२३ गांव व १८ शाळांमधून निघाली एक ‘शोधयात्रा’, मुलांच्या भन्नाट कल्पनाशक्तीने सारेच झाले अवाक्

0

आपल्या दैनंदिन कामकाजात येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणींच्या समाधानासाठी मोठमोठ्या संस्थानांच्या प्रयोगशाळेपर्यंतच मर्यादित राहण्याची चूक आपण करू नये, कारण दिवसभर शेतात राबणारा शेतकरी, सामान्य मजूर आणि छोटी मुलं त्यांना ज्ञात असलेल्या पारंपारिक माहितीनुसार, कल्पनाशक्ती लढवत एखादा नवीन शोध लावू शकतात. जे व्यावहारिक दृष्ट्या बाजारात उपलब्ध नाही.

भारताच्या सुदूर गावातील पारंपारिक माहितीच्या एकत्रीकरणासाठी आणि ग्रामीण भागातील रचनात्मक दर्शनासाठी 'सृष्टी सोसायटी फॉर रिसर्च अॅण्ड इनीशिएटिव्ह फॉर सस्टेनेबल टेक्नोलॉजी अॅण्ड इंस्टीटयूशन' तर्फे अन्य संस्थानांच्या सहयोगाने वर्षातून दोन वेळा शोधयात्रेचे आयोजन केले जाते.

यावर्षी ३६ वी शोधयात्रा मोहीम अरुणाचलप्रदेशाच्या खालच्या भागातील सुबांसिरी जिल्ह्यात राबवण्यात आली. ज्याचा अहवाल अह्मदाबादमध्ये नुकताच सादर करण्यात आला. आयआयएम – अहमदाबादचे प्राध्यापक तसेच सृष्टीचे संयोजक डॉ. अनिल के. गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली या शोधयात्रेचे आयोजन केले गेले.


या शोधयात्रेच्या दरम्यान प्रवाश्यांनी एकूण २३ गांव व १८ शाळांमधून फिरून ही मोहीम पूर्ण केली. या शोधयात्रेच्या अहवालानुसार प्रवासादरम्यान गावकऱ्यांशी केलेल्या चर्चेत मुख्य केंद्रबिंदू ठरली ती लहान मुलं. ही मुलं वयाने लहान असूनही आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीच्या समस्येविषयी अधिक गंभीर होती. यामध्ये सहावीत शिकणारे दोन मुलं दोरा जेम्स आणि तनया तेरिंग यांनी डोंगराळ भागात बांबूला खांद्यावरून उंचीवर घेऊन जाणे ही एक मोठी समस्या असून या समस्येच्या समाधानासाठी चाक असणारे स्टँँड बनविण्याची कल्पना सुचवली.


मुलांच्या या कल्पक विचारसरणीला बघून त्यांनी एक चाकाची साईकल वजा लागवड यंत्र दाखविले तेव्हा त्यामध्ये सुधार करण्याच्या अनेक कल्पना मुलांनी त्यांना दिल्या. त्यांनी तिथला दुर्गम परिसर लक्षात घेऊन एका चाका ऐवजी दोन चाक लाऊन त्यांना ब्रेक लावण्यासारख्या अनेक महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला. या दोन मुलांना त्यांच्या या कल्पनेवर काम करण्यासाठी दोन हजार रुपयाची मदत या संस्थेतर्फे तातडीने देण्यात आली.

कठीण परिस्थिती आणि पर्याप्त साधनांच्या अभावाला नवनिर्मितीचे उत्प्रेरक मानणाऱ्या विचारधारणेने सुरु केलेल्या या शोधयात्रेच्या मोहिमेत, वेगवेगळ्या स्थानांवर थांबून तेथील लोकांनी केलेल्या शोध कार्याचा आढावा घेतला. तसेच तेथील लोकांच्या उपयोगात येणाऱ्या काही तांत्रिक बाबींचा यात समावेश आहे. जो देशातील इतर गावातही विकसित केला गेला आहे. ही माहिती हनी बी नेटवर्कच्या डाटाबेस मध्ये नमूद केलेली आहे.


अहवालामध्ये त्या प्रांतातील शाळांच्या सुधारित दर्जाची पर्याप्त माहिती नमूद करण्यात आली आहे. त्या प्रांतातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे यात्रेकरूंना तेथे कोणतेच बालक कुपोषणाचे बळी दिसले नाही. याशिवाय जैव विविधतेच्या प्रबंधन केंद्राच्या सक्रियतेने यात्रेकरूंना आपल्याकडे आकृष्ट केले. आपल्या क्षेत्राच्या संरक्षणार्थ केलेला विशेष सामुदायिक प्रयत्नसुद्धा काैतुकास्पद होता.

देशाच्या सुदूर प्रांतातील उपस्थित असलेले पारंपारिक ज्ञान आणि रचनात्मकतेची ओळख करवणाऱ्या या यात्रेत एकूण ६५ यात्रेकरू मध्ये शेतकरी, नवनिर्माण, शिक्षक,पत्रकार व अन्य पेशेवरांचा सहभाग होता.

यासारख्या काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

स्टार्टअप इंडिया मोहिमेने प्रेरीत बालउद्योजक बंधूंकडून पायाभरणी स्मार्टअप इंडियाची...

जगाला आपल्या कवेत करण्यासाठी पाहिजे ‘संकल्प’, एनआयटीच्या विद्यार्थ्यांनी शेकडो मुलांना दाखवला आशेचा किरण

खेळता खेळता 'त्यानं' बनवले व्हिडिओ गेम्स

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. लाईक करा. उद्यमी

मूळ लेखन : टीम वायएस हिंदी

अनुवाद : किरण ठाकरे