जाधवपूरच्या विद्यार्थी निवडणुकीसाठी समलिंगी उमेदवाराने नामांकन दाखल करून निकष ओलांडले!

0

गेल्या काही वर्षात भारतीय न्याय व्यवस्थेने जरी कितीही सुधारणावादी निर्णयातून पावले उचलली तरी अनेकांच्या मनात पहिला विचार येतो तो कलम ३७७चा. २०१३ मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याच्या हवाल्याने, दिल्ली उच्च न्यायालयाचा यापूर्वीचा निवाडा बाद ठरवून समलिंगी संबंधाना मान्यता दिली आहे. त्यामुळे देशातील समलिंगी नागरिकांच्या मनात उत्साहाची लाट पसरली आहे, ज्यांनी यासाठी कायदेशीर लढा दिला होता. मात्र इथे आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर काही सांगायचे नसून, भारताच्या नेहमी गौरवल्या जाणा-या संस्कृतीबाबत सांगायचे आहे. काही विषय असे आहेत की, ज्यांच्यामुळे कदाचित भारताच्या या संस्कृतीच्या तथाकथित सौंदर्याला आणि शुध्दतेला बट्टा लागू शकतो.

असे असले तरी हे देखील उत्साहवर्धक आहे की देशातील सध्याच्या तरूणपिढीने देशाच्या विद्यापिठांच्या विद्यार्थी संघटनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त समलिंगीना स्विकारण्यास सुरूवात केली आहे. त्यात प्रथमच एका लेस्बियन उमेदवाराने कोलकाता येथील जाधवपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटना निवडणूकीत जानेवारी महिन्यात नामांकन दाखल केले आहे. यावर्षी झालेल्या या निवडणुकांचे हे वैशिष्ट्य राहिले की, त्यात सर्व लैंगिक प्रकारांच्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात आले.


अस्मिता सरकार, या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या सदस्य आहेत, त्यांनी सह सरचिटणीस पदासाठी कला शाखेतून निवडणुक लढविली.

कोलकाता, येथील बरदवान येथे त्यांचा जन्म झाला आहे, आणि त्यांच्या जीवनात नेहमी त्यांच्या ‘टॉमबॉइश’ (धटिंगण मुलगा) वागण्यामुळे प्रसिध्द राहिल्या. त्यांच्या अशाप्रकारच्या वागणुकीतून, मानसिकतेतून  बाहेर येण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला, तसे त्यांनी त्यांच्या पालकांना कॉलेजच्या पहिल्या वर्षाला  असताना वारंवार सांगितले. त्यावेळी त्यांना प्रत्येक विषयात सहकारी विद्यार्थ्यांकडून भेदभावाचा सामना करावा लागला अगदी त्यांच्या शिक्षकांकडूनही. अगदी त्य़ांच्या पालकांकडूनही त्यांना वाईट वागणूक सुरूवातीला मिळाली होती जेव्हा सुरूवातीला त्यांना हे स्विकारणे जड गेले होते. यातून अस्मिता कधीच बाहेर आल्या नाहीत, आणि त्यांना त्या सा-या गोष्टी सहन कराव्या लागल्या ज्या त्यांच्या सहनशक्ती पलिकडच्या होत्या, मात्र तरीही त्यांना त्या जे काही आहेत त्याचा अभिमान आहे. त्याबाबत सांगताना त्या म्हणाल्या की,

“ या मनस्थितीतून बाहेर पडणे खूप महत्वाचे आहे कारण समाजाने हे शिकले पाहिजे की ती व्यक्ति जीला एक लैंगिक ओळख नाही, तिच्यात हे बदल निसर्गानेच केले आहेत”.

अस्मिता याना देशातील समलैंगिक समाजाच्या लोकांच्या प्रश्नाची जाणिव आहे, आणि त्यांची याबाबतची काही स्पष्ट मते देखील आहेत. त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी स्पष्ट केले की,

“ नाहीपेक्षा नेहमीच लोक हे स्विकारण्यास तयारच नाहीत की येथे समलैंगिकता ही काही गोष्ट असू शकेल, त्यामुळे आम्हाला एका जागी जास्तवेळ राहता देखील येत नाही. भारतीय समाजात समलैंगिकाना जागाच नाही. त्यामुळेच प्राथमिक शिक्षणापासूनच लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे. आम्ही ज्या समस्यांना सामोरे जातो आहे त्याचे कारण म्हणजे भारतात लैंगिक शिक्षणाचेच लोकांना वावडे आहे”.