भारतीय हवाई दलाने बांग्लादेशात रोहिंग्या मुस्लिम निर्वासितांना मदत साहित्य पोहोवचिले!

भारतीय हवाई दलाने बांग्लादेशात रोहिंग्या मुस्लिम निर्वासितांना मदत साहित्य पोहोवचिले!

Monday September 18, 2017,

2 min Read

भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानांनी पंचावन्न टन मदत साहित्य बांग्लादेशातील रोहिंग्या मुस्लिमांना पोहोचविले. हवाई दलाच्या अधिका-यांनी सांगितले की, मालवाहू हवाई दलाच्या विमानांनी गुरूवारी काही मदत साहित्य पोहोचविले आहे आणि त्यांनी आणखी साहित्य शुक्रवारी देखील तयार केले आहे. सी -१७ ग्लोबमास्टर बुधवारी अल्पावधीतल्या सूचनेनंतर दिल्लीतून सज्ज झाली आणि लोकांच्या रोजच्या जीवनावश्यक गरजेच्या वस्तू जसे की तांदूळ, डाळी, साखर, मिठ खाद्यतेल,अन्न पाकिटे, मच्छरदाण्या, आणि इतर सामुग्री चितगाव विमानतळावरून पोहोचविण्यात आली. 


image


पहिले विमान गुरूवारी सकाळी दिल्लीहून निघाले आणि दुपारी १२.४५ वाजता त्याने चितगाव विमान तळावर मदत साहित्य दिले. बांग्लादेशात असलेल्या लाखो रोहिंग्या मुस्लिम निर्वासितांना हे साहित्य पोहोचविण्यात आले. हे साहित्य आणखी काही फे-यांनी देखील पोहोचविण्यात येत आहे. भारत सरकारच्या ‘ऑपरेशन इन्सानियत’चा हा भाग आहे.

रोहिंग्या निर्वासितांच्या ताज्या मृत्यूची संख्या ९७ वर पोहोचली आहे ते बांग्लादेशात निर्वासित म्हणून ब्रम्हदेशातील राखीन येथे उसळलेल्या वांशिक दंगलीनंतर परत जात आहेत. सुमारे ३७० हजार रोहिंग्यानी बांग्लादेशात आसरा घेतला आहे, ऑगस्ट महिन्यात ब्रम्हदेशाच्या उत्तर भागातून वांशिक दंगली झाल्या, त्यात आराकान रोहिंग्या मुक्ती दलाच्या लोकांनी लष्करी राजवटी विरोधात सरकारी आस्थापनांवर हल्ले केले. 


image


दरम्यान, एआरएसए ने शनिवारी महिन्याभराची युध्दबंदी जारी केली, जेणे करून मानवीय दृष्टीकोनातून दिली जाणारी मदत घेवून येणा-यांना प्रवेश मिळावा, जी मदत मान्यमार सरकारने नाकारली होती. मागील वर्षी आक्टोबर मध्ये देखील तेथे अशाप्रकारे वांशिक हिंसाचार उसळला होता. लष्कराच्या आक्रमक राजवटीला विरोध म्हणून अशा प्रकारचे हल्ले तेथे वारंवार केले जातात. त्यात आजवर ८०हजार रोहिंग्या मारले गेले आहेत.

सध्याच्या यादवी मध्ये सुमारे तीन लाख ते पाच लाख रोहिंग्या मुस्लिमांनी बांगलादेशात पळ काढला आहे. त्यापैकी केवळ ३२००० जणांनाच निर्वासितांचा दर्जा देण्यात आला आहे. जे कॉक्स बाजार जिल्ह्यात निर्वासित छावणीत राहात आहेत.