वाढदिवशीच चोरांचा मुकाबला करण्यापासून भारताची पहिली महिला ब्लेडरनर होण्यापर्यंत, जाणून घ्या किरण कनोजीया यांची कहाणी! 

1

डिसेंबर २०११मध्ये किरण कनोजिया यांनी इंफोसिसच्या कर्मचारी म्हणून त्यांच्या घरी फरिदाबादला जाण्यासाठी हैद्राबाद येथे ट्रेन पकडली. यादिवशी त्यांच्या घरापासून दूर अंतरावर त्यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला. पालकांना भेटण्याच्या आनंदात त्यांनी गाडीत वाढ दिवस साजरा केला, मात्र या प्रवासाने त्यांच्या जगण्याची दिशाच बदलून टाकली असे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे. पुढच्या काही तासांतच किरण यांना रुग्णालयात दाखल करावे लागले कारण त्यांची गाडीत दोन मुलांशी झटापट झाली, ज्यांनी त्यांचे सामान चोरण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांनी त्यांना गाडीतून ढकलून दिले. मात्र या अपघाताने  त्यांना त्यांच्या जीवनात पुढे जाण्यापासून थांबविले नाही. या भयानक अपघातात बचावल्यानंतर किरण यांनी स्वत:ची ओळख ब्लेड रनर चॅम्पीयन म्हणून सिध्द केली. 

अपघातानंतर त्यांना हैद्राबाद मध्ये पूनर्वसन करण्यासाठी दक्षिण पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आले,  त्यांना कृत्रिम पाय देण्यात आला आणि त्या नव्याने जीवन जगण्याची पध्दत शिकल्या.


सन २०१४मध्ये किरण यांनी हैद्राबाद एअरटेल मॅराथॉन मध्ये प्रथमच भाग घेतला आणि पदक मिळवले. आज वयाच्या २८ व्या वर्षी किरण या ब्लेड रनर चॅम्पीयन आहेत, आणि त्यांना दिल्ली आणि मुंबईत मॅराथॉनचा झेंडा फडकविण्यास निमंत्रण देण्यात आले होते. त्यांना आता अंपगांच्या ऑलिम्पिक पॅरालिम्पकमध्ये भाग घ्यायचा असून देशासाठी गौरवपूर्ण कामगिरी करायची आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “ मला ठोस आव्हान हवे आहे, धावण्याच्या स्वप्नात मौज आहे, परंतू मला स्वत:साठी काही तरी सिध्द करायचे आहे”.

जेंव्हा त्या निराश होत्या, तेंव्हा त्यांना ऑस्कर पिस्टोरियस यांच्यापासून प्रेरणा मिळाली, ज्यांनी २०१२च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. हैद्राबादचे धावपटू, जे त्यांना पुनर्वसनाच्या दरम्यान भेटले त्यांनी त्यांना धावण्याचे बळ आणि उमेद दिली.

“मी सुरूवातीलाच चारशे मिटर धावण्याचा सराव केला, त्यानंतर मी पाच किमी आणि नंतर दहा किमी धावण्याचा सराव केला”, त्या म्हणाल्या. किरण यांना नुकतचे निती आयोगाच्या महिला परिवर्तन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यांच्या सोबत अन्य अकरा समर्थ महिलांचा सन्मान करण्यात आला ज्या विविध क्षेत्रातून आल्या होत्या.