साधं-सोपं, व्यापक आणि वेगवान लॉजिस्टीक्ससाठी 'शिपडेस्क' तंत्रज्ञानाचा वापर

लॉजिस्टिक्स उद्योगापुढील समस्यांवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिपडेस्क या कंपनीन उपाय शोधून प्रगती केली आहे. एवढंच नाहीतर ऑनलाईन विक्रीच्या या युगात भरभराटीला आलेला हा उद्योग रोजगाराच्या संधी निर्माण करतोय आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा संदेश शिपडेस्क देतंय.

0

देशातील किरकोळ ऑनलाइन उद्योगजगताच्या बरोबरीनं इ-कॉमर्स लॉजिस्टीक्सही वाढत आहे. २०१८ पर्यंत भारतातील ऑनलाईन किरकोळ उद्योग जगत १८ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तर इ-कॉमर्स लॉजिस्टिक्स उद्योग २०१९ पर्यंत २ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यत पोहोचण्याची शक्यता आहे.

लॉजिस्टिक्सची प्रक्रिया अधिक सुरळीत बनवण्यासाठी कंपन्या लॉजिस्टिक्स विभागात अनेक नवीन प्रयोग करत आहेत तसंच नवीन पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.लॉजिस्टिक्स कायमच इ-कॉमर्सचा एक उप-विभाग राहिलेला आहे आणि अकार्यक्षम असते असं मानलं जातं, पण तंत्रज्ञानाचा वापर केला तर लॉजिस्टिक्स कार्यक्षम होऊ शकतं, असा शिपडेस्कचा दावा आहे.

लिप्जो जोसेफ आणि श्री कृष्णा यांनी २०१४ मध्ये लॉजिस्टिक्सची स्थापना केली. अत्यंत कार्यक्षम आणि वेगवान वाहतुकीसाठी ऑनलाईन व्यापाऱ्यांसाठी उत्तम पर्याय म्हणजे शिपडेस्क...

“ जेव्हा एखादा ऑनलाईन व्यापारी शिपडेस्कला आपला भागीदार बनवतो, तेव्हा त्याच्या ऑनलाईन ऑर्डर्सशी संबंधित सर्व माहिती शिपडेस्कला पुरवली जाते आणि त्यानंतर शिपडेस्क तातडीनं त्यांची टीम वाहतुकीसाठी पाठवते. यामुळे वाहतूक सोपी होते आणि व्यापाऱ्याचा नफा वाढतो”, असं लिप्जो यांनी सांगितलं. तसंच वाहतुकीसाठी ते अगदी कमी किंमत आकारत असल्याचाही त्यांचा दावा आहे. मार्केटसोबत अगदी सहजपणे होणारा संपर्क आणि ई-कॉमर्समुळे ऑर्डरचा सातत्यानं पाठपुरावा करणं, त्याचा मागोवा घेत राहणं आणि परिपूर्ण माहिती ठेवल्यामुळे सर्व व्यवस्थांमध्ये ती वेळेत उपलब्ध होते. या पर्यायामुळे कंपन्यांचा वेळ वाचतो, तसंच पोस्टाच्या वाहतुकीमध्ये होणाऱ्या चुका टाळल्या जातात आणि ग्राहकाला योग्य ती माहिती पोहोचवली जाते. त्यामुळे ग्राहकाच्या मनात व्यापाऱ्याबद्दल विश्वास निर्माण होतो आणि ग्राहकांचा चांगला प्रतिसादही मिळतो.

शिपडेस्ककडे सध्या साडे पाचशेपेक्षा जास्त ग्राहक आहेत आणि त्यात दरमहिन्याला दीडशे ग्राहकांची भर पडत असल्याचा दावा शिपडेस्कने केला आहे. त्यांच्या ग्राहकांमध्ये झिंगोहब, फ्रेकार्ट,बडली.इन यांच्यासह डेलीकॅचर, निव्हीज फॅशन, कमाल्स बुटिक, झाराज बुटिक, या इ कॉमर्स वेबसाईट आणि आपली उत्पादनं विकण्यासाठी विविध ऑनलाईन स्त्रोतांचा वापर करणारे ऑनलाईन विक्रेते या सर्वांचा समावेश आहे. दरमहिन्याला कंपनीच्या वाढीचा दर ४० टक्के आहे.

या उद्योगात जवळपास १ कोटी रुपयांची गुतंवणूक करण्यात आली आहे. यातील जास्तीत जास्त भांडवल हे विक्री, विपणन आणि तंत्रज्ञानावर खर्च करण्यात आले आहे. ऑनलाईन पुनर्विक्रेत्यांवर सध्या त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे आणि लवकरच ते छोट्या उद्योग क्षेत्रातही उतरण्याची शक्यता आहे.

वाहतुकीसाठीच्या मालावरील शुल्क आणि सदस्यत्वातून मिळणारे उत्पन्न हे या उद्योगातील उत्पन्नाचे दोन स्त्रोत आहेत.

आव्हानं आणि प्रगतीच्या संधी

क्षमता, एकाच प्रकारच्या मागणीचा अभाव आणि अकार्यक्षमता ही लॉजिस्टिक्स उद्योगासमोरील सगळ्यात मोठी आव्हानं आहेत. पण तरीही सुधारणा आणि मानवी हस्तक्षेप कमी केला तर यातील काही अडचणी दूर होऊ शकतात. याबाबत लिप्जो म्हणतात “ आम्ही सातत्यानं याच समस्यांवर गुंतवणूक करत आहोत आणि आम्ही केलेल्या प्रगतीमुळे या उपायांची विश्वासार्हताही सिद्ध होतेय.”

वाढीच्या संधीबाबत बोलताना ते म्हणतात, भारतात १० लाख ऑनलाईन विक्रेते आहेत आणि प्रत्येक विक्रेता हा शिपडेस्कसाठी उपयुक्त बाजारपेठ आहे. देशाबाहेरही इतर ठिकाणी या उपायाचा विस्तार केला जाऊ शकतो. याशिवाय छोट्या उद्योग व्यवसाय जगतात असंघटित लॉजिस्टिक्स मोठी भूमिका बजावते, पण त्याकडे अजून पुरेसं लक्ष दिलं गेलेलं नाही. ही सर्व बाजारपेठ विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात.

बाजारपेठ आणि स्पर्धा

जागांचे व्यवहार करणाऱ्या सिंघी एडव्हायजर्स या बुटीक गुंतवणूक बँकेने नुकत्याच तयार केलेल्या लॉजिस्टिक्स अहवालानुसार लॉजिस्टिक उद्योग गेल्या पाच वर्षात वार्षिक विकास दराच्या १६ टक्क्यांनी वाढलाय. पण फक्त ६ टक्के संघटित उद्योजक असलेलं हे क्षेत्र अजूनही विस्कळीत आहे. एका अहवालानुसार २०१३ मध्ये जागतिक पातळीवर लॉजिस्टिक्स उद्योगाची उलाढाल ४ ट्रिलियन अमेरिकन डॉलर होती जी जागतिक सकल  उत्पनाच्या १० टक्के होती.

या उद्योगात फेडेक्स, ब्लूडार्ट, दिल्हीव्हेरी, इकॉम एक्प्रेस आणि इतर लॉजिस्टिक्स कंपन्या आहेत. इ कार्ट, गोजावस यासारख्या मंडईतील आणि स्थानिक कुरियर कंपन्या या क्षेत्रात आहेत.

स्पर्धेच्या बाबतीत लिप्जो म्हणतात की या क्षेत्राचा विस्तार होत असल्याने इथं आता सर्व प्रकारच्या स्पर्धेला वाव आहे. यातील प्रत्येक स्पर्धकाने आपलं एक वैशिष्ट्य निर्माण करुन त्य़ात अधिकाधिक सुधारणा कशी करता येईल याचे प्रयत्न केले पाहिजे. ही आव्हानं कशी पेलायची याचा मार्गदर्शक आराखडाच आपल्याकडे आहे आणि ही स्पर्धाच या क्षेत्रात स्थैर्य आणेल असंही ते सांगतात.

या उद्योगाचं मोबाईल अँप नुकतंच आलंय आणि उत्पादनाचा मार्गदर्शक आराख़डा तयार करण्यात विश्लेषण महत्वाची भूमिका बजावणार आहे.

वेबसाईट - shipdesk.in