‘स्टार्टअप’ने केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे, सरकार मार्ग सोपा करेल – निर्मला सीतारमण

0

नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित ‘स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया’ परिषदेत बोलताना वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीता रमण यांनी सांगितले की, “एनडीए सरकार स्टार्टअपसाठी अनेक योजनांवर काम करत आहे आणि आम्ही स्टार्टअपच्या योग्य दिशेने प्रगतीसाठी गंभीर आहोत, सोबतच सरकार स्टार्टअपच्या समोर येणा-या समस्यांना दूर करून या प्रक्रियेला सहज बनविण्याच्या दिशेने गंभीरतेने काम करत आहे.”

सीतारमण यांनी सांगितले की, १५ऑगस्ट २०१५ला पंतप्रधानांनी ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेची सुरुवात केली. तेव्हापासून आम्ही सलग प्रयत्न करत आहोत की, कशाप्रकारे सर्व मंत्रालयांना सोबत घेऊन या दिशेने काम केले जाऊ शकेल. या दरम्यान आम्ही अनेक स्टार्टअप सोबत संवाद देखील साधला. आम्ही एक सर्वोत्तम यंत्रणा देखील तयार केली आहे आणि आता आम्ही त्याला गती देण्याच्या दिशेने पुढील वाटचाल करत आहोत.

लवकरच स्टार्टअपला मान्यता मिळण्यासाठी येणा-या अनेक प्रकारच्या समस्यांपासून देखील सुटका मिळणार आहे. याबाबतच्या नियमांना अधिक सहज आणि पारदर्शी बनविले जाईल. सरकार त्या प्रत्येक अडथळयाला दूर करू इच्छित आहे, जो एका स्टार्टअपसाठी अडथळा बनू शकतो. आमची इच्छा आहे की, प्रत्येक स्टार्टअपने केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. पुढे त्यांनी म्हटले की, मागील काही वर्षात तरुणांच्या विचारात खूप बदल झाले आहेत. आता ते अन्य कुणाचीही नोकरी करू इच्छित नाही तर, स्वतः आपली कारकीर्द घडवू इच्छितात. सोबतच सुरुवातीला सरकारी नोक-यांसाठी तरुणांमध्ये स्पर्धा होती, ती देखील आता कमी झालेली दिसते. आजचा तरुणवर्ग स्वतःचे काम स्वतः सुरु करू इच्छितो. त्यांना व्यावसायिक बनायचे आहे.

निर्मला सीता रमण यांनी सांगितले की, “मागील काही काळापासून आम्ही पाहिले की, भारताचे काही तरुण सिलिकॉन व्हँली येथून भारतात परतले आहेत आणि येथे येऊन त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला आहे. त्यांचे हे पाउल खूपच सकारात्मक आहे, यामुळे त्यांनी हे देखील पटवून दिले की, त्यांच्याकडे भारतात खूप काही करण्यासारखे आहे.” सीतारमण यांनी सांगितले की, मागील एका वर्षात आम्ही पाहिले की, स्टार्टअप्सच्या उत्पन्नात देखील वाढ झाली आहे. पुढे त्यांनी सांगितले की, आम्ही हे देखील पाहिले की, अनेक असे व्यावसायिक जे चांगले काही करू शकले नाहीत, त्यांनी एकच बाब सांगितली की, लालफीतशाही त्यांच्या अपयशाचे मुख्य कारण होते. या समस्येला दूर करण्यासाठी सरकारने अनेक योजनांवर काम केले आहे. ज्याचे परिणाम देखील दिसायला लागले आहेत. सीतारमण यांनी सांगितले की, सरकार आता गुंतवणूकदार आणि स्टार्टअप वर्गणीदार या दोघांचा मार्ग सोपा करण्यासाठी अनेक महत्वाचे पाऊले उचलणार आहे. सोबतच या बाबतचे दिवाळखोरीबाबतचे विधेयक देखील सदनात गेले आहे.

लेखक : आशुतोष खंतवाल

अनुवाद : किशोर आपटे