डिजीटायझेशनच्या काळातील ‘डिजीटल’ लेखक दिव्य प्रकाश दुबे!

0

दिव्य प्रकाश दुबे यांची आठवण आली की, नव्या प्रकारचे हिंदी मनात धावू लागते. आता हे नव्या प्रकारचे हिंदी काय आहे आणि लोक त्यांना डिजीटल लेखक का म्हणतात जाणून घेवूया दिव्य प्रकाश दुबे यांनी युवर स्टोरीला दिलेल्या या मुलाखतीमधून.

ज्या लोकांना वाटते की आता हिंदी संपत चालली आहे, त्यांनी एकदा नव्या प्रकारची हिंदी स्टाईलमध्ये लिहिणा-या दिव्य प्रकाश दुबे यांना भेटावे. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. आणि भेटणे शक्य नसेल तर टर्मस ऍण्ड कंडीशन पासून मुसाफिर कँफे पर्यंतच्या वाचना नंतर तॆ विचार करण्यास विवश होतील की यात हिंदी कुठेच गेली नाही उलटपक्षी नव्या प्रकारे पुनरुज्जिवीत झाली आहे. काळाच्या मागणीनुसार अनेक प्रकारच्या बोलीतून जात असताना हिंदीचे एक नवे रुप आमच्या समोर सादर केले  आणि हिंदी भाषेला विलीन  होताना वाचविले कारण भाषा बदलली नाही तिची शैली बदलली आहे.


“ चांगली हिंदी तोच लिहू शकतो, ज्याने इंग्रजी चांगल्या प्रकारे वाचली आहे कारण चांगले लिहिता येण्यासाठी जगातील चांगल्या साहित्याचा अभ्यास हवा, त्यामुळे लोकांना हे सांगा की चांगली हिंदी तेच लिहू शकतात, ज्यांना इंग्रजी येत नाही, काही तरी विचित्र होवून जाते!”

नेहमीच लोकांना माहिती हवी असते की, नव्या पध्दतीची हिंदी काय आहे? तर मी सांगण्यासाठी म्हणतो की, हा काही नवा प्रयोग नाही, परंतु  ही तिच हिंदी आहे जी बोली भाषा आहे. त्यात कोणतीही औपचारिकता नाही. दिव्य यांच्या शब्दात दोस्ती- यारी वाली हिंदीच नवी हिंदी आहे.

ते सांगतात की, इंग्रजीत एक शब्द आहे इंटिमसी ज्याला आपण हिंदीमध्ये ‘अंतरंग हो जाना’ म्हणतो. कोणत्याही नात्यात किंवा जाणिवेत रमणे त्याचवेळी शक्य होते ज्यावेळी त्या दोन भावनांच्या औपचारिकतेमधून आपण दूर होतो. आणि हिंदीत त्या औपचारिकेपासून दूर जाण्याचे नावच नव्या प्रकारची हिंदी असे आहे. त्यावेळी हिंदी एक भाषा न राहता मित्र होवून जाते.तेंव्हा ती नव्या प्रकारची हिंदी असते.


आपण आपल्या आजूबाजूला असे लोक पाहिले असतील जे हिंदीतील वजनदार आणि क्लिष्ट शब्द ऐकून आपले डोके पकडून म्हणत असतील की, “ हिंदी माझ्या कामाची नाही”. परंतू दिव्य प्रकाश हिंदीला कूल म्हणतात. अनेक लोक दिव्यला हिंदीचा चेतन भगत म्हणतात, ज्यावर दिव्य यांना तीव्र आक्षेप आहे. ते म्हणतात की, “ मी दिव्य प्रकाश दुबे आहे, मी हिंदी लेखक आहे, मला कुणा इंग्रजीच्या लेखकाशी तुलना करणे योग्य नाही. मला माझी ओळख आहे”. अलिकडे हिंदी लिहिणारे केवळ हिंदीचे प्राध्यापक आणि पत्रकारच नाहीत तर अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाचे शिक्षण घेवून आलेले इंग्रजी नोकरी करणारेही तरूण आहेत, ज्यांनी हरवत जाणा-या हिंदीला नवी ओळख दिली आहे. दिव्य यांना वाचणारा एक खास वर्ग आहे. त्यांना दिव्य यांचे नवे पुस्तक कधी येते याची वाट पहायची असते. दिव्य असे लेखक आहेत ज्यांच्या पुस्तकाला वाचकांच्या मनात आणि चांगली कमाई करणा-या पुस्तकांच्या बाजारात दोन्हीकडे जागा असते. ते नेहमीच ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्या साइटवर बेस्ट सेलरच्या यादीत असतात. हिंदी दुनिया आणि लेखनाला आपण काय देता असे विचारता ते म्हणतात की, “ पुन्हा एकदा हिंदी लोकांना आवडू लागली आहे, आता हिंदी ती हिंदी राहिली नाही, जी दबून एका बाजूला राहील. तर हिंदीत लेखन करणारे लेखक आपली ओळख बनविण्यासोबतच चांगला पैसा देखील मिळवत आहेत. आणि मला आशा आहे की लवकरच हिंदी लेखक इतकी चांगली कमाई करु शकतील की आपल्या लिखाणाच्या भरवश्यावर त्यांना चांगले आयुष्य घालविता येईल. मी सुरुवात याच आशेने केली होती.

“ मी मार्केटिंगचा माणूस आहे त्यामुळे आपले उत्पादन कसे विकावे मला माहिती आहे. खरेतर पुस्तके उत्पादन असू शकत नाहीत मनातील चांगल्या भाव भावना असतात, ज्याला लेखक शब्दात बध्द करण्याचा गुन्हेगारी प्रयत्न करत असतात.” दिव्य यांचा कोणताही लेखक पार्श्वभुमीशी संबंध नाही, त्यांच्या परिवारात वाचणारे खूप आहेत आणि लिहिणारे ते एकमात्र आहेत. पुस्तके त्यांना वारश्याने मिळाली मात्र लिखाणाचा वारसा त्यांना मिळाला नाही. तरीही त्यांना हे चांगले माहिती आहे की, तंत्राचा फायदा घेत चांगले पुस्तक लोकांपर्यंत कसे देता येईल. शब्दांशी खेळणे त्यांना चांगले जमते. अनेक लोक त्यांना डिजीटल लेखक देखील म्हणतात. कारण फेसबूक पासून मोबाईल ऍप पर्यंत यू ट्यूब पासून ऑनलाइन पुस्तक खरेदी पर्यंत सर्वत्र दिव्य यांनी नवे प्रयोग केले आहेत. जे त्यांच्या आधी कुणी केले नाहीत. दिव्य आपले पुस्तक बाजारात ेयेण्यापूर्वी  यू ट्यूब व्हिडिओ प्रदर्शन करतात हा अनोखा प्रयोग हिंदीत प्रथमच झाला आहे.

डिजीटायझेशनच्या युगातील डिजीटल लेखक या संज्ञेबाबत ते म्हणतात की, “ मी जसे लिहितो  आहे तसेच लिहितो, परंतू केवळ डिजीटलचा काळ आला आहे आणि मी डिजीटायझेशनच्या काळातील डिजीटल लेखक झालो. मी मार्केटींगचा माणूस असल्याने माझ्या पुस्तकाच्या प्रचार प्रसाराचा प्रयत्न करतो ज्यात समूह संपर्क माध्यमातून मोठा हातभार लागला जी जत्रेतील दुकानासारखी आहेत.”

दिव्य यांना वाचणारे सर्व लोक जाणून आहेत, मात्र हिंदी वाचणा-या सर्वाना हे माहिती असायला हवे की, दिव्य ते लेखक आहेत ज्याचे पुस्तक भटक्यांचा कँफे ‘इंग्लिश पब्लिशर वेस्लँन्ड’ मध्ये छापले गेले आहे, वेस्ट लँण्डने पहिल्यांदाच एखादे हिंदी पुस्तक छापले आहे. आता पर्यत तेथे केवळ इंग्रजी पुस्तके होती, मात्र दिव्य प्रकाश दुबे यांच्या सारख्या हिंदीच्या जिद्दी लेखकाच्या चाहत्या वर्गात होणारी वाढ पाहून वेस्ट लँण्डला हिंदीतही आपला बाजार दिसला असावा आणि त्यांनी पहिल्यादा इंग्रजी खेरीज अन्य भाषेतील पुस्तक छापण्याचा निर्णय घेतला. आता पर्यंत टर्म्स एंड कंडीशन, मसाला चाय आणि मुसाफिर कैफे ही तीन पुस्तके छापण्यात आली आहेत ज्याना लोकांची पसंती मिळाली आहे. ही बेस्ट सेलर ठरली, मसाला चाय दिव्य यांचे दुसरे बेस्टसेलर होते. मुसाफिर कँफेची दहा दिवसात पाच हजार पर्यंत विक्री झाली.

दिव्य यांच्या कहाण्या वाचताना असे वाटते की त्या प्रत्यक्षात घडलेल्या असो किंवा नसो त्या त्यांच्या जीवनात घडलेल्या असाव्यात आणि हिच एका चांगल्या लेखकाची ओळख आहे की तो आपल्या कहाणीतील पात्रांच्या जीवनात इतका घुसायला हवा की, तो त्यांच्यासारखाच वाटायला लागला पाहिजे. हेच त्यांच्या जीवनाचे बारकावे आणि पात्रांवरचे प्रेम आहे. दिव्य नव्या हिंदीतील शब्दप्रयोग करताना कठीण शब्दां ऐवजी सोपे शब्द वापरतात जेणे करून त्यांचे शब्द आजच्या ‘हिंग्लिश’ वाचकांना भावतात आणि जसे की ते स्वत:देखील त्याच प्रकारचे आहेत.

“ जीवना बाबत योजना मोठ्या नाहीत, तर सोप्या असायला हव्या योजना मोठ्या असतील तर जीवन छोटे होण्याची शक्यता असते, त्यामुळे माझ्या जीवनाची एकच योजना आहे प्रत्येक वर्षी केवळ एक नवे पुस्तक. हिंदीशी खेळणे मला वाटते की जसे मी माझ्या गावी परत जातो आहे, शहरात सर्व काही आहे मात्र शांती मात्र गावातच मिळते तीच शांती मला माझ्या हिंदीतही मिळते.”

दिव्य प्रकाश जे लिहितात, ते वाचताना वाटत नाही की आपण काही लिहिलेले वाचत आहोत. तर लेखक आपल्या वाचकांशी संवाद साधतो आहे असा भास होतो. त्यांच्य़ा लेखन आणि बोली या मधील शैलीत काहीच फरक नाही, किंवा असेही म्हणता येईल की त्यांच्या लेखनाची काही शैलीच नाही. त्यांचा वेगळाच साचा आहे, जो त्यांच्या वाचकांना आवडला आहे. त्यांचे समीक्षक भलेही त्याच्या शैलीचा विरोध करत असले तरी त्यांच्या वाचकाला त्याच्या कहाणीत स्वत:चा शोध घ्यायचा असतो.

येत्या काळात दिव्य हिंदीसोबत अनेक नवे प्रयोग करणार आहेत, त्या सोबतच त्यानी आपल्या निवृत्तीच्या दिवसासाठी काही योजना बनविल्या आहेत. दिव्य यांना भविष्यात मुलांसाठी देखील लिहायचे आहे. “अजून मी इतका परिपक्व नाही की मुलांसाठी लिहू शकेन परंतू भविष्यात नक्की यावर काम करेन”

“समूह माध्यमाने आमच्या जीवनातील ती पाने उघडून दिली आहेत जी कुण्या काळात आमच्या रफ रजिस्टर मध्ये होती”

अलिकडे दिव्य यांनी एक नवे काम सुरु केले आहे. ऐकण्यात आले आहे की ते कथा कथन देखील करु लागले आहेत. उडिशाहून सुहानी यांनी सांगितले की आज दिव्य प्रकाश यांचे कथा कथन आहे, त्यानंतर पाच दिवसांनी अहमदाबाद येथून रोहन यांनी सांगितले की, दिव्य यांचे कथाकथन भन्नाट असते. बिगर हिंदी पट्ट्यातल्या लोकांत त्यांच्या कथाकथनाची चर्चा आहे. त्यामुळे हिंदीच्या वाचकांनी  हा आनंद साजरा करायला हवा की, लवकरच हिंदी पुस्तके त्यांच्याही हातात येतील ज्यांना हिंदीचा ‘क’ ‘ख’ ‘ग’ देखील माहित नाही, दिव्य यांना वाचण्यासाठी तरी हिंदी शिकावीच लागते, कारण ते इंग्रजीत लिहीत नाहीत.

दिव्य यांचे स्वप्न आहे की, हिंदी पुस्तके इंग्रजी वाचकांच्या हाती असावीत आणि ते वाट पाहतात त्याच दिवसांची ज्यावेळी टाईम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर कुण्या हिंदी पुस्तकाची जाहीरात असेल, मग ते पुस्तक दिव्य यांचे असेल किंवा कुण्या अन्य लेखकांचे.

ज्यांची मातृभाषा हिंदी आहे, परंतू त्यांना हिंदी लिहीणे आणि बोलणे यांची लाज वाटते त्यांना दिव्य शेवटी H. Jackson Brown Jr. यांच्या या शब्दामध्ये सांगू इच्छितात की, 

"Never make fun of someone who speaks broken English. It means they know another language.

(जे कुणी मोडकी-तोडकी इंग्रजी बोलतात त्यांची मस्करी करु नका, याचा अर्थ त्यांना इतरही भाषा येते)  

लेखिका - रंजना त्रिपाठी