जग केवळ ज्ञानावर चालत नाही, कार्यवाही करावी लागते

जग केवळ ज्ञानावर चालत नाही, कार्यवाही करावी लागते

Wednesday November 18, 2015,

6 min Read

जीथामित्र्हा थथाचारी हे डिजिटल मार्केटिंगवर आधारित असलेली आपली नवी स्टार्टअप कंपनी चालवतात. या पूर्वी त्यांनी ‘डिजिटल मार्केटिंग’ या ग्रुपमध्ये ५ वर्षे ‘स्ट्रॅटेजी कन्सल्टंट’( रणनीती सल्लागार) या पदावर त्यांनी काम केले आहे. इतरांना ज्ञान देण्याचे काम असलेली आपली नोकरी करत असताना खरे काम हे ज्ञानानंतर सुरू होते याची त्यांना जाणीव झाली. आणि आता ही जाणीव अधिक खोल झाल्यामुळे आपली नोकरी सोडून त्यांनी स्वत:ला कामाला जुंपून घेतले. ‘ज्ञानी’ या अवस्थेनंतर ‘कामसू’ बनण्याची त्यांची कहाणी जाणून घेऊ या त्यांच्याच शब्दात.


image


नव्याने सुरू होणा-या स्टार्टअप कंपन्या आणि उद्योग क्षेत्रात स्ट्रॅटेजी कन्सल्टंट ( रणनीती सल्लागार) खूपच बदनाम आहेत. ‘मॉनिटर’ ग्रुपमध्ये( मायकल पोर्टर यांनी रणनीती सल्ला देणारी सुरू केलेली कंपनी) वर्षांहून अधिक काळ काम केल्यानंतर ‘स्ट्रॅटेजी कन्सल्टंट्स’ बाबत मी भरपूर तक्रारी ऐकल्या. त्या अशा -

एक युवा सल्लागार उद्योग जगतातील दिग्गज उद्योजकांना एक उपयुक्त गोष्ट कशी सांगू शकतो?

जी योजना कार्यान्वित करण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी लागतो, अशी योजना काय कामाची?

स्लाईड्स बनवण्याव्यतिरिक्त सल्लागार काहीही काम करत नाहीत

जर तुम्हाला निर्णय घ्यायचेच नसतील तर मग नक्कीच तुम्ही लोकांना सल्ले देऊ शकता

तुम्ही तुमचा पैसा कधीही तोंडाजवळ ठेवत नाहीत.( मला वाटते की पॉल ग्रॅहम यांना याचा अर्थ माहित आहे. त्यामुळेच त्यांनी व्यवस्थापन सल्लागाराला ‘गेमिंग द सिस्टम’ची एक आवृत्ती म्हटले आहे.)

मी माझ्या कार्यकालात माझे मित्र, नातेवाईक आणि दूरच्या हवाई प्रवासादरम्यान केलेल्या चर्चेद्वारे सहप्रवाश्यांकडून देखील अशा प्रकारची अनेक वक्तव्ये ऐकली आहेत. या सर्व तक्रारींचा आम्ही ‘मॉनिटर ग्रुप’मध्ये कशा प्रकारे सामना केला याचाही अनुभव घेतला आहे. स्थापित झालेल्या उद्योगांमधील मोठ्या कंपन्यांना सल्ले देण्याच्यावेळी याच अनुभवाने मला विरोधाभास दाखवला. याच स्थितीने मला स्टार्टअपसाठी प्रोत्साहित केले.


image


१. आपण कोण आहात आणि आपल्याला कशाची माहिती आहे या गोष्टींशी काहीएक घेणे देणे नाही. आपल्याला गरज असते ती एका गृहितकाची आणि अधिक शिकण्याच्या तयारीची.

इंजिनियरिंगच्या पार्शभूमीबरोबर जे तुम्हाला माहित आहे तिथून सुरू करणे आणि निष्कर्षापर्यंत पोहोचणे असा प्रकारे मी निगमनात्मक (deductive) दृष्टीकोन ठेऊन चालत असतो. परंतु, संकल्पनेवर आधारित, विवेचनात्मक दृष्टीकोन ( inductive approach) दुस-या टोकापासून सुरू होतो- यात आपण एखादा अनुमान लावता आणि त्यानंतरच त्याचे परिक्षण सुरू करता.( आणि गरजेनुसार त्यात सुधारणा करता). उद्योगांना समझण्यासाठी ही डेटावर आधारित शिकण्याची पद्धत खूप सहाय्यक आहे. यासाठी कंपन्या आपल्या विश्वासाला दृढ करता यावे, त्याचे परिक्षण करता यावे आणि उद्योग कशा प्रकारे प्रगती करत आहे हे समजून घेण्यात कंपनी एक्झिक्युटीव्हला मदत व्हावी यासाठी स्ट्रॅटेजी कन्सल्टंटची( रणनीती सल्लागार) नियुक्ती केली जाते.

अनुमान लावणे, चुकीचे सिद्ध करणे आणि त्या चुकांना सुधारणे, या प्रक्रियेला प्रकल्पाचे काम तडीस नेताना पुन्हा पुन्हा केल्यामुळे आपल्या स्वत:च्या अज्ञानीपणात चांगली सुधारणा होते. स्टार्टअप सुरू करण्याच्या वेळी ही गोष्ट अत्यंत मौल्यवान असल्याचे मला जाणवले- मला भलेही योग्य उत्तर माहित नसेल, परंतु आपल्या विश्वासाचे परिक्षण कसे करावे आणि आपल्या पद्धतीनुसार कसे काम करावे हे मला चांगलेच माहित आहे.

२. अनिश्चिततेसोबत जुळवून घेण्याची गरज

रणनीती आणि अनुपालन सल्लागार यादरम्यान असलेला मतभेद हा कालमर्यादेचा आहे – रणनीती ही अधिक दीर्घ काळासाठी आहे. ज्या औद्योगिक कलांवर आपण अवलंबून असता, ते कल तीन ते चार वर्षांपर्यंतच राहतात – काही लोकांनी तर या तीन ते चार वर्षांच्या कालावधीत सुरूवात देखील केलेली नसते. यामुळे तिथे अस्पष्टता असते. परंतु, तरीसुद्धा आपल्याला एक प्रकारे जुगारातील डाव खेळावे लागतात आणि त्यांना योग्य किंवा कायदेशीर( किंवा बेकायदेशीर) ठरवण्यासाठी काही रचनात्मक पद्धती शोधून काढाव्या लागतील- उद्योग जगातील तज्ज्ञांशी बोलणे, संबंधीत उद्योगाचे कल आणि समान पद्धतीची अर्थव्यवस्थेच्या विकासावर दृष्टी टाकणे, इत्यादी. परंतु, यातील काहीही आपल्याला पुर्ण उत्तर देणार नाही – तुम्हाला स्वत:ला निर्णय घेऊन आपल्या निर्धारीत लक्षानुसार यातील सर्वोत्कृष्ट पर्याय निवडावा लागेल. यासाठी, आपल्याला योग्य उत्तर माहित नाही म्हणून नव्हे, तर आपल्याला पूर्णपणे निश्चित उत्तर कधीच मिळू शकत नाही.

आणि अशाच प्रकारे माझ्या स्टार्टअपमध्ये देखील आहे – माझे उत्पादन लोकांना पसंत पडेल किंवा पसंत येणार नाही, किंवा मग सर्वात वाईट म्हणजे टाळले जाईल – त्या उत्पादनाचा सुरूवातीला वापर करणारांमध्ये, नंतर त्यांचे अनुकरण करणारांमध्ये आणि शेवटी शिल्लक राहिलेल्या लोकांमध्ये( जर मी तितका दूर जाऊ शकत असेन तर ) – हे मला माहित नाही. परंतु, मी कठोर परिश्रम करत राहणार. मी योग्य मार्गावर आहे हे निश्चित करण्यासाठी छोटी छोटी परिक्षणे करण्याचे मार्ग शोधून काढेन.

३. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे हा पहिला उद्देश

थोड्याकाळासाठी इतर गोष्टी बाजूला सारत केवळ ग्राहक सेवा हीच सल्ला देण्याच्या व्यवसायाची प्राथमिकता आहे- मी ‘मॉनिटर’मध्ये काम करत असताना सहका-यांकडून नेहमीच ऐकले आहे. मग भले ते विकेंडमध्ये अचानक अंगावर पडलेले काम असो किंवा मग अवेळी कार्यक्षेत्राची रपेट मारणे असो, जर या गोष्टींपासून ग्राहकांना फायदा होत असेल तर तुम्ही ते करताच.

आज माझ्याकडे थेट उपभोक्त्याशी जोडलेले ( consumer facing) अँड्रॉईड अॅप आहे. प्रत्येक थोड्या कालावधीनंतर मला एक कठोर समिक्षा किंवा अनावश्यक कठोर असे ‘१-‘ हे स्टार रेटिंग मिळते. परंतु, अयोग्य वापरकर्त्याला बरे वाईट बोलणे हे माझे काम नव्हे – जर त्यांना चांगली सेवा देण्याचे माझे लक्ष असेल, तर मला विश्वास आहे की मला भविष्यात या रेटिंग्जची चिंता करण्याची काहीएक आवश्यकता राहणार नाही.

४. संक्षिप्तता हा संपर्काचा आत्मा आहे

निंदक जेव्हा म्हणतात की सल्लागार भरपूर पॉवर पॉईंट स्लाईड्स बनवतात तेव्हा ते बरोबर बोलत असतात. बच्चू! मी भरपूर स्लाईड बनवल्या होत्या!..... खरे तर, स्लाईडबाबत योग्य गोष्ट म्हणजे स्लाईड्समध्ये जागा खूप मर्यादित असते, स्लाईड्स या मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्यूमेंटरी सारख्या नसतात. यामध्ये आपणे म्हणणे आपल्याला संक्षिप्त स्वरूपात मांडावे लागते. आणि आपले म्हणणे का महत्त्वाचे आहे ही गोष्ट सर्वात पहिले सांगावी लागते ( किंवा जसे मॉनिटरमध्ये सांगितले जाते त्या प्रमाणे तुम्हाला ‘सो व्हॉट’ ला समोर आणावे लागते)

मी स्लाईड बनवण्याच्या कामात १० तास खर्च केले आहेत. त्या कामावर देखील आम्ही वर्चस्व प्राप्त करू शकलो नाही. ( ग्लॅडवेल चुकीचा होता), परंतु मुख्य संदेशाला कमीत कमी शब्दात कशा प्रकारे व्यक्त करावे हे मला चांगलेच माहित आहे. आणि या स्टार्टअपसाठी हे खूपच उपयोगाचे कौशल्य आहे. संभाव्य ग्राहकांचे ई-मेल असो, फेसबूक जाहीरातीसाठी प्रभावी कॉपी असो किंवा मग कमी वेळेत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधण्यासाठी उंच आवाजातील बोलणे असो, संक्षिप्तता स्टार्टअपसाठी अमूल्य अशीच आहे.


image


५. कल्पना व्यर्थ आहेत, कार्यवाही हीच किल्ली

मला माहित आहे की हे जागतिक असल्याचे वाटते ( आणि ते खरेच आहे, मी खोटे बोलणार नाही), एखाद्या रणनीतीची तुम्ही अंमलबजावणी करणे सुरू केले की मग त्या रणनीतीला काही अर्थ उरत नाही ही गोष्ट पुढे मला एकेक प्रकल्पाने चांगलीच शिकवली. आम्ही एक रणनीती तयार केली आणि सोडून दिली. काही महिन्यानंतर ग्राहक आमच्याकडे येऊन सर्वकाही बरबाद झाल्याचे म्हणाला. तुम्ही पुन्हा आमची मदत करणार का असे त्यांने आम्हाला विचारले. आम्ही नक्कीच यात चांगली मदत करू शकतो – एक अशी योजना तयार करा जी ग्राहक मोठ्या आवडीने लागू करु शकतील आणि ही योजना ग्राहकांच्या टीमला समजावून सांगणे ही आमची जबाबदारी होती.

परंतु, माझ्यासाठी ध़डा हा होता, की आपली योजना विशेष महत्त्वाची नाही, ही योजना सुरू करणे हे काही रॉकेट सायन्स नाही, परंतु तुम्हाला ती योजना प्रभावीपणे कार्यान्वित करण्याची गरज असते. योजना व्यावहारिक असण्याची गरज असते.

व्यवस्थापन सल्ला पद्धतीसोबत सतत खेळत राहिले पाहिजे असे पॉल ग्रॅहम ज्या लेखात सांगतात त्याच लेखात त्यांनी महाविद्यालयांच्या सारखेपणाचा देखील उल्लेख केला आहे. भलेही मी त्यांच्या पहिल्या वक्तव्याशी सहमत नसेन, परंतु त्यांचे दुसरे वक्तव्य पूर्णपणे बरोबर आहे. जर तुम्हाला तुमचा स्वत:चा उद्योग उभा करायचा असेल, तर '‘स्ट्रॅटेजी कन्सल्टंट कंपनी' तुम्हाला शिकवण्यासाठी सर्वात चांगली शाळा आहे.



लेखक : जीथामित्र्हा थथाचारी

अनुवाद : सुनील तांबे