कोणतेही शालेय शिक्षण न घेता हा चिमुरडा बोलतो दहा परदेशी भाषा

0

मुंबईच्या हॅगिंग गार्डनसमोर मोराची पिसे विकणारा हा लहानगा एक नाही, दोन नाही तर तब्बल १० विविध परप्रातींय भाषा बोलतो. वाचून आश्चर्य वाटेल पण ही वस्तूस्थिती आहे. रवी कुमार हा भारतीय भाषेव्यतिरिक्त स्पॅनिश, फ्रेंच, इटालियन, हेब्रेउ, अरेबिक आणि जपानी या भाषा बोलून दाखवतो.

एखाद्या आयआयएम पदवीधराला देखील इतक्या भाषा अवगत करणे शक्य होत नाही तिथे हा चिमुरडा कोणत्याही शाळेत न जाता अगदी सहजपणे या भाषा बोलतो. रवी हा खूप गरीब घरातील मुलगा आहे. त्याच्या आजीसोबत मोरपीसे विकून कसेबसे आपले पोट भरतो. हॅगिंग गार्डन येथे येणाऱ्या परदेशी पर्यटकांचे बोलणे आणि संभाषण ऐकून त्याने या सर्व भाषांचे ज्ञान आत्मसात केले.