नासाने सूर्यमालेत शोधून काढले पृथ्वीसारखे सात नवे ग्रह!

नासाने सूर्यमालेत शोधून काढले पृथ्वीसारखे सात नवे ग्रह!

Saturday February 25, 2017,

2 min Read

रोजचा दिवस गतीने इतिहासात जमा होतो, राष्ट्रीय अंतराळ आणि अवकाश प्रशासन (नासा) ने युरोपिअन दक्षिण वेधशाऴेच्या दुर्बिणीच्या मदतीने पृथ्वीच्या आकाराच्या ग्रहांचे अस्तित्व शोधून काढले आहे. यापैकी तीन ग्रह ‘हँबीटेबल झोन’ मध्ये म्हणजेच असा भाग जेथे ग्रहमालेच्या मुख्य ता-या जवळच्या (सूर्याच्या) खडकाळ ग्रहांचा भाग असतो, जेथे पाणी असण्याची शक्यता असते.


image


या चमूने हे देखील निश्चित केले आहे की, या ग्रहांची घनता काय असेल, यातून असे दिसते की, त्यातील सहा ठिकाणी पृथ्वी सारख्या खडकांची रचना आहे. थॉमस झुर्बूचेन, वॉश्गिंटन येथील सायन्स मिशन संचालनालयाचे सह प्रशासक, यांनी नासाला दिलेल्या अधिकृत पत्रात नमूद केले आहे की,

“ हा शोध आपल्या शोधमोहिमेच्या मार्गावरचा मैलाचा दगड ठरेल असाच आहे, अशा जागा जेथे जीवन असू शकेल. ‘आपण एकटे आहोत का’ या प्रश्नाचे उत्तर शोधताना विज्ञानाचे याला प्राधान्य आहे की, सूर्यमालेत प्रथमच अशा प्रकारचे ग्रह सापडणे या दिशेने जाण्यास लक्षणीय असेच समजावे लागेल.”

या बाबतच्या एका वृत्तानुसार, या सात पैकी, तीन आपल्या सूर्यमालेच्या कक्षेत आहेत. याचा अर्थ असा की, या तीन ग्रहांवर समुद्र असण्याची दाट शक्यता आहे, अर्थातच तेथे जीवनाची शक्यताही अधिक आहे. इतर ग्रहांवर समुद्र सापडण्याची शक्यता कमीच आहे, पण या चमूचे मत आहे की या सा-याच ग्रहांवर द्रवरुप पाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नासाच्या अहवालानुसार, पृथ्वीपासून ४० प्रकाश वर्ष (२३५ ट्रिलीयन मैल) या ग्रहांचे वातावरण जवळपास आपल्या सारखेच असावे, जेथे पाण्याची शक्यता जास्त आहे. कारण ते आपल्या सूर्यमालेच्या नजिकच्या भागात आहेत या ग्रहांना शास्त्रिय भाषेत ‘एक्झोप्लँनेट’ म्हणतात.

एक्झोप्लँनेट पध्दतीला ट्रापिस्ट-१ असेही संबोधतात, कारण ते शोध घेतले जाणारे ग्रह आणि ग्रहमाला लहान दुर्बिणीने (ट्रापिस्टने) चिली येथून शोधले गेले आहेत. वर्षभरापूर्वी, येथे तीन ग्रह असल्याचे समजले होते, ज्यांना नंतर युरोपिअन दक्षिण वेधशाळेच्या मोठया दुर्बिणीतून खात्रीपूर्वक निश्चित करण्यात आले की, त्यात आणखी सात आहेत. त्यामुळे त्यांची संख्या नंतर सात झाली.

त्यांच्या घनतेनुसार, सर्वच्या सर्व ट्रँपिस्ट-१ ग्रह खडकाळ आहेत, मात्र केवळ निरिक्षणाने हे ठरविता येत नाही की ते पाण्याने समृध्द आहेत किंवा नाही. मात्र त्यांच्या पृष्ठभागांवर कुठेही पाणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पैकी सातव्या आणि सर्वात दूर असलेल्या एक्झो प्लँनेटच्या बाबतीत नक्की अनुमान झाल नाही, शास्त्रज्ञांच्या मते तो बर्फाळ असावा, मात्र अधिक निरिक्षणाची गरज आहे.