ग्राहकांच्या खिशाला परवडेल आणि तरीही बहुआयामी वाहन व्यवसाय करण्याचं झीपझॅपव्हील्सच लक्ष्य

0

मोनिएर या जर्मन कंपनीमध्ये भारतीय सी ई ओ म्हणून काम करत असताना आणि कामाच्या १९ वर्षांची दीर्घ कारकिर्द, असं सुरक्षित आयुष्य प्रसन्न राघवेंद्रच होतं. पण प्रत्येक गोष्ट गुडी गुडी असतेच असं नाही, तर प्रत्येक गोष्टीचा वास्तव विचार करणं गरजेचं असतं. हे सुरक्षित आयुष्य सोडून स्वतःचा व्यवसाय का सुरु करावासा वाटला हे तो मनापासून सांगतो. डॉट कॉम ची लाट आमच्या हातून निसटून गेली होती कारण आम्ही तेव्हा यासाठी सज्ज नव्हतो. पण ई कॉमर्स ची व्यवसायाची संधी आम्हाला सोडायची नव्हती.

मोनिएर च्या आधी ४६ वर्षांचा प्रसन्न पॅनासाॅनिक मध्ये काम करायचा, त्याचवेळी कंपनीचा भारताचा सिटीओ ४० वर्षीय हेमचंद्र भोवी यांची भेट झाली.

हे दोघे २००९ मध्ये भेटले आणि अजूनही एकमेकांच्या संपर्कात आहेत. बांधकाम साहित्य, रुग्णालय साहित्य, स्थावर मालमत्ता अशा सगळ्याच क्षेत्रावर या दोघांचं लक्ष होतं. पण प्रसन्नाची गाड्यांविषयीची आवड यामुळे तो त्याकडे खेचला गेला. त्याला ई कॉमर्स च्या माध्यमातून नवीन दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री करायची आहे. शिवाय ग्राहकांना गाडीची चाचणी त्यांच्या घरी घेता येईल अशी सोय करायची होती.

प्रसन्न सांगतो "व्यवसायाची ही कल्पना अजून कोणाला सुचली नव्हती. पण यातून फार काही बदल होणार होता असं नाही. जर लोकं गाडी खरेदी करण्यापूर्वी इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेतात मग त्यांना गाडी खरेदीची सोय ऑनलाईन का उपलब्ध नसावी?

त्याच्या भागीदाराच्याही लक्षात आलं की, लोकं मोठ्या प्रमाणावर गाड्या खरेदी करतात. पण शोरूम मध्ये गेल्यावर किफायतशीर किंमतीत गाडी मिळेल की नाही याची खात्री नसल्याने लोक नाराज आहेत. हे दुचाकी आणि काही चारचाकी गाड्यांच्या बाबतीत वास्तव होतं.

झिप झॅप च्या माध्यमातून

शेवटी झिपझॅप व्हील्स डॉट कॉम या संकेतस्थळावर नवीन वाहनं आणि जुन्या वाहनांची विक्री आणि ऑनलाईन टेस्ट ड्राईव साठी बुकिंग करणं शक्य झालं. सुरवातीला ५० लाखांची गुंतवणूक करून ६० बेंगळूरू वितरकांना भागीदार बनवण्यात आलं. पुढच्या टप्प्यात मुंबई, पुणे, एनसीआर आणि चेन्नई मध्ये काम सुरु करण्याचा त्यांचा विचार आहे. मे २०१५ पासून आतापर्यंत १२५ वाहनांची विक्री झाली आहे. संस्थापक सांगतात हे फायद्याचे दिवस असून ६० टक्के फायदा हा गेल्या एका महिन्यात झाला आहे. पुढच्या महिना अखेर पर्यंत दुपटीने फायदा करून घेण्याचा त्यांचा विचार आहे.

एक वाहन साधारण किती वेळ लागतो, त्यावर प्रसन्न सांगतो हे ग्राहकाच्या मनावर असतं दुचाकीची विक्री कमीत कमी वेळात म्हणजे ५० मिनिटात झाली आहे. तर व्यवहार पूर्ण व्हायला सगळ्यात जास्त काळ म्हणजे एक महिना लागला होता. तो सांगतो दोन प्रकारचे ग्राहक असतात. पहिला प्रकार म्हणजे ज्यांना माहित आहे कि त्यांना काय घ्यायचं आहे ते २४ तासात व्यवहार पूर्ण करायचा असतो ते फार फार तर कर्जाची प्रक्रिया पूर्ण करायला अजून एक दिवस घेतात.


ज्यांना खात्री नाही असे ग्राहक निर्णय घ्यायला तीन दिवस लावतात. या व्यवसायातून मिळणारं उत्पन्न सांगण्यास त्यांनी नकार दिला पण ग्राहकांसाठी हे संकेतस्थळ मोफत आहे. प्रत्येक वाहनाच्या विक्रीवर ते वाहनाच्या किंमतीत काही टक्केवारीने रक्कम घेतात. प्रसन्न सांगतो ठराविक अशी काही रक्कम त्यांनी निश्चित केलेली नाही तर ते अवलंबून असते. म्हणजे एखाद्या गाडीला असलेली मागणी, ती कधी बाजारात आली आणि तिची उपलब्धता.

हॉट डिल्स असाही एक स्वतंत्र विभाग उपलब्ध आहे ज्यावर ग्राहकांना एखाद्या विशिष्ठ शहरात कोणतं वाहन किफायतशीर किंमतीत उपलब्ध आहे याची माहिती ग्राहकांना मिळते.

भविष्यकाळातील वाटचाल

पुढच्या तीन महिन्यात या संकेतस्थळात अनेक गोष्टी अंतर्भूत करायच्या आहेत. ग्राहकांना सहज कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी स्वतःच्या मालकीची अशी एक संस्था सुरु करायची आहे जी ग्राहकांना कर्ज काढायला मदत करेल. या संदर्भात सहा बड्या बँकांशी बोलणी सुरु असून आयसीआय सी बरोबर त्यांनी काम सुरु केलं आहे.

उपलब्ध असलेल्या वाहनांची माहिती ग्राहकांना ऑनलाईन मिळावी आणि त्यांचा वाहन खरेदीचा व्यवहार सुरु असेल तर त्याचीही माहिती ग्राहकांना ऑनलाईन मिळेल. तसंच व्यवहाराच्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यावर ग्राहक गाडी कधी घेऊन जाऊ शकेल याची माहितीही त्यांना ऑनलाईनच मिळेल, अशी सोय करण्याचा विचार झीपझापव्हील्स च्या संस्थापकांचा आहे. त्याच बरोबर या माध्यमातून वाहनाच उत्पादन कधी झालं याची माहितीही मिळेल अशी व्यवस्था करायची आहे.

या संकेतस्थळावरून वाहनांची विक्री वाढवायची असून ती संख्या ५०० पर्यंत न्यायची आहेत. तसंच दर महिन्याला ३ लाख ग्राहक संकेतस्थळाला भेट देतील असं काहीतरी करण्याचा विचार आहे. सध्या रोज १५०० ते २००० ग्राहक देतात.

या सगळ्या प्रवासातील सर्वात आनंददायी क्षण कोणता असं विचारलं असता, पहिला ग्राहक मिळाला ती आठवण प्रसन्न सांगतो. जेव्हा पहिला ग्राहक मिळाला तेव्हा सगळ्यांनाच आनंद झाला, शिवाय त्याला हे संकेतस्थळ कसं मिळालं याचीही उत्सुकता सगळ्यांना होती.

या संकेतस्थळाच्या माध्यमातून विक्री झालेल्या वाहनांची नंतरची सगळी कामं एकाच ठिकाणी करता येतील अशी व्यवस्था करायची आहे, असं प्रसन्न सांगतो. पुढच्या वर्षभरात वाहनांची सर्विसिंग करण्याची ची सेवा, वाहनांचे भाग मिळतील या सेवा ते सुरु करणार आहेत. इतकंच नाही तर विविध ठिकाणांची माहितीही ते या ठिकाणी देणार आहेत.

थोडक्यात काय तर वाहनासंदर्भातील सगळ्या सोयी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं त्यांनी ठरवलं आहे.

युवर स्टोरी चा सहभाग

जाहिरातीच्या माध्यमातून वाहन विक्री ही कल्पना भारतात नवीन आहे. ही समजूत त्यांनी खोटी ठरवली. त्यांनी कार देखो आणि कार ट्रेड या त्यांच्या स्पर्धकांनाही मागे टाकलं. हे दोघेही २००८ आणि २००९ पासून या व्यवसायात होते.

आकडेवारी खालील प्रमाणे

अलेक्सा रॅन्किंग नुसार कार देखो डॉट कॉम हे भारतातील पहिल्या २०० प्रसिद्ध संकेतस्थळामध्ये होतं. तसंच या वर्षी हिल हाउस कॅपिटल, ट्यीब्रून कॅपिटल, आणि रतन टाटा यांच्या कडून ५० मिलिअन अमेरिकी डॉलर इतका निधीही मिळाला. कार देखो ने दिलेल्या माहिती नुसार त्यांच्या संकेतस्थळावर नवीन गाड्यांचे १४०० वितरक तर जुन्या गाड्यांचे ३ हजार वितरक आहेत. तसंच दर महिन्याला १० मिलिअन ग्राहक त्यांच्या संकेतस्थळाला भेट देतात.

तर दुसरीकडे कार ट्रेडचं कारवाले डॉट कॉम ला वरबुर्ग पिंचूस, टाईगर ग्लोबल, आणि कॅन्नन पार्टनर यांच्याकडून २०१४ मध्ये ३० मिलिअन अमेरिकी डॉलर इतका निधी मिळाला होता. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी दावा केला होता की, दर महिन्याला ४ मिलिअन ग्राहक त्यांच्या संकेतस्थळाला भेट देतात, तर तसंच त्यांचाकडे एक लाख वापरलेल्या गाड्या उपलब्ध आहेत.

यावरून असं दिसून येतं की, ऑनलाईन वाहन विक्रीच्या क्षेत्रात कार ट्रेडच कारवाले डॉट कॉम आणि कार देखोचं झिग व्हील्स याचं वर्चस्व आहे. कार देखो गिरिनार साॅफ्टवेअरच्या माध्यमातून चालवलं जातं, गिरीनार ने दावा केला आहे की, परदेशात व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना ५ गुंतवणूकदार मिळाले आहेत.

या ऑगस्ट महिन्यात क्विकर डॉट कॉम हे क्विकार कार च्या माधमातून या व्यवसायात उतरलं आहे. दुचाकी वाहनांची विक्री, कर्ज सुविधा आणि टेस्ट ड्राईव या वेगळ्या सुविधा झीपझापव्हील्स डॉट कॉम ने उपलब्ध करून दिल्या आहेत.

यावरून स्पष्ट होतं कि, बाजारात हा नवीन स्पर्धक वेगाने पाय पसरत असून प्रस्थापितांना धक्का देत आहे.

लेखक : तृषा भल्ला

अनुवाद : श्रद्धा वार्डे