नव्या दोनशेच्या चलनी नोटबद्दल दहा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत!

0

वित्त मंत्रालयाने मागील बुधवारी नव्या दोनशेच्या चलनी नोटा व्यवहारात आणल्या, याबाबतच्या राजपत्रात केंद्र सरकारने म्हटले आहे की, “ केंद्र सरकार या ठिकाणी स्पष्ट करते की, दोनशे रूपयांच्या चलनी नोटा व्यवहारात आणत आहोत”.

भारतीय रिझर्व बँक कायदा१९३४च्या कलम २४ नुसार केंद्रीय संचालक मंडळाच्या शिफारशी नुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली असून वित्त राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार म्हणाले की, २०० रूपयांच्या चलनी नोटांची छपाई सुरू झाली आहे, त्या लवकरच सर्वत्र चलनात येतील. छोट्या किमतीच्या नोट जास्त चलनात याव्या यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर लोकांनी तक्रारी केल्या की मोठ्या दोन हजार रूपयांच्या नोटा वटवण्यास अडचणी येत आहेत, त्याप्रमाणात छोट्या किमतीच्या चलनी शंभर आणि पाचशेच्या नोटा बाजारात नाहीत. येथे दहा बाबी आहेत ज्या तुम्हाला माहिती असायला हव्या.


नव्या दोनशेच्या नोटांचा आकार ६६मिमी x१४६ मिमी आहे. नव्या नोटांवर देखील स्वच्छ भारतचा लोगो (बोधचिन्ह) किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्लिन इंडिया मोहीमेचा संदेश आहे.

नव्या नोटांवर सांची येथील स्तूप रिवर्स मध्ये रेखाटण्यात आला आहे. नव्या २००च्या नोटांची योजना करताना त्याला पंतप्रधान कार्यालयातून मान्यता घेण्यात आल्याचे वित्त मंत्रालयाने नमूद केले आहे.

२५ऑगस्ट२०१७ या दिवशी रिझर्व बँकेचे गवर्नर डॉ उर्जित पटेल यांच्या स्वाक्षरीने या नोटा चलनात जारी करण्यात आल्या.

या नोटांवर २००चा उल्लेख देवनागरीत आणि अंकात देखील करण्यात आला आहे. महात्मा गांधी यांचे चित्र मध्यभागी आहे, मायक्रो अक्षरात ‘RBI’, ‘भारत’, ‘India’, ‘200’ असा उल्लेख यावर करण्यात आला आहे. यांचा रंग हिरवा आणि निळा असा बदलत गेला आहे.

दृश्यमान महात्मा गांधी यांच्या चित्राप्रमाणेच त्यावर इंटँग्लीओ किंवा कोरून देखील महात्मा गांधी यांचे चित्र काढण्यात आले आहे. त्यावर अशोक स्तंभाचे एम्ब्लेम समजेल अश्या प्रकारे H ही खूण करण्यात आली असून त्यावर उभ्या आडव्या चार ओळी रेखाटून २०० असा अंक लिहिण्यात आला अहे.

या नोटांचा मूळ रंग पिवळा आहे.

या नोटेत इतरही नक्षी आहे त्याला जिओमॅट्रीक पॅटर्न म्हणतात, त्यात रंगाची सरमिसळ करून ती रेखाटण्यात आली आहे, छापील आणि कोरीव दोन्ही प्रकारे ती आहे.