निराशेच्या गर्तेतून बाहेर पडून यू ट्यूबच्या जगातील सर्वाधिक मानधन घेणा-या “सुपरवूमन”ची कहाणी

निराशेच्या गर्तेतून बाहेर पडून यू ट्यूबच्या जगातील सर्वाधिक मानधन घेणा-या “सुपरवूमन”ची कहाणी

Monday March 13, 2017,

4 min Read

निराशा आणि चिंता खूप वाढल्या आहेत, पाच कोटी भारतीय याच्या फे-यात आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. सुमारे ३.८ कोटी लोक भारतात चिंता आणि नैराश्य यांची २०१५ मध्ये शिकार झाले होते. यापैकी बहुतांश प्रकरणात त्यांनी आत्महत्या केल्या, जी भारतात धोक्याच्या पातळीपर्यंत जाणारी संख्या बनली आहे.

इंटरनेटवर सर्वाचे आकर्षण बनलेल्या लिली सिंग सुपर वूमन, या सध्या यू ट्यूबच्या जगातील सर्वाधिक मानधन घेणा-या ठरल्या आहेत. त्यांची कहाणी आपल्या सा-यांना प्रेरणादायी अशीच आहे.


Image source: Tubefilter

Image source: Tubefilter


लिली यांचा जन्म टोरोंटो, कॅनडा मध्ये झाला. तेथेच त्यांचे बालपण गेले. मालविंदर सिंग आणि सुखविंदर सिंग यांच्या पोटी त्यांनी २६ सप्टेंबर १९ ८८मध्ये जन्म घेतला, त्यांचे बालपण शिख परंपरेत गेले. घरात सर्वात लहान असल्याने, त्यांचे सा-यानी लाड कोड पुरवले. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी लॅस्टर बी पियर्सन कॉलेजिएट संस्थेतून २००६ पदवी उत्तिर्ण केली, तसेच त्यांनी यॉर्क विद्यापीठातून २०१०मध्ये मानस शास्त्राची पदवी घेतली. महाविद्यालयाच्या अखेरच्या वर्षी लिली यांचे आजोबा ज्यांच्याशी त्यांची खूपच जवळीक होती, निधन पावले. हा धक्का सहन न झाल्याने त्याना नैराश्य आले. पदवी मिळाल्यानंतरही त्यांनी वर्षभरासाठी सुट्टी घेतली आणि भविष्यात पुढे काय करायचे त्यांना उमगत नव्हते, एका मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितले की, “ मला आठवते की, मी अर्ज लिहिला आणि माझ्या शिक्षकांना तो द्यायला जात होते त्यावेळी, अरे देवा! मी हा अर्ज नाही दिला पाहिजे, मी चार वर्षापासून जे केले ते वाया कसे घालवू? असा विचार मनात आला. त्यावेळी तो अर्ज पाठविताना मी यू ट्यूबवर माझा व्हिडिओ तयार केला आणि गंभीरपणे तसेच इतरही काही व्हिडीओ तयार केले. त्यावेळी मी चालत माझ्या पालकांजवळ गेले आणि ‘हे मी ठरविले आहे की, मी शिकायला जात नाही, आणि त्याऐवजी मी यू ट्यूब व्हिडिओज बनविणार आहे!’ असे सांगितले.

हे सारे कसे घडले ते सांगताना, त्यांनी ते सारे बॉलिवूडच्या चित्रीकरणासारखे रंगवून सांगितले, त्या म्हणाल्या की, “ मी माझ्या कुटूंबियांसोबत मेक्सिकोमध्ये सुट्टीवर होते, आणि चालण्यासाठी निघाले होते, हे अगदी बॉलिवूड सारखे होते, समुद्रकिना-यावर बसणे, आणि स्वत:शीच बोलणे,---- “ तुला कशाने आनंद होतो? तुला काय करायचे आहे?” आणि उत्तर होते : लोकांचे मनोरंजन, ज्यातून मला आनंद मिळेल.” ‘ सध्या मी काय करते आहे ज्यातून मला त्यात सहभागी होता यावे? मी यू ट्यूब व्हिडिओज तयार करत आहे. तर मला माझे सारे प्रयत्न केले पाहिजेत जेणे करून मला हवे ते मिऴेल.’ त्यानंतर मी घरी आले, आणि यू ट्यूब व्हिडीओ तयार करण्यास सुरूवात केली.”

एकामागेएक, त्यांचे व्हिडीओ लोकप्रिय झाले, त्यांनी यू ट्यूबच्या माध्यमातून कोट्यावधी डॉलर्स कमाविले. त्यांच्याजवळ एक पध्दत होती, ‘सुपरवूमन’ बालपणीच्या कल्पनेतून आलेली, त्यात तिच्या छातीवर अदृश्य ‘एस’ आहे, तिच्या मनात येईल ते ती सहज लिलया करू शकते. त्यांचे व्हिडिओ मुख्यत: पारंपारीक पंजाबी आणि भारतीय संस्कृती आणि पध्दती दर्शवितात, की देशी जगात गोष्टी कशा घडतात. त्यांचा आता सध्या लोकप्रिय व्हिडिओ आहे ‘ हावू गर्लस गेट रेडी’ आणि त्यांच्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांचे काल्पनिक पालक परमजीत आणि मनजीत ज्या दोन्ही भूमिका लिली स्वत: च करतात. त्यांनी त्यांच्या गणमान्य व्यक्तिंच्या भेटीचे व्हिडिओ सुध्दा केले आहेत. जसे की मिशेल ओबामा, शाहरूख खान, प्रियांका चोप्रा, व् डायने जॉनसन (द रॉक) अॅरिना ग्रँन्डे, शेरीन, आणि सेलिना गोमेज.

अलिकडेच, २५ सप्टे.२०१६रोजी, जी त्यांच्या जन्मदिनापूर्वीची रात्र होती, लिली यांच्या वाहिनीने डायमंड प्ले केला, त्यात त्यांना दहा कोटी प्रेक्षकांनी दाद दिली. जो त्यांच्या जीवनात मैलाचा दगड ठरला आहे. त्यांनी लगेच दुस-या वाहिनीसोबत करार केला, ‘सुपरवूमन व्लाॅग्ज’ ज्यांचे सध्या १.८ कोटी ग्राहक आहेत, आणि २१० कोटी दर्शक. लिली यांनी अनेक लाइव्ह कार्यक्रम केले आहेत. आणि काही हॉलीवूड सिनेमात भूमिका केल्या आहेत.

२०१४मध्ये, त्यांची वाहिनी सुपर वूमन ला ३९वा क्रमांक मिळाला, ज्यात शंभर न्यू मिडिया रॉक स्टार टॉप वाहिन्या होत्या, २०१५मध्ये पिपल नियतकालिकेत लिली यांच्यावर लेख दिला, ज्यात 'पहावेच असे काही' मध्ये त्यांचा समावेश केला. त्यांना त्याचा एम टिव्ही पुरस्कार देखील मिळाला. आणि टिन चॉईस अॅवॉर्डसाठी त्यांचे नामांकन झाले होते. लिली यांनी पहिला स्ट्रीमी पुरस्कारही जिंकला होता, २०१५मध्ये फोर्ब्ज ने त्यांना जगातील सर्वाधिक कमावित्या यू ट्यूबर म्हणून आठवा क्रमांक दिला होता, फास्ट कंपनी मध्ये त्यांना शंभर क्रियाशील व्यक्तींमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. २०१६मध्ये त्या आवडत्या यू टयूब स्टार म्हणून विजेत्या ठरल्या होत्या.

लिली या दिलेला शब्द पाळणा-या म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओच्या शेवटी त्या उल्लेख करतात की त्या नवा कोणता व्हिडीओ येत्या सोमवारी किंवा गुरूवारी घेवून येत आहेत आणि त्या दिलेल्या शब्दाला जागतात. २०१६मध्ये लिली यांनी ७.५ कोटी डॉलर्स कमाविले, त्यामुळे त्या सर्वाधिक कमावत्या महिला यू ट्यूबर आणि तिस-या सर्वाधिक कमावित्या व्यक्ति ठरल्या आहेत.

एका वृत्तानुसार लिली यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हे विचार व्यक्त केले आहेत.

“ मी व्हिडीओ केला तो दहा स्मितहास्याच्या कारणांसाठी, आणि तो आवडला नाही. यातून हेच निदर्शनास येते की, येथे काहीजण असे आहेत ज्यांनी तुम्हाला दोष दिला, हरकत नाही तुम्ही जे केले ते केले. कलाकार म्हणून किंवा मनोरंजनासाठी तुम्ही तेच केले आहे ज्यावर तुमचा जास्त विश्वास आहे.”

“तुम्ही फार काही करू शकत नाही. जर तुम्ही म्हणाल ‘ मला कुणाला दोष द्यायचा नाही’ तर मग स्टेजवर जावूच नका. फक्त स्वत:ला विचारा, ‘ मी योग्य विचार करतो आहे का?’ मी जो विचार करतो तो हानीकारक आहे का?’ आणि मला वाटते का की हे सारेजण ऐकू शकतात? जरी मी खरा असेन तर मी गेले पाहिजे आणि हे केले पाहिजे”