खास तुमच्यासाठी, तुम्हाला हवे तसे बूट तयार करणारे 'एफगलीडॉटकॉम'

0

अमेटी विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर सुजित माधोगडीया या २६ वर्षीय तरुणाने ‘अॅक्सेंटर’ या कंपनीत 'बिजनेस अॅनालिस्ट' म्हणून काम करण्यास सुरवात केली. एके दिवशी ऑफीसमध्ये नेहमीप्रमाणेच सर्वजण काम करत असताना कोणीतरी जोरात ओरडला ‘वा..वा.. मस्त... खूप छान बूट आहेत’. ऑफिसमधलाच एकजण नवीन वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेले बूट घालून आला होता. त्याच्या बुटाने सर्वांचेच लक्ष वेधले. सुजितनेही त्या बुटाचे निरीक्षण केले. अनोख्या पद्धतीने डिझाईन केलेल्या बुटावरचे अॅनिमेटेड कॅरेक्टर पाहून त्याने त्या मित्राला चौकशी केली तेव्हा कळले की त्याने चार हजार रुपये देऊन ते बनवून घेतले आहे.

“बूट घालून आलेल्या त्या मित्राच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान काहीतरी वेगळेच होते. त्याला चार हजार रुपये बुटासाठी खर्च केल्याची खंत वाटत नव्हती. ते पाहून मी विचारात पडलो, डोके खाजवू लागलो, त्यादिवशी मी रात्री नीट झोपू शकलो नाही. संपूर्ण रात्रभर माझ्यासमोर ते बूट आणि बूट घातलेल्या माझ्या मित्राच्या चेहऱ्यावरचा आनंद आठवत होता. बुटाच्या त्या कल्पक मांडणीवर मी विचार करत होतो आणि त्या बुटाच्या निर्मितीविषयी जाणून घेण्यास माझी उत्सुकता अधिकच वाढली होती. मला बूट खूपच आवडले होते, मात्र त्याची किंमत जास्त होती. जर असेच बूट स्वस्त दरात उपलब्ध केले तर मी विचार करत होतो,” सुजित सांगत होता.

एफगली टीम
एफगली टीम

त्यानंतर सुजितने आणि त्याचा मित्र शकीफ खान यांने बूट बाजाराचे सर्वेक्षण करायचे ठरवले. त्या दोघांनी त्यांचा  मित्र परिवार आणि इतर अशा जवळपास ५०० लोकांशी चर्चा केली. सुरवातीला त्यांनी लोकांना विचारले की त्यांना कोणते कपड्यांचे ब्रान्डस वापरायला आवडतात त्यातल्या ९५ टक्के लोकांनी एका क्षणाचाही विलंब न करता त्यांचा प्राधान्यक्रम असलेल्या आणि ते वापरत असलेल्या ब्रांडचे नाव सांगितले. मात्र सुजितने जेव्हा त्यांना ते कोणत्या ब्रान्डचे बूट वापरतात हे विचारले तेव्हा मात्र अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते, ते आमच्याकडे काहीशा आश्चर्यकारक नजरेने पहात होते. काहीजण हसून आहे ती परिस्थिती सांगत होते.

"सर्वेक्षणानंतर आमच्या लक्षात आले की मध्यम स्वरूपाचे उत्पन्न असणाऱ्या लोकांना आंतरराष्ट्रीय ब्रान्डस वापरायला आवडतात, जसे की, निक, पुमा, आदिदास आणि इतरही, मात्र या ब्रान्डस् च्या किमती जास्त असल्याकारणाने ते घेऊ शकत नाही. दुसरीकडे चप्पल किवा बूट खरेदीबाबत लोकं ब्रान्डचा फारसा विचार करत नसल्याचे दिसून आले. टिकाऊ आणि पाय झाकले जातील एवढीच गरज लक्षात घेऊन ते चप्पल किवा बूट खरेदी करतात. याबाबतीत ते भारतातल्या कुठल्याही अशा विशिष्ट ब्रान्डची आवड असल्याचे सांगत नाही. किवा त्याची त्यांना गरज वाटत नाही," सुजित सांगत होता.

सुजित माधोगडीया
सुजित माधोगडीया

एकूणच सर्वेक्षण करून आम्ही फुटवेअर बाजारात व्यवसाय करण्याचे ठरवले आणि एफगलीडॉटकॉम (FGali.com) या पोर्टलचा विस्तार केला. बिन लेसाचे आणि लेस असलेल्या बुटापासून आम्ही सुरवात केली. नंतर बेलीज, हिल्स यासारखे अन्य प्रकारही उपलब्ध केले. कलाक्षेत्रात निपुण असलेल्या कलाकारांकडून विविध डिझाईन बनवून घेतल्या. 

एफगलीडॉटकॉमचे सह संस्थापक शकीफ यांची एफगली स्थापनेमागची वेगळी कहाणी आहे ते सांगतात की,

“एफगलीडॉटकॉम सुरु करण्यापूर्वी मी अॅन्ड्रॉईड डेव्हलपर म्हणून एके ठिकाणी काम करत होतो. त्या ठिकाणी दिवसभर कोडींग करून मी थकायचो, मला निरुत्साही वाटायचं. त्यावेळी मी फेसबुकवर रोज अपडेट करायचो. एक दिवस आकर्षक पद्धतीने कलाकृती केलेल्या बूटाची एक पोस्ट मी पाहिली. मला ते बूट खूप आवडले आणि तसे बूट खरेदी करावे म्हणून विचारपूस केली तेव्हा मात्र बुटाची किंमत ऐकून घोर निराशा झाली. ते बूट खरेदी करणे माझ्या आवाक्यात नव्हते, मात्र असे अनेकजण होते जे ते बूट खरेदी करू शकत होते. अडीच हजार रुपये देऊन बुटाची डिलिव्हरी घेण्यास १४ दिवस वाट पाहायची त्यांची तयारी होती. कॉलेजमध्ये असताना प्रत्येक युवकाला वाटते की आपण वेगळे, सर्वांमध्ये उठून दिसावे, तसेच मलाही वाटायचे. कॉलेज मध्ये असताना मला खूप पाॅश रहायला आवडायचे”.

शकीफ खान
शकीफ खान

शकीफ पुढे सांगतात की, “चांगल्या आणि आकर्षक दिसणाऱ्या पेहरावाची तसेच आकर्षक चप्पल किवा बुट घालण्याची मला पहिलेपासूनच आवड होती. मग मी मला हव्या तश्या डिझाईनचा आणि आर्टिस्टचा शोध घ्यायला सुरवात केली. मात्र तशी उपलब्धता फारच अल्प, जवळपास नसल्याची जाणीव झाली आणि तिथेच मला व्यावसायिक संधी दिसली. मागणी भरपूर आणि पुरवठा कमी असेल तर तीही दरी भरून काढण्यासाठी मी आणि सुजितने प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही कधीच मागे वळून पहिले नाही”.

सुरवातीला कल्पना अशी होती की मुंबईमधल्या वेगवेगळ्या आर्टिस्टला त्यांच्या विविध कलाकृतीनुसार बाजारात ओळख करून द्यायची आणि त्यांनी स्वतः त्यांचे डिझाईन केलेले बूट ग्राहकापर्यंत पोहोचवायचे आणि पैसे घ्यायचे.

कसे काम करते ‘एफगली’

एफगली तरुणांच्या अपेक्षेनुसार डिझाईन करून, त्यांना परवडणाऱ्या किमतीनुसार पादत्राणे तयार करून देणारा ब्रान्ड आहे. एफगली हे ब्रान्ड नाव ठेवण्यामागची संकल्पना ते सांगतात, ‘F’ म्हणजे ‘फॅशन’, ‘फुटवेअर’, ‘फंकी’ आणि ‘फॅन-आर्ट’ आणि ‘फॅशन-स्ट्रीट’चे देशी वर्जन अर्थात ‘स्ट्रीट’ म्हणजे ‘गली’.

“ खूप आकर्षक दिसणारे बूट फारशे आरामदायक नसतात आणि याउलट आरामदायक बूट आकर्षक दिसत नाही ! जर ते आरामदायक आणि आकर्षक असतील मात्र किमत परवडणारी नसेल तर ? नेमकी हीच मोठी अडचण आम्ही सोडवतो” सुजित माधोगडीया यांनी युवर स्टोरीशी बोलताना सांगितले.

एफगली संपूर्ण भारतातील आर्टिस्टला शूजची आऊटलाईन देऊन त्यांच्याकडून डिझाईन्स मागवतात. त्यानंतर अंतर्गत मूल्यमापन करून, ग्राहकाच्या प्राधान्यक्रमानुसार सर्वोत्तम डिझाईन निवडले जाते. संबंधित आर्टिस्टला पैसे दिल्यानंतर शूज बनवायला घेतले जातात.

भारतातल्या विविध प्रांतातल्या आर्टिस्टबरोबर काम करत असताना आमच्या असे लक्षात आले की, प्रत्येक आर्टिस्टकडे त्यांच्या स्वतःच्या कलेची एक वेगळी कहाणी आहे. त्यांनी कला क्षेत्र निवडण्यामागचं कारण काय आहे ? आमच्या आर्टिस्टपैकी एकाने आम्हाला सांगितले की, “मानसिकरीत्या मी खूप खचलो होतो, नैराश्याने मला जखडले होते, त्यातून बाहेर पडण्यासाठी मला या क्षेत्राने आकर्षित केले आणि नैराश्यावर मी कायमचीच मात केली”.

आमच्याकडे काम करणारी प्रमुख आर्टिस्ट म्हणजे निडा चारफेर. शाळेत आणि कॉलेजमध्ये स्वच्छंदी आयुष्य जगणारी ही मुलगी एकाएकी निराशेच्या गर्तेत गेली, कारण काय होते तर तिने कॉमर्स विषय घेऊन पदवी संपादन केली होती तर तिच्या अन्य शाळेच्या मित्रमैत्रिणींनी इतर विषय घेऊन त्या त्या क्षेत्रात उत्तम यश संपादन केले होते. तिने योग्य अभ्यासक्रम निवडला नाही म्हणून ती सारखी स्वतःलाच दोष देत बसायची आणि हताश व्हायची. काही कालावधीनंतर तिच्या लक्षात आले की तिला सर्वाधिक गती असलेल्या कलाक्षेत्रापासून ती दुरावली होती, जे ती शालेय जीवनात करत होती. अशा प्रकारच्या प्रत्येक कलाकाराच्या कहाण्या ऐकून आम्ही या कहाण्या त्या त्या कलाकाराने डिझाईन केलेल्या प्रत्येक उत्पादनाशी जोडायचे ठरवले.

एफगलीची टीम

सुजित माधोगडीया वयवर्ष २६, शकीफ खान २५ या दोघांनी २०१४ मध्ये एफगलीची स्थापना केली. त्यानंतर काही कालावधीतच अरशद शेख ३० आणि आकांक्षा कपूर २१ हे दोघेही त्यांच्या या कामात सहभागी झाले. एकीकडे शफिक याला ऑनलाईन फुटवेअरचा अनुभव होता तर दुसरीकडे सुजितला ऑफलाईन काम करण्याचा, दोघांनीही झोकून देऊन काम केले आणि एफगली यशस्वी बनवले. एफगलीचे बूट त्यांच्या दुकानातून खरेदी केले जाऊ शकतात किवा ऑनलाईन आर्डरही देता येते. याशिवाय बुटांच्या बॉक्सवर बूट डिझाईन करणाऱ्या आर्टिस्टची कहाणी वाचयला मिळते.

पेशाने स्टाइलिस्ट असलेली आकांक्षा एफगलीच्या टीममध्ये सामील झाली. ती उत्पादनाचा दर्जा, डिजाईन आणि त्यामध्ये करावयाची सुधारणा हे काम पहाते. यापूर्वी आकांक्षाने अनेक बॉलीवुड सेलिब्रिटींबरोबर स्टाइलिस्टचे काम केले आहे. एफगलीच्या टीम मधल्या अरशदने सुद्धा यापूर्वी शॉपर स्टॉप आणि ग्रे सारख्या कंपनीबरोबर काम केलेले आहे. दहा वर्षाचा अनुभव असलेला अरशद डिजिटल मार्केटिंगचे काम सांभाळतो.

आव्हाने आणि त्यांवर मात

सुजित सांगतो की, “ सुरवातीला आम्हाला अनेक अडचणी आल्या. उत्पादन तयार करण्याची पार्श्वभूमी नसल्याकारणाने आम्हाला बाजारातील उलाढाल आणि विपणन व्यवस्थापन समजून घ्यायला वेळ लागला. ग्राहकांची पसंत आणि उत्पादनाची गुणवत्ता लक्षात ठेवून निर्मित्ती करणे आणि विक्रेता शोधणे त्यानंतर शेवटी ग्राहकापर्यत उत्पादित वस्तू पोहोचवणे हे करताना बऱ्याच अडचणी निर्माण व्हायच्या आणि बराचसा वेळ जायचा. उत्पादनाची किंमत आणि डिझाईन यांच्यातला ताळमेळ साधने इतके सोपे नव्हते हे आमच्या लवकरच लक्षात आले. मात्र किफायतशीर किमतीत दर्जेदार उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ याची आम्हाला खात्री होती. सध्या कंपनी विस्ताराच्या दृष्टीने अधिकाधिक निधीची आवश्यकता आहे त्यासाठी आमचे रिटेल आणि रियल इस्टेट दिग्गजांशी बोलणे सुरु आहे”.

बाजार, उद्योग वाढ आणि स्पर्धा

एफगलीचा क्लाॅकिंग रेवेन्यू रेट ४० लाख आहे, दर महिन्याला यामध्ये १५ टक्क्यांनी वाढ होत आहे. जर भारतातील पादत्राणांच्या बाजारावर एक नजर टाकली तर हा बाजार जवळजवळ ३८,७०० कोटी एवढा आहे. आणि वर्षाकाठी यामध्ये २० टक्क्यांनी वाढ होत राहते, असा अंदाज वर्तवला जातो. त्यामुळे भविष्यात एफगलीला खूप अपेक्षा आहे. एफगलीचे बूट तरुणांमध्ये, स्टाइलिस्ट, मॉडल्स, फॅशन ब्लाॅगर्स आणि टीव्ही कलाकारांमध्ये खूप लोकप्रिय आहे. एफगलीने यापूर्वी बाॅलीवुडच्या क्रिकेट लीगमध्ये लखनऊ नवाब्ससाठी बूट डिझाईन केले आहे. याशिवाय बिग बॉस सीजन ८ आणि फॅशन शो मध्ये देखील एफगलीचे बूट प्रदर्शित करण्यात आले आहे. एफगली हे असे ठिकाण आहे जे तुम्हाला हवे तसे बूटच बनवत नाही तर ते बूट फक्त तुमच्यासाठीच तयार करते. तुम्ही तुमच्या प्रियजनांना अशा प्रकारचे बूट नक्कीच भेट देऊ शकता. 

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा  :

ʻआय वेयर माय स्टाईलʼ मणि अग्रवालची फॅशनमध्ये गरुडभरारी

एका सामान्य विद्यार्थ्याचा असामान्य अविष्कार !

नवीन उपक्रमांना ऑनलाईन प्रेझेन्स मिळवून देणारे विश्वसनीय नाव ‘विडरशीन्स’