शिक्षण अर्धवट सोडलेल्या उद्योजकाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून भारतातील ३% जनता करते करभरणा 

0
वर्ष होतं २०१० आणि अर्चित गुप्ता नुकतेच सन फ्रान्सिस्को वरून परतले होते. ते तिथे डेटा डॉमेन इंक या स्टार्टअपसाठी काम करत होते. या कंपनीला इएमसी या बहुराष्ट्रीय कंपनीने विकत घेतले तब्बल २.४ अब्ज डॉलर मध्ये ! आयआयटी गुवाहटीचा विद्यार्थी असणाऱ्या अर्चित यांनी या कंपनीत नोकरी मिळाली म्हणून विस्कॅन्सीन विद्यापीठातून आपल्या पीएचडीच्या अभ्यासाला चक्क तिलांजली दिली.

अर्चित यांचे वडील चार्टर्ड अकाउंटंट आहेत. अर्चित दिल्लीला त्यांच्या घरी परतल्यावर त्यांनी आपल्या वडिलांना कर भरताना जाव्या लागणाऱ्या दिव्याकडे लक्ष द्यायचं ठरवलं आणि इथेच त्यांना कर भरणा करण्यासाठी इ-फिलिंगची सुरुवात करावी अशी कल्पना सुचली. काही दिवसांनी त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि घराच्या गॅरेजमधून कामाला सुरुवात केली.

अर्चित यांची मार्गदर्शक सूचना अत्यंत साधी होती ' लोकांच्या करांमध्ये चुका करायच्या नाहीत' आणि त्यामुळे आज पाच वर्षानंतर सुद्धा त्यांच्या 'क्लियर टॅक्स' या त्यांच्या उपक्रमात आजही हे विधान मार्गदर्शक तत्व म्हणून वापरलं जात आहे. मार्च २०११ मध्ये त्यांनी क्लियर टॅक्सची सुरुवात केली आणि १० दिवसांच्या आत त्यांना तब्बल १००० लोकांनी विनंती केली ज्यांना या माध्यमाद्वारे करभरणा करणं आवडणारं होतं आणि हे पुढे मिळणाऱ्या यशाचं द्योतक होत. अर्चित यांना मदत होतेय ती अंकित सोलंकी आणि श्रीवास्तन चारी यांची. ज्यांना ते हॅकाथोन( संगणकीय तज्ज्ञांसाठी होणारा कार्यक्रम ) मध्ये भेटले होते. हा कार्यक्रम त्यांनी सप्टेंबर २०११ मध्ये पेटिएमसाठी राबवला होता.

करभरणा प्रक्रिया सोपी करणे

क्लियर टॅक्सेस लोकांना त्यांचे कर भरण्यासाठी तयार  करते. वापरकर्त्यांना त्यांचा अर्ज क्रमांक १६ इथे सादर करायचा असतो आणि ज्यामुळे क्लियर टॅक्सला हवी असणारी माहिती आपोआप मिळते. यामुळे वापरकर्त्याना प्रत्येकवेळी स्वत:ची माहिती भरण्याच्या किचकट कामातून सुटका मिळते.

त्याहीपुढे, क्लियरटॅक्सच्या अनोख्या वैशिष्ट्यामुळे सरकारी करभरणा वेबसाईटला टक्कर देणं त्यांना सोप जातं. यामध्ये प्रत्येक वापरकर्त्याला लागतात अवघे १२ मिनिटं. आपला करभरणा करण्यासाठी पूर्वापार पद्धतीत याचसाठी दोन तास लागत असतं. तसंच या माध्यमामध्ये लोकांना कर तज्ज्ञ, सीए यांची मदत सुद्धा मिळते.

क्लियर टॅक्स ६०० ते १३,००० पर्यंत शुल्क आकारतं, तज्ज्ञांची मदत घ्यायची असेल तर  ही किंमत कर भरण्याच्या गुंतागुंतीनुसार वाढत जाते. अर्चित म्हणतात ."क्लियरटॅक्स मध्ये वापरकर्त्यांसाठी संवाद साधण्याची सुद्धा सोय आहे जेणेकरून त्यांच्या करभरणा प्रक्रियेत अडचण येऊ नये."

मग सरकारी टॅक्स भरणा वेबसाईट आणि क्लियरटॅक्स मध्ये नेमका काय फरक आहे ?

क्लियर टॅक्समध्ये वित्तीय तुटीची आकडेमोड मांडून पुढल्या वर्षीची तजवीज केली जाते आणि त्यामुळे कोणतीही आकडेमोड न करता निव्वळ खरेदी किंवा विक्री केलेल्या किंमती आणि तारखा हेच नमूद करणं महत्त्वाचं असतं.

क्लियर टॅक्सचा दावा आहे की भारतातील ३% लोक (३.४ करोड कर भरणाऱ्या लोकांपैकी सुमारे १० लाख ) त्यांच्या माध्यमाचा वापर करतात. त्याचबरोबर या फर्ममध्ये १०,००० सीए आणि तज्ज्ञांचा समावेश आहे. यातील ७०% वापरकर्ते हे मोठमोठ्या शहरातले आहेत.

त्याचबरोबर  क्लियर टॅक्सच्या संस्थापकांचा दावा आहे की त्यांचं माध्यम हे असं एकमेव माध्यम आहे ज्यामध्ये टॅक्स ऑन क्लाउड ही प्रणाली वापरण्यात येते आहे .(या प्रणालीमध्ये वापरकर्त्यांना वेबमध्ये असणारे अॅप्लिकेशन्स आणि सर्वर सर्विसेस वापरता येतात, बाहेरून सॉफ़्टवेयर विकत घेऊन वापरण्यापेक्षा ) ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जगातील कोणत्याही कोपऱ्यातून कर भरण्यासाठी सोपा उपाय मिळतो.

व्यवसायासाठी कर


त्यांची फर्मचे आॅन डिमांड साॅफ़्टवेयर असल्याने, कापल्या जाणारया टीडीएसची स्पष्ट कल्पना येते ज्यामुळे व्यावसायिकांना आपले टीडीएस परतावा अर्ज भरता येतात आणि पंधरवड्यात त्यानं परत देखील मिळतात. आजपर्यंत छोट्या आणि मोठ्या अशा सुमारे ५००० कंपनी क्लियर टॅक्सचं साॅफ़्टवेयर वापरत आहेत.

प्रत्येक ग्राहकाचा व्यवसाय बघून आणि कर भरणा पद्धतीच्या गुंतागुंतीवर फर्मच्या सेवेची किंमत अवलंबून आहे. या व्यतिरिक्त हे सॉफ़्टवेयर प्रमाणिकरणाच्या सेवेसाठी ( उदा: पॅन कार्ड )त्याचबरोबर कर वाचवण्यासाठी पे-पॅकेज ऑप्टीमायसेशन सारख्या सेवांसाठी दक्षता विभाग म्हणून काम करते. या सॉफ़्टवेयरची किमत २,७०० पासून तब्बल ४५,००० रुपयांपर्यंत आहे.

करांसाठी तंत्रज्ञान

मालकीतत्वाचं तंत्रज्ञान असल्यानं या माध्यमास डिस्ट्रीब्युटेड पद्धतीचं म्हणजे वितरीत पद्धतीचं सहाय्य मिळालं आहे. (डिस्ट्रीब्युटेड म्हणजे अनेक स्वायत्त संगणकांचं एकत्रित नेटवर्क आणि विविध सॉफ्टवेयर एकत्र एकाच छत्राखाली मिळणं. याचा अर्थ या सॉफ़्ट्वेयरमुळे संगणकांद्वारे त्यांच्या कार्यपद्धतीचा समन्वय साधता येतो आणि हार्डवेयर,सॉफ़्टवेयर आणि डेटा या सर्वांचे स्त्रोत वापरता येतात.) आणि याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे या सॉफ्टवेयरला क्लाउड प्रणाली मध्ये सुद्धा उच्च श्रेणी मिळू शकते.

या प्रणालीमध्ये तीन वेळा परीक्षण केले जाते. सर्व प्रथम कर विभाग वापरकर्त्यांना सूचना पाठवणार  असल्याचे निदर्शनास आल्यास वापरकर्त्यांना त्याबद्दल सावध करणे. दुसरं म्हणजे तुलना करणे, सरकारी निर्देशानुसार कर भरणा केला जात आहे की नाही याची तुलना आणि पडताळणी करणे. तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे एखाद्या वापरकर्त्यांच्या कर भरणा पद्धतीत काही खोटं आढळल्यास क्लियर टॅक्स या वापरकर्त्यांना मदत करावी किंवा नाही याचा निर्णय घेते. सध्या फर्म ही यांत्रिक शिकवणीवर भर देत आहे, ज्यामुळे इनवाॅईसिंग आणि माहिती काढणे आदी प्रक्रिया स्वयंचलित करता येणार आहेत.

२०१४ मध्ये ही कंपनी अमेरिकेतल्या वाय काॅम्बिनेटर या सिड एक्सलेटर (स्टार्टअप कंपन्यांना आर्थिक साहाय्य आणि अन्य मदत करणाऱ्या कंपन्या )मधली पहिली भारतीय कंपनी बनली.


भविष्यातलं टॅक्सिंग


अर्चित सांगतात की आता आगामी काळात म्हणजेच येत्या आर्थिक वर्षात क्लियर टॅक्सचं उद्दिष्ट्य आहे ते म्हणजे एक लाख व्यवसाय आणि ५० लाख ग्राहकांसोबत काम करणे. त्याचबरोबर टॅक्स वाचवण्याच्या पद्धती या क्षेत्रात सुद्धा उतरण्याची तयारी फर्मने चालवली असल्याची माहिती अर्चित देतात.

काहीच दिवसांपूर्वी या कंपनीत फ्लिपकार्टच्या तीन माजी मुख्य सदस्यांचा समावेश झाला असल्याचं जाहीर केलं. प्रशांत नायर( संचालक, पूर्तता विभाग, फ्लिपकार्ट), जय संतोष (फ्लिपकार्ट लाईट ) आणि आकाश बापना (फ्लिपकार्ट्चे मुळ कर्मचारी ). प्रशांत हे इथे अभियांत्रिकी विभागाचं नेतृत्व करतील तर जय आणि आकाश नवनवीन व्यवसायाच्या शाखा आणि ग्राहक व्यवसायाचा भाग सांभाळतील.

कर भरणा हा तसा अत्यंत खाजगी मर्यादित विभाग आहे. 'मेकयुवरटॅक्स डॉट कॉम' आणि 'टॅक्स मंत्रा' सारख्या कंपनी सुद्धा या विभागात कार्यरत आहे. त्यामुळे या कंपन्या वित्तीय सल्लागार या भूमिकेकडे वळतील किंवा स्वत:च्या कार्यपद्धतीला अधिक सक्षम करतील तर दुसरीकडे क्लियर टॅक्स हे स्वत:चं आखलेलं धोरण राबवत आहे. पण नव्याने सुरु होत राहणाऱ्या स्टार्टअप कंपन्या लाखभर रुपये लेखापरीक्षणासाठी आणि आयकर भरण्यासाठी द्यायला तयार आहेत तोपर्यंत ही एक व्यवसायाची संधी उपलब्ध असणार आहे. तरीसुद्धा या मर्यादित  विभागात क्लियर टॅक्स आपला दर्जा कसा उंचावेल याकडे लक्ष देणं अत्यंत रोचक ठरणार आहे.

वेबसाईट -  www.cleartax.in

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

रॉनी स्क्रूवाला यांच्या सहाय्याने भारतातील विमा क्षेत्र सुलभ करण्याचे 'ईझी पॉलिसी'चे लक्ष्य
प्रतिमाह ३०० दशलक्ष वापरकर्ते असणारे 'वेबएन्गेज'
‘सेव्हऑनमेडीकल्स’- वैद्यकीय खर्चातील बचतीसाठी मदत करणारे विशेष माध्यम

लेखक : तरुष भल्ला
अनुवाद : प्रेरणा भराडे