एक तमिळ वीरांगना जिने ब्रिटिशांशी लढताना स्वत:ला झोकून दिले!

एक तमिळ वीरांगना जिने ब्रिटिशांशी लढताना स्वत:ला झोकून दिले!

Sunday September 03, 2017,

2 min Read

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी झुंज देणा-या महिलांबाबत चर्चा करताना आपल्याला सर्वात प्रथम स्मरण होते ते झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे. इतिहासात खोल डोकावून पाहीले की आपणांस माहिती मिळते ती तामिळनाडूच्या राणी वेलू नाचियार यांची. त्या आघाडीच्या लढवय्या होत्या ज्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्यापूर्वी ब्रिटीशांशी झुंज दिली. त्यांच्या आक्रमक वृत्तीमुळे त्यांच्या या लढतीच्या इतिहासाची मात्र हवी तशी दखल घेण्यात आली नाही, मात्र त्यांच्या दैदिप्यमान कामगिरीचे महत्व काही त्याने कमी होत नाही.

या राणीच्या या कामगिरीचा विसर इतिहासाला झालाच परंतू तिच्या सैन्याची शूर सेनापती कुईली यांच्या पराक्रमाला देखील इतिहासाने न्याय दिला नाही. आपल्यापैकी अनेकांना हे देखील माहिती नाही की देशाच्या इतिहासातील पहिला आत्मघाती बॉम्ब म्हणून याच कुईली यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केले आहे.


image


सन १७००मध्ये सुरू झालेली ही लढाई, राणी वेलू नाचियार यांच्या पतीचे ब्रिटीशांशी लढताना निधन झाले. आपल्या पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आणि राजधानीचे रक्षण करण्यासाठी त्यांनी सैन्य उभारले आणि ब्रिटिश साम्राज्याशी दोन हात केले. बाजूच्या संस्थानातील राजांच्या मदतीने आणि गोपाला नायाकेर आणि हैदर अली यांच्या मदतीने त्यांनी युध्द पुकारले. त्यांनी महिलांची फौज देखील तयार केली. या महिला प्रशिक्षित होत्या आणि त्यांच्या शौर्याची चर्चा त्यावेळी होत असे.

मोठी तयारी करून देखील वेलू नाचियार यांचे सैन्य आणि त्यांच्याकडील शस्त्रांचा ब्रिटीशांसमोर निभाव लागला नाही. त्यांच्या तोफा युध्द सुरू होण्यापूर्वीच शत्रूंच्या सैन्याचा खातमा करत, अशावेळी आपल्या सैन्याचा बचाव करण्यासाठी कुईली यांनी शत्रूच्या सामुग्रीचा नाश करण्याची योजना तयार केली.

ही सामुग्री एका देवळात ठेवण्यात आली होती आणि तेथे केवळ महिलांना प्रवेश दिला जात होता असे समजून की त्यांच्यापासून काही धोका होणार नाही. याच गोष्टीचा फायदा घेण्याचे कुईली यांनी ठरविले. कुईली आणि त्यांच्या सहकारी महिला सैनिकांनी पुजा साहित्यासहीत त्या मंदीरात प्रवेश मिळवला, त्या सा-यांनी तेलाने भरलेले दिवे सोबत आणले होते आणि ते गुपचूप त्या सोबत घेवून आल्या होत्या, त्यांच्याजवळ असलेले तेल त्यांनी कुईली यांच्या अंगावर ओतले आणि त्या दारूगोळा होता त्या खोलीत शिरल्या आणि स्वत:ला पेटवून घेतले. त्यावेळी राणीने आणि त्यांच्या सैन्याने ही लढाई जिंकली आणि कुईली यांचे नाव इतिहासात देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान करणा-या पहिल्या आत्मघाती बॉम्बर म्हणून कायम झाले.

शतकांनंतर सन २००८मध्ये राणीच्या नावाने एक टपाल तिकीट जारी करण्यात आले, कुईली यांचे स्मारक उभारण्य़ाची घोषणा करण्यात आली जे अद्याप उभारण्यात आले नाही.

    Share on
    close