येस बँकेच्या पुढाकाराने १९२ रेल्वेस्थानकांवर शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध!

येस बँकेच्या पुढाकाराने १९२ रेल्वेस्थानकांवर शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध!

Friday May 26, 2017,

2 min Read

भारतातील पाचवी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील ‘येस बँक’ने जाहीर केले की ते देशात शुध्द पाण्याच्या पध्दतीसाठी यंत्रणा देतील. मध्य रेल्वेच्या सहकार्यातून हा प्रकल्प साकारत आहे. १९२ ‘ड’ आणि ‘ई’ दर्जाच्या रेल्वे स्थानकांवर पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर या महाराष्ट्रातील विभागात आहेत तेथे सीएसआरच्या महत्वाकांक्षी आभियानातून ही सुविधा दिली जात आहे.

‘जीवन आणि पाणी सुरक्षा’ हा येस बँकेच्या सहबांधिलकी अभियानाचा भाग असून भारतीय रेल्वेच्या मदतीने तो साकारत आहे. त्यातून देशात २०१९ पर्यंत एकूण हजार रेल्वे स्थानके जी ‘ड’ आणि ‘इ’ वर्गात येतात त्यांना शुध्द पिण्याचे पाणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सन २०१६मध्ये सुरुवात केल्यानंतर येस बँकेने ८४ ठिकाणी ही सुविधा दिली असून यात कोकणातील रायगड जिल्हा अणि आसपासच्या रेल्वे स्थानकांचा समावेश होता.


image


गेल्या दोन वर्षात जीवन आणि पाणी सुरक्षा या अभियानातून येस बँकेने दावा केला आहे की त्यांनी १३ लाख भारतीयांना शुध्द पिण्याचे पाणी पुरविले आहे. रेल्वे स्थानकांवर शुध्द पिण्याच्या सेवा देण्याच्या व्यतिरिक्त १५० मोक्याच्या ठिकाणी देखील ही यंत्रणा देण्यात आली आहे. दिल्ली जल बोर्डाच्या मदतीने येस बँकेने वॉटर एटीएम ही संकल्पना राबविली आहे, त्यातून झोपडपट्टीतून राहणा-यांना शुध्द पिण्याचे पाणी परवडेल अशा किमतीत उपलब्ध केले जात आहे.

या अभियानाची माहिती देताना बँकेच्या समूह अध्यक्ष नमिता विकास यांनी सांगितले की, “ शुध्द आणि संरक्षित पिण्याचे पाणी ही प्राथमिक महत्वाची गरज असते. जी आपल्या देशात आज पूर्ण केली जात नसल्याचे दिसून आले. मध्य रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रात यासाठी व्यापक प्रमाणात काम सुरु झाले आहे. येस बँक लवकरच शंभर लाख लोकांच्या जीवनात स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पुरविण्याचे लक्ष्य पूर्ण करत आहे, जे सन २०२० पर्यंत जागतिक शक्यतांच्या विकास उद्दीष्टांपैकी एक आहे.”

पाण्याच्या शुध्द स्त्रोतासाठी येस बँकेने सामाजिक स्टार्टअप ज्यांनी या क्षेत्रात अनोख्या पध्दतीने शुध्द पाणि पुरवठा करण्याचे तंत्र विकसीत केले आहे, जे पर्यावरणस्नेही पध्दतीचे असून त्यात वीजेचा रसायनांचा किंवा शून्य वापर केला जातो तसेच त्यातून शून्य टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे. यातील फिल्टर मधील पाण्याचा वापर फूडग्रेड पध्दतीने केला जातो.