर ढकलण्यात आले जेंव्हा मी शेवटच्या दिवसांत त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता.”

सत्तेत असताना शाहूंगरा यांनी स्वत:साठी घर बांधावे असा कधीच विचार केला नाही. आणि आता ते वीस हजार रुपयांत भाड्याचे घर मिळते का याचा शोध घेतात जे त्यांना आमदारकीच्या सेवानिवृत्तीवेतनातून मिळतात. पाटबंधारे विभागाच्या जागेत ते बेकायदा राहात होते जेथून नुकतेच त्यांना राज्य सरकारने बाहेर काढले आहे.

“ मी कांशीराम यांच्या दलितांच्या सक्षमीकरणाच्या चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. आणि माझ्या आमदारकीच्या दोन कार्यकाळात मी कधी पैसा मिळवण्याचा प्रयत्न नाही केला” शांहूंगरा सांगतात. “ जेंव्हा मी आमदार होतो, त्यावेळी घर बांधावे इतका पगार नव्हता, आणि आता मी माझ्या निवृत्तीवेतनावरच निर्वाह करतो आहे. मी व्यवसाय सुरू करण्याचा विचारही कधीच केला नाही.” त्यांनी पुष्टी जोडली.

सौजन्य : थिंक चेंज इंडिया