कुवैतच्या या महिलेने मुंबईत बेघर असलेल्या माणसाला कशी मदत केली

कुवैतच्या या महिलेने मुंबईत बेघर असलेल्या माणसाला कशी मदत केली

Monday March 13, 2017,

2 min Read

बेघर असलेल्या लोकांची भारतात काही कमतरता नाही. पण याकडे आपल्यापैकी बहुतकेजण डोळेझाक करतात. मात्र कुवैतहून आलेल्या एका महिलेने मुंबईच्या रस्त्यावर पडलेल्या एका माणसाच्या बाबतीत जाणिव दाखविली.


Source: Facebook

Source: Facebook


कुवैतहून अलिकडेच मुंबईत आल्या असताना, शाहिन सय्यद या त्यांच्या मुलीसमवेत रिक्षाने मालाड ते मिरारोड असा प्रवास करत होत्या. बोरिवली पश्चिमेला एका सिग्नलवर, त्यांना एक बेघर माणूस पदपथावर पडलेला दिसला. नारळाच्या करवंट्या तो खात होता, अत्यंत दिनवाण्या स्थितीत तो होता. शाहिन यांना ते पाहून अस्वस्थ वाटले, त्यांनी रात्रभर बेघर लोकांच्या निवा-यांबाबत काही ,माहिती मिळते का याचा शोध घेतला. त्यांना कुणीतरी १०८ क्रमांकाला फोन करण्यास सूचविले, त्यांनी विलंब नकरता ते केले, आणि थोड्याच वेळात डॉक्टरांची व्यवस्था झाली. जरी त्या डॉक्टरांना भेटू शकल्या नाहीत तरी त्यांना खात्री देण्यात आली की ऍम्ब्यूलन्सची व्यवस्था करण्यात आली आणि त्या माणसाला कांदिवलीच्या रूग्णालयात भर्ती करण्यात आले. त्या माणसावर आता येथे उपचार केले जात आहेत. असे असले तरी तेथे काही प्रक्रिया करायच्या होत्या ज्यानंतर त्याचे पुनर्वसन केले जाणार होते. फेसबुकवर त्यांच्या पोस्टमध्ये शाहिन म्हणतात की: जर एखादा वेडा बेघर माणूस दिसला तर आपण काय कराल. मुंबईच्या रस्त्यावर एखादा पुरूष/स्त्री बेघर दिसली, त्यांना काही पैसे किंवा जेवण देण्यापेक्षा १०८ क्रमांकाला फोन करून वैद्यकीय मदत केली पाहिजे.

"मी शिंपोली सिग्नलजवळ बोरीवली पश्चिमेला असा माणूस पाहिला, जो कमजोर होता, जवळपास नग्न होता आणि नारळाच्या करवंट्यातून काही खायला मिळते का पहात होता. मला त्याला मदत करायची होती म्हणून मी घरी गेले आणि गुगलवर शोध घेतला. ‘बेघर माणसाला मदत करण्यासाठी मुंबईत मी काय करावे’. शोधाचे उत्तर मिळाले अभिषेक भारव्दाज, ज्यांनी मला १०८ क्रमांकाला फोन करण्यास सांगितले. मी तसे केले. मी बोरीवलीपासून दूर होते त्यामुळे मी तेथे जावू शकत नव्हते. डॉ शिखा यांच्यासह ऍम्बुलन्स पोहोचली, तेथे पोहोचल्यावर त्यांनी कळविले की ते त्याला शोधू शकत नाहीत. त्यांच्याशी वादावादी झाली मात्र माझा मुलगा शकील सय्यद घटनास्थळी पोहोचला आणि त्यांने मदत केली. आम्ही पुन्हा १०८ क्रमांकाला फोन केला. काही तास वाट पाहिल्यावर ऍम्बुलन्स आली, मग आम्ही पोलिसांना शभर क्रमांकावर फोन केला, आम्ही त्याला जवळच्या महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात कांदिवली पश्चिमेला दाखल केले. आता तो रूग्णालयात उपचार घेत असून त्याची तब्येत सुधारत आहे. मी डॉ अब्दुल लतिफ, पोलीस शिपाई जेबी राना, आणि अमित परब या बोरीवली पश्चिमच्या पोलिस ठाण्यातील पोलिसांना धन्यवाद देते". शाहिन सांगतात.

शाहिन यांच्या या कृतीमुळे अनेकांना प्रेरणा मिळते आणि आम्ही त्यांच्या या गरजूंना मदत करण्याच्या दयाळूपणाला सलाम करतो.

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा