एक चहा बनविणारा अनामिकपणे जागवत आहे, झोपडीतील सत्तर मुलांमध्ये शिक्षणाची ज्योत! 

0

दुष्यंतने म्हटले होते की “खरा भारत तर पदपथावर आबाद आहे.” हीच बाब योग्य आहे, खरा भारत डी प्रकाश राव यांसारख्या कित्येक नायकांमुळे आबाद आहे. प्रकाश राव आपल्या अनेक समस्या आणि मर्यादित उत्पन्न असूनही आपल्या प्रयत्नांमुळे झोपडीच्या अंधाराला शिक्षणाच्या उजाळ्याने दूर करण्याच्या अभियानात तन मन धनाने सामील आहेत. 

ओरिसा येथील कटक शहरातील ५८वर्षीय डी. प्रकाश राव यांनी या वयातदेखील स्वत:ला झोपडीतील मुलांना साक्षर बनविण्याच्या अभियानाला पूर्णपणे समर्पित केले आहे. वयाच्या या टप्प्यात जेव्हा सामान्य व्यक्ती आपल्या वयाच्या अखेरच्या टप्प्याबाबत विचार करत असतो. प्रकाश राव जवळपास १०वर्षांपासून रोज पहाटे  चार वाजता उठतात. उठल्यानंतर ते घरातील सर्व कामे आटपून कटकच्या बक्षीबाजार येथील आपल्या पदपथावरील चहाच्या टपरीवर जातात. 

ही केवळ एक टपरी नाही, ज्यामुळे राव यांचे कुटुंब आणि घर चालते. तर जवळपासच्या झोपडीमध्ये राहणा-या लोकांच्या मुलांच्या स्वप्नांना सत्यात उतरविणारे ज्ञानमंदिरही आहे. झोपडीतल्या मुलांच्या मनात पसरलेल्या असाक्षरतेच्या अंधारातून त्यांच्या उज्वल जगातून तारुन नेणारा त्राता आहे. या दुकानाच्या माध्यमातून चहा विकून डी. प्रकाश राव आपल्या उत्पन्नातील ५०टक्के झोपड्यांमध्ये राहणा-या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात. 

शाळेत शिकणा-या गरीब मुलांना कुपोषणापासून वाचविण्यासाठी प्रकाश सर्वांना दुध पिण्यासाठी देतात. राव यांचे म्हणणे आहे की,“मुले दुध पिऊनच सुदृढ राहू शकतील. मुले स्वस्थ आणि सुदृढ राहतील तर, त्यांचे लक्ष शिक्षणात राहील. जेव्हा शिक्षण घेतील, तेव्हा ते केवळ शिक्षितच होणार नाहीत, तर चुकीच्या रस्त्यावर जाण्यापासून देखील वाचतील. येणारी पिढी देखील चांगली होईल.”

आपल्या या प्रयत्नात राव सलग त्यात मन लावून काम करत आहेत. प्रत्येक वातावरणात राव यांचा प्रयत्न आहे की, कशाप्रकारे मुलांना साक्षर करता येईल. नि:स्वार्थ भावनेने मुलांच्या सेवेमार्फत समाज आणि देशाच्या सेवेत तत्पर आहेत. अनोळखी अंधारात देखील शिक्षणाची ज्योत जागवत डी प्रकाश राव आपल्या या अभियानालाच समर्पित आहे. 

असे म्हणतात की, शिक्षणामार्फत तुम्ही कुठल्याही देशाची दिशा आणि दशा सुधारू शकता. आजच्या या काळात जेथे लोक समाजात लहानसे योगदानदेखील वाढवून चढवून प्रचारित करतात, तेथेच डी प्रकाश राव अनामिक होऊन देखील आपल्या प्रशंसनिय योगदानाने शिक्षणाच्या माध्यमातून गरीब मुलांचे भविष्य साकारण्यात महत्वाची भूमिका साकारत आहेत. 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

एका ड्रायव्हरचा इंजिनिअर मुलगा ‘जिज्ञासा’ मार्फत देत आहे गरीब मुलांना शिक्षणाची उत्तम संधी  

इंजिनीअरची नोकरी सोडून गरजवंतांसाठी ते बनले टॅक्सी ड्रायव्हर  

अशी एक शिक्षिका ज्यांनी लग्नाच्या दिवशी सुद्धा शिकवले मुलांना 


लेखक : कुलदीप भारव्दाज
अनुवाद : किशोर आपटे