एकेकाळी पिझ्झा डिलीवरी बॉय चे काम करणारा मोहम्मद हुसैन आज‘कारगिल टुडे’टीवी नेटवर्कचा मालक

0

कारगिल (जम्मू और कश्मीर) येथील स्थानिक युवक मोहम्मद हुसैन इब्ने खालो, जो पिझ्झा डिलीवरी बॉय चे काम करत होता, आज केबल टीवी नेटवर्क ‘कारगिल टुडे’ चा मालक आहे. आज कारगिल टुडे कारगिल जिल्ह्यातील स्थानिकांसाठी मोठे व्यासपीठ आहे, स्थानिकांचा आवाज आहे. ‘कारगिल टुडे’ या केबल टीवी नेटवर्कवर ताज्या घडामोडींबरोबर, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे प्रक्षेपणदेखील केले जाते.

हुसैन, यांनी लहानपणापासून खूप संघर्ष केला. त्यांनी आपले शालेय शिक्षण कारगिलमधील एका सरकारी शाळेत पूर्ण केले. “२०११ मध्ये मी या केबल टीवी नेटवर्कची सुरुवात केली. तेव्हापासून कारगिल जिल्यातील स्थानिकांमध्ये आणि जिल्ह्याच्या एकूणच कामकाजच्या स्वरूपामध्ये बरेच सकारात्मक बदल झाले आहे. स्थानिकांना या टीवी नेटवर्कच्या माध्यमातून व्यासपीठ मिळाल्या कारणाने ते बोलायला लागले त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.”, हुसैन यांनी सांगितले. “मला नेहमी असे वाटायचे कि मी लोकांसाठी काहीतरी मदत करेन आणि त्याच माध्यमातून पैसा देखील कमावेन” हुसैन यांनी पुढे सांगितले.

कारगिलमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हुसैन यांनी हे केबल टीवी नेटवर्क सुरु केले याचे इथल्या स्थानिकांना कौतुक आहे. कारगिल जिल्यातील अग्रगणी केबल टीवी नेटवर्क असल्याचे इथले स्थानिक सांगतात. स्थानिक सांगतात कि, फक्त कारगिल जिल्ह्यातच नव्हे तर लडाख मध्ये सुद्धा या केबल टीवी नेटवर्कचा बोलबाला आहे.

सौजन्य : थिंक चेंज इंडिया