‘द इंडियन ब्रॅण्ड’ देशभक्तीचे नवे स्वरुप

0

सप्टेंबर २०१५ला हैदराबादमध्ये पार पडलेल्या ‘द इंडियन ब्रँण्ड’च्या उद्धाटनप्रसंगी अभिनेत्री सोनम कपूर, चार्मी कौर आणि नागार्जुनने लावलेल्या उपस्थितीवरूनच आपण याच्या आकर्षणाचा अंदाज लावू शकतो. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर अब्जाधीश बनलेले जीवीके समूहाचे प्रमुख जीवीके रेड्डी यांचे पुत्र केशव रेड्डी यांना या भव्य उद्धाटन समारंभाचे श्रेय जाते. खरे तर कोणत्याही फॅशन ब्रॅण्डच्या उद्धाटनप्रसंगी सिने कलाकारांची उपस्थिती एक सामान्य बाब आहे. मात्र इथले विशेष म्हणजे, ‘द इंडियन ब्रॅण्ड’ हा केवळ फॅशन ब्रॅण्ड नसून तो एक सामाजिक उद्योग आहे. या अंतर्गत भारताच्या तिरंग्याच्या रंगाने सुशोभित मोराचा लोगो छापलेल्या टी शर्ट्सची ऑनलाईन विक्री केली जाते.

उद्योगामध्ये सामाजिकता हा या व्यापाराच्या मॉडेलचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक विकल्या गेलेल्या टी शर्टमागे एक टी शर्ट ‘द इंडियन ब्रॅण्ड’ तर्फे एखाद्या गरजू व्यक्तीला दिले जाते. हे मॉडेल अमेरिकी कंपनी ‘टॉम्स शूज ऍण्ड आईवियर’ने स्वीकारल्यानंतर प्रसिद्धीस आले. याद्वारे त्यांनी आपल्या पादत्राणांच्या एका जोडीच्या विक्रीमागे एक जोडी पादत्राणे गरीबांना मोफत देणे सुरु केले.

अमेरिकेत शिक्षण घेत असताना देशभक्तीच्या भावनेबरोबरच एक सामाजिक प्रभाव निर्माण करण्याचा विचार केशव रेड्डींच्या मनात आला. “नवीन जिंदल यांनी स्थापन केलेली ‘फ्लॅग फाऊंडेशन ऑफ इंडिया’ आमच्यासाठी एक महत्वपूर्ण प्रेरणास्रोत होता. एका व्यापारी घराशी संबंधित असल्यामुळे मला स्वतःला काहीतरी नवीन आणि अभिनव करण्याची प्रेरणा मिळाली. अमेरिकमध्ये एका कंपनीने या प्रकारच्या सामाजिक उद्योगाची संकल्पना पहिल्यांदा साकारली आणि तो विचार माझ्या विचारांशी आणि सिद्धांतांशी मिळताजुळता होता,” रेड्डी सांगतात. ‘दि इंडियन ब्रॅण्ड’चे दुसरे सह-संस्थापक आहेत ईशान डोढीवाला, ज्यांचे बऱ्याच वर्षांपासून रेड्डी परिवाराशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

रेड्डी सांगतात की ‘द इंडियन ब्रॅण्ड’ची ही मोहीम भारतीय युवा वर्गामध्ये तसेच मध्यम वर्गामध्ये देशभक्तीची भावना आणि समाजासाठी काहीतरी करण्याची आवड निर्माण करेल. सुरुवातीपासून विविध शहरातील विविध स्तरातील लोकांचा वारंवार अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की याला मोठा बाजार उपलब्ध आहे. सध्या ‘द इंडियन ब्रॅण्ड’ तीन रंगांमध्ये कॉलरवाल्या टी शर्ट्सचे उत्पादन घेते. या टी शर्ट्सची किंमत ९९९ रुपये आहे. “उद्धाटनाच्या दिवशी लोकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला. आमचा सर्व स्टॉक एकाच दिवसात विकला गेला. आम्ही सध्या कुठलीही जाहिरात न करता उत्पादनातील नियमित वाढीसह पुढे जात आहोत. यावरुन हे सिद्ध होते की लोकांना आमचा हा विचार आणि उत्पादन पसंत आहे आणि ते याचा आनंद घेत आहेत,” रेड्डी सांगतात.

भारतात या प्रकारचा विचार पहिल्यांदा घेऊन आल्यामुळे ‘दि इंडियन ब्रॅण्ड’ला आशा आहे की ते या क्षेत्रात एक प्रभावी टप्पा गाठतील आणि त्यासाठी त्यांनी मोठमोठ्या योजना आखलेल्या आहेत. रेड्डी आशा व्यक्त करतात की येत्या तीन वर्षात आम्ही १५-२० उत्पादनांच्या माध्यमातून एक करोड वार्षिक उत्पन्न मिळवत असू आणि १० सामाजिक कार्यांसाठी मदत करित असू. रेड्डींच्या अनुसार, “आता सर्व काही सहज आणि सोपं आहे, मात्र जसा जसा याचा विस्तार होत जाईल, तस तसे आमच्या समोर पुरवठा साखळी सुरळीतपणे चालविणे हे सर्वात मोठे आव्हान असेल.”

भारतीय कपड्यांना लोकांनी केवळ राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशी न घालता नेहमीच वापरावे हा ‘द इंडियन ब्रॅण्ड’चा भव्य दृष्टीकोन आहे.