स्टँडअप इंडिया अभियानाला धडाक्यात सुरुवात...

स्टँडअप इंडिया अभियानाला धडाक्यात सुरुवात...

Tuesday April 05, 2016,

2 min Read

देशातल्या तळागाळातल्या समाजात उद्योजकता वाढण्यासाठी केंद्र सरकारनं स्टँडअप इंडिया अभियानाला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात करण्यात आली. हे अभियान अनुसुचित जाती आणि जमाती, आदिवासी आणि या समाजातल्या माहिलांसाठी एक सुवर्ण संधी असल्याचं म्हटलं जातंय. या अभियानाचं औचित्यसाधून मुद्रा योजना अंतर्गत १०० इ- रिक्षांचं वाटपही करण्यात आलं. 

image


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात त्यांनी या अभियानाच्या जमेच्या बाजू स्पष्ट केल्या. ते म्हणाले ” आत्तापर्यंत फक्त राबणारे हात नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध करु शकतील. आजवर दुर्लक्षित राहिलेल्या समाजातल्या तरुणांनाही मुख्यप्रवाहात येण्यासाठीची एक चांगली संधी आहे. जास्तीत जास्त तरुणांनी यात सहभागी व्हावं आणि आपल्या समाजाबरोबर भारतालाही पुढे न्यावं” 

image


स्टॅंडअप इंडिया अभियानाअंतर्गंत अनुसुचित जाती, जमाती आणि महिलांना विशेष योजने अंतर्गत व्यवसायासाठी अर्थसहाय्य देण्याची तरतूद करण्यात आलीय. जेणेकरुन त्याच्यामध्ये उद्योजकता वाढीला लागेल. हे अर्थसहाय्य कर्ज रुपात मिळेल. त्यांना दहा लाख ते एक कोटी रुपयांचं कर्ज मिळू शकेल. या अभियानाअंतर्गत एक खिडकी योजनाही राबवण्यात येणार आहे. जेणेकरुन कमीत कमीत कागदपत्रांच्या बदल्यात सरकारी बँकांद्वारे या समाजातल्या नव्या उद्योजकांना तातडीनं कर्ज मिळू शकेल. शिवाय लोन देण्यापूर्वी या उद्योजकांचं त्या त्या क्षेत्रातलं प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. यामुळे सर्वांगिण विकास साधता येईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटतो आहे. 

image


स्टॅंडअप इंडिया अभियानाचं डिक्कीनं स्वागत केलंय. डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या मते “ केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यात उद्योजकांना चालना मिळावी दोन महत्त्वाच्या मोहिमा जाहीर केल्यात. पहिली स्टार्टअप इंडिया, या द्वारे नव्या उद्योजकांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करण्यात आल्या. तर दूसरं आज सुरु झालेलं स्टॅंडअप इंडिया अभियान. स्टार्टअप आणि स्टॅंडअपमध्ये खूप फरक आहे. स्टँडअपद्वारे तळागाळातले उद्योजक ज्यांच्यापर्यंत शिक्षणही पोचलं नव्हतं. अश्या समाजातल्या उद्योजकांना संधी मिळणं. त्यांना मुख्यप्रवाहात येण्याची संधी मिळणं आणि त्यांना नोकरी करणाऱ्यांपासून नोकरी देणारे बनवणं, यामुळे हा समाज पुढे जाईल आणि हा समाज पुढे गेला की देशही आपोआप पुढे जाईल” 

image


स्टँडअप अभियानाअंतर्गंत जास्तीत जास्त दलित युवकांनी उद्योगाचे प्रस्ताव घेऊन पुढे यावेत यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. डिक्की या उद्योजकांना मार्गदर्शनही करणार आहे. जेणेकरुन अधिकाधिक तरुण या अभियानाचा फायदा घेऊ शकतील.