तुमची आवड जपा आणि गुंतवणूकदारांसाठी उद्योग उभारू नका: शैलेंद्र सिंग

तुमची आवड जपा आणि गुंतवणूकदारांसाठी उद्योग उभारू नका: शैलेंद्र सिंग

Sunday October 02, 2016,

2 min Read

हिवाळा दरवर्षी येतो आणि जातो आणि त्यात नवीन असे काहीच नाही. तसेच जर तुम्ही स्टार्टअपच्या पर्यावरणाशी संबंध ठेवत असाल तर तुम्ही बहुदा मागील हिवाळ्यातील वातावरणाशी तुलना करता. त्याच्या शेवटी सुरू होणा-या उन्हाळ्याच्या प्रारंभी हिवाळ्याच्या गोष्टी बाजुला पडतात. हिवाळा बहुतांश कोरडा काळ असतो ज्यावेळी तेथे गुंतवणूकीच्या बाबतीत सारे काही मंद असते. परिणामस्वरूप अनेक नवउद्योग मरणपंथाला लागतात आणि काही मरतातसुध्दा.

image


टेकस्पार्क२०१६मध्ये हिवाळ्याबद्दल बोलताना शैलेंद्र सिंग व्यवस्थापकीय भागीदार, सेक्वाया कॅपिटल म्हणाले की,

"हिवाळ्याची मौज लुटा. हा वेगळाच ऋतु आहे. गेल्या वेळच्या हिवाळ्यापेक्षा कंपन्या चांगल्या स्थितीत आहेत. जर आपण गेल्या वर्षीच्या हिवाळ्यातील स्थितीशी तुलना करत असू यावेळी स्टार्टअपची तयारी चांगली झाली आहे. मागील वर्षी कंपन्या होरपळत होत्या आणि भांडवली गुंतवणूक करूनही बाजारपेठा ग्राहकांच्या प्रतिसादासाठी तरसत होत्या, पण आम्हाला अशी स्थिती यंदा दिसली नाही."

जेंव्हा विचारणा केली की कोणत्या क्षेत्रात यंदा जास्त चांगली स्थिती दिसते. शैलेंद्र यांनी पुढे सांगितले की, उद्यमी स्टार्टअपच्या बाबतीत उत्साहच दाखवणार नाहीत जर कोणते चांगले आणि कोणते नाही सांगितले तर. फिनटेक यंदा चांगली कामगिरी करेल असे वाटते, पण फ्रिचार्ज,मोबिकविक आणि पेटीयम यांनी त्यांच्या ब-याच काळापासूनच्या प्रतिक्षेनंतर शुभवर्तमान घेऊन येण्याची शक्यता आहे.

स्टार्टअप यशाचा लघुदृष्टीकोन ठेवून वाटचाल करतात आणि भांडवल तसेच प्राप्त मुल्यांकनांच्या मापदंडाच्या आधारे काम करतात. परंतू शैलेंद्र यांनी याला जोरदारपणे फेटाळून लावले. “ विसंगती ही आहे की, भारतामधील अनेक कंपन्या या लाभकारक आहेत आणि त्यांची वृध्दी चांगल्या गतीने होत आहे. असे असूनही माध्यमातून त्यांच्याकडे त्या दृष्टीने पाहिले जात नाही जेंव्हा ते त्यांच्या गुंतवणूकीबाबतच्या बातम्या देतात.” त्यांनी लक्षात आणून दिले की, अशा कंपन्या त्यांच्या उपलब्धीबाबत सांगत नाहीत, आणि माध्यमांनाही त्यांचा गौरव करणे आवडत नसावे”.

जागतिक गुंतवणुकीसाठी भारतात खूप संधी आहेत, परंतू काहीजण या बाजारपेठेच्या खोलात जाऊन प्रश्न उपस्थित करतात. काही माध्यमांच्या वृत्तानुसार इ-कॉमर्समधील कंपन्यांच्या वाटचालीत अनेक कंपन्यांच्या गर्दीमुळे मंदी येण्याची शक्यता आहे. “ भारत ही विकसनशिल अर्थव्यवस्था आहे आणि तेथे प्रचंड मागणीला वाव आहे. या देशाला आणखी काही काळ हे समजायला लागणार आहे आणि माझे व्यक्तिगत मत असे आहे की या बाजारपेठेच्या खोलात जाऊन माहिती होण्यासाठी आणखी काहीकाळ दूरदृष्टीने पहावे लागेल. ज्यावेळी तुम्ही विकसनशील अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करता तुम्हाला सारे सुरळीत होईल अशी हमी देता येत नाही, आणि वाईट काहीच होणार नाही असे मानता येत नाही.” शैलेंद्र यांनी सांगितले.

उद्यमींच्या बाबतीत सर्वसाधारणपणे होणा-या एका चुकीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की,: अनेक संस्थापक प्रयत्नशील असतात ते गुंतवणूदारासाठी व्यवसाय करण्यात धन्यता मानतात. त्यांनी खरेतर आवश्यक त्या योग्य गोष्टीवर लक्ष केंद्रीत करायला हवे. आणि तेच केले पाहिजे जे त्यांना करायला आवडेल. 

लेखक : जय वर्धन