अर्धशिक्षित, पण फोर्ब्सने ठरवला देशाचा महान संशोधक, शेतीसाठी मल्टीक्रॉप थ्रेशर काढले शोधून!

अर्धशिक्षित, पण फोर्ब्सने ठरवला देशाचा महान संशोधक, शेतीसाठी मल्टीक्रॉप थ्रेशर काढले शोधून!

Thursday November 12, 2015,

3 min Read

ते संशोधक आहेत, त्यामुळेच त्यांना सन२०१०मध्ये फोर्ब्ज नियतकालिकाने ग्रामीण भारतातील सात शक्तिमान संशोधकांपैकी एक असल्याचे घोषित केले होते. इतकेच नाहीतर राजस्थान सरकारने त्यांच्या या संशोधनासाठी सन२००४ मध्ये त्यांचा सन्मानही केला आहे. ते आणि कुणी नाहीत ते आहेत—राजस्थानच्या सीकर येथे राहणारे मदनलाल कुमावत! जे देशातील मल्टीक्रॉप थ्रेशरचे (धान भरडाईयंत्र)संशोधक म्हणून ओळखले जातात.

image


असे म्हणतात की, गरज हिच शोधांची जननी असते, पण मदनलाल कुमावत यांनी पाहता-पाहता एक अशी वस्तू संशोधित केली जिचा उपयोग आज देशातील लाखो शेतकरी करतात. मदनलाल यांचे वडिल सुतारकाम करत असत, त्यामुळे कुटूंबाची आर्थिकस्थिती फारशी चांगली नसायची. जेंव्हा ते अकरा वर्षांचे होते, तेंव्हा एक दिवस त्यांनी खेळता-खेळता अकरा हजार व्होल्टच्या वीजेच्या तारेला स्पर्श केला. त्यामुळे त्यांना सुमारे पंधरा महिने उपचार घ्यावे लागले. त्यामुळे त्यांचे शाळेत जाणे बंद झाले. चवथ्या वर्गापर्यंतच शिक्षण घेऊ शकलेल्या मदनलाल यांनी अपघातानंतर वडिलांना व्यवसायात मदत सुरू केली. सुमारे चार-पाच वर्षे पित्यासोबत मदत करत असताना त्यांच्या लक्षात आले की, त्यांची तब्येत बरी नसते कारण त्यांचे बैठेकाम असते. त्यामुळे त्यांनी हे काम सोडून दुसरे काम करण्याचा निर्णय घेतला.

मदनलाल यांनी सन १९९८ मध्ये ट्रँक्टरमध्ये वापरात येणा-या लोखंडी उपकरणांची निर्मिती करणा-या कार्यशाळेत काम सुरु केले. त्यावेळी त्यांनी पाहिले की, कार्यशाळेत केवळ शेतीच्या अवजारांची दुरुस्ती केली जाते, आणि तेथे कोणतेही नविन अवजार तयार केले जात नाही. मग त्यांनी कार्यशाळेत थ्रेशर तयार करण्याचा निर्णय घेतला. सुमारे २०-३० दिवस अथक परिश्रम करून त्यांनी ते तयार करण्यात यश मिळवले. त्याची कामगिरी सध्याच्या थ्रेशरच्या तुलनेत अजिबात कमी नव्हती. थ्रेशर तयार करत असतानाच त्यांच्या हे लक्षात आले की, त्यात अनेक प्रकारचे बदल करता येऊ शकतात. त्या दरम्यान त्यांना दिसले की, जे धान्य थ्रेशर मधून बाहेर पडते ते पूर्ण स्वच्छ निघत नाही, आणि ते अधिक स्वच्छ असण्याची गरज होती. त्यावेळी त्यांनी थ्रेशर मध्ये धान्य स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेवर काम करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी थ्रेशरला ब्लोअरचा वापर करण्यास सुरुवात केली. खरेतर वेगवेगळ्या बाबतीत धान्य स्वच्छ करण्यासाठी हवेचा वेग वेगवेगळा हवा. त्यासाठी त्यांनी गिअर आणि चरखातंत्र वापरले.

image


थ्रेशर (भरडाईयंत्र)चे वैशिष्ट्य

मदनलाल यांच्या संशोधनाचा सर्वात जास्त फायदा शेतकरी बांधवांना झाला. त्यांचे म्हणणे आहे की,“शेतक-यांना त्याआधी कित्येक दिवस हवेची वाट पहात थांबावे लागत होते, पण मी विकसित केलेल्या यंत्राने ही अडचण दूर झाली.” आज मदनलाल यांच्या प्रयत्नांमुळेच बाजारात मिळणा-या थ्रेशरने केवळ धान्य पूर्ण स्वच्छ होत नाही तर ट्रँक्टरला देखील कमी शक्ती वापरावी लागते, त्यामुळे डिझेलचा वापरही कमी झाला आहे. इतकेच नाहीतर जी कामे करण्यास शेतक-यांना अनेक दिवस घालवावे लागत असत ती कामे एका दिवसात होतात. मदनलाल यांनी तयार केलेल्या थ्रेशरमुळे आज एका तासात १८ ते २० क्विंटल धान्य स्वच्छ केले जाऊ शकते.

image


थ्रेशरची नक्कल

मदनलाल यांना या गोष्टीचे दु:ख आहे की, ज्या वस्तूचा त्यांनी शोध लावला होता त्या वस्तूचे डिझाइन वापरून इतर लोक खूप पैसा मिळवीत आहेत. खरेतर सुरुवातीलाच त्यांनी त्यांच्या निर्मिती असलेल्या डिझाइनला अहमदाबादमध्ये नँशनल इनोवेशन फाऊंडेशन मध्ये नोंदणी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतू ही प्रक्रिया पूर्ण होत असतानाच खूप उशिर झाला होता. मदनलाल म्हणतात की, आज जरी त्यांचे डिझाइन नोंदणीकृत असले तरी देशाच्या कोणत्याही बाजारात विकल्या जाणा-या थ्रेशर त्यांच्या डिझाइनची नक्कल आहेत. आज त्यांच्या कार्यशाळेत तयार करण्यात आलेल्या थ्रेशरला मोठी मागणी आहे. मदनलाल सांगतात की,“ जेंव्हा मी थ्रेशर विकण्याचे काम सुरू केले होते, तेंव्हा त्याची किंमत एक लाख रुपये होती. पण आज ती तीन लाख रुपये झाली आहे.” आज मदनलाल यांच्याकडे शिवशंकर मदनलाल कृषीयंत्र नामक एक कार्यशाळा सीकर येथे आहे, तर दुसरी जोधपूर जिल्ह्यात आहे जी त्यांचा लहान भाऊ सांभाळतो.

आज मदनलाल यांनी तयार केलेल्या थ्रेशर चार प्रकारच्या मॉडेलमध्ये आकार,क्षमता,आणि सुविधांनुसार मिळतात. ते नेहमी म्हणतात की,“ प्रामाणिकपणा आणि परिश्रमपूर्वक आपले काम करत राहा, संकटे आली म्हणून ते सोडू नका, चांगले दिवस येतील, कुणाचे वाईट चिंतू नका अंती सारे चांगलेच होईल”.