‘मॉडल्स दिल्ली डॉट कॉम’, तरुणांसाठी राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याचा सर्वात मोठा मंच !

‘मॉडल्स दिल्ली डॉट कॉम’, तरुणांसाठी राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याचा सर्वात मोठा मंच !

Tuesday March 15, 2016,

5 min Read

सध्याच्या काळात रोजगाराची कमी असताना एक असेही क्षेत्र आहे, जेथे काम करणा-यांची संख्या कमी पडते. जेथे रोजगाराच्या अनेक संधी असतात, मग तो रोजगार काही तासांसाठी किंवा काही दिवसांसाठी का असेना लोकांना त्याबद्दल जास्त माहित नसते. अनेक वर्षापर्यंत मिडियामध्ये असलेले पुष्पेंद्र सिंह यांनी जेव्हा या क्षेत्रात पाउल ठेवले, तेव्हा त्यांना माहितच नव्हते की या क्षेत्रात मागणी इतकी जास्त असणे आणि लोक न मिळणे इतकी मोठी समस्या असू शकते, मात्र आज त्यांच्या ‘मॉडल्स दिल्ली डॉट कॉम’ मार्फत हजारो तरुणांना जोडून त्यांना रोजगार उपलब्ध करून देत आहे, रोजगारामार्फत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत काम करण्याचा अनुभव देत आहेत. 

image


पुष्पेंद्र सिंह आज इवेंट मँनेजमेंट कंपन्यांना मनुष्यबळ देत आहेत, जे इवेंट मँनेजमेंट कंपन्यांसाठी एक मोठे आव्हानच असते. तसेच दुसरीकडे लोक इवेंट मँनेजमेंट कंपन्यांसोबत काम करू इच्छितात. त्यांना हे माहित नसते की, त्यांना संपर्क कसा करावा. ‘मॉडल्स दिल्ली डॉट कॉम’ ने आपल्या कामाची सुरुवात सन २०११मध्ये ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन’ सोबत केली, त्यानंतर त्वरित त्यांनी अमेरिकन कंपनी ‘स्कल कँडी’साठी काम केले. याप्रकारे त्यांचे हे काम वाढत गेले, मात्र हे लक्ष्य गाठणे सहज नव्हते, या कामाला सुरु करण्यापूर्वी पुष्पेंद्र यांनी जवळपास ६-७ महिन्यांपर्यंत खूप शोध घेतल्यानंतर त्यांना माहित पडले की, इवेंट मँनेजमेंटच्या या क्षेत्रात मनुष्यबळाची खूप कमतरता आहे. पुष्पेंद्र यांनी आपल्या संशोधनादरम्यान दिल्ली, मुंबई, बंगळूरू, हैदराबाद आणि चेन्नईच्या अनेक कंपन्यांसोबत संवाद साधल्यावर त्यांना माहित पडले की, कंपन्यांना आपल्या उत्पादनाच्या प्रचारासाठी मनुष्यबळाची समस्या असते. 

image


‘मॉडल्स दिल्ली डॉट कॉम’ची सुरुवात पुष्पेंद्र यांनी आपल्या बचतीच्या पैशांनी सुरु केली. त्यामुळे त्यांनी मोठ्या संशोधनानंतर आपला एक गट बनविला आणि संकेतस्थळामार्फत केवळ इवेंट मँनेजमेंट कंपन्यांना स्वतःसोबत सामीलच केले नाही तर, असे मनुष्यबळ तयार केले जे इवेंट मँनेजमेंटमार्फत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी काम करू शकतील. मग ते थोड्या वेळेसाठी का नसो. या प्रकारे इवेंट मँनेजमेंट कंपनीला मागणीनुसार एकाच जागेवर मनुष्यबळ मिळते, तसेच दुसरीकडे इवेंट मैनेजमेंट कंपनीसोबत काम करून तरुणांना केवळ मोठ्या कंपन्यांसोबत काम करण्याचा अनुभवच मिळत नाही तर, त्यांची थोड्यावेळेत जास्त कमाई देखील होते. 

image


पुष्पेंद्र यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “आमच्या काम करण्याच्या दोन पद्धती आहेत, पहिल्या पद्धतीत आम्ही आमच्या संकेतस्थळामार्फत इवेंट मॅनेजमेंट कंपनीला त्यांच्या गरजेनुसार २६ प्रश्न विचारतो. जसे की इवेंट कधी आणि कुठे होईल, त्यांना किती आणि कुठल्या प्रकारच्या लोकांची गरज असेल इत्यादी. तसेच प्रमोटर्स आणि होस्टेस ज्याला मेल आणि फिमेल मॉडल देखील म्हटले जाते, त्यांच्यासाठी पाच प्रश्नांचे एक वेब पेज आहे, जे त्यांना भरावे लागते. ज्यात त्यांचे शिक्षण, कौटुंबीक परिस्थिती, त्यांची उंची आणि त्यांची भाषा इत्यादी प्रश्न असतात.”

‘मॉडल्स दिल्ली डॉट कॉम’ने आजपर्यंत सिप्ला, सँमसंग, नोकिया, स्नँपडिल, वीडियोकॉन, वर्लपूल आणि दुस-या अनेक देशी आणि विदेशी कंपन्यांना आपल्या सेवा दिल्या आहेत. 

image


पुष्पेंद्र यांच्या मते, सध्या त्यांच्याकडे १०२ शहरातून मनुष्यबळ पूर्ण करण्याची मागणी होत आहे. त्याला पूर्ण करण्यासाठी त्यांनी १३हजार लोकांचा एक व्हॉटसएप ग्रुप बनविला आहे. त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे विभिन्न देशातून वेगवेगळ्या कंपन्यांचे देखील फोन येतात. चीनकडून त्यांना सर्वात अधिक फोन येतात, कारण देशात चीनचे अनेक प्रकल्प सुरु आहेत. त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे जपान, तैवान, युरोपियन युनियन आणि अरब देशांमधून देखील मनुष्यबळ तयार करण्याची मागणी येत आहे. आपल्या कामाच्या पद्धती बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, “आम्ही या कामात मध्यस्थाची भूमिका साकारतो. जेव्हा कुठल्याही ग्राहकाचा फोन येतो, तेव्हा आम्ही त्यांच्या गरजेनुसार होस्टेस आणि प्रमोटरसोबत संपर्क करून त्यांना ग्राहकाचा नंबर देतो आणि ते लोक आपसात संवाद साधून ते काम करतात.” 

image


त्यांचे म्हणणे आहे की, आमचा प्रयत्न राहतो की, ज्या शहरात इवेंट होत आहे, कंपनीला त्याच शहराची होस्टेस आम्ही देऊ करू. जेणेकरून शहरातील लोकांना रोजगार मिळेल आणि कंपनीचा खर्चदेखील कमी येईल. असे असूनही कंपन्यांची मागणी दुस-या शहरांप्रमाणे दिल्ली किंवा मुंबईच्या लोकांची असते, तेव्हा आम्ही येथील लोकांना देखील त्यांच्याकडे पाठवितो. अशातच कंपनीला गुणवत्तेच्या आधारावर पैसे द्यायचे असतात. एका संशोधनामार्फत प्रत्येक वर्षी जवळपास तीन लाख विदेशी कंपन्या देशाच्या वेगवेगळ्या भागांवर प्रदर्शन भरवतात. ज्यासाठी ५०-७०टक्यांपर्यंत होस्टेस आणि प्रमोटर यांना ते येथेच येऊन करारबध्द करतात. या दरम्यान या होस्टेस किंवा प्रमोटरचे काम लोकांमध्ये कंपन्यांच्या सामानाबाबत असते. 

image


पुष्पेंद्र यांच्या मते, त्यांचे सर्व काम ऑनलाईनच होते, ते या लोकांना पैसा, येण्या- जाण्याचा राहण्याचा खर्च सर्व ऑनलाईनच देतात, जेणेकरून या कामात पारदर्शकता कायम राहील. आता त्यांच्याकडे कमीत कमी १३हजार लोक रजिस्टर्ड आहेत. ते प्रत्येकवर्षी जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीसशे लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. भविष्यातील योजनांबाबत पुष्पेंद्र यांचे म्हणणे आहे की “आम्ही अशा गुंतवणुकदारांचा शोध घेत आहोत. जे या क्षेत्रात आपला पैसा लावू शकतील, कारण मागणी आणि पुरवठा पाहून आमची योजना मुंबई आणि बंगळुरुत देखील आपली शाखा उघडण्याचे आहे. कारण मागीलवर्षी डिसेंबर पासून आतापर्यंत एकमेव बंगळूरू मधूनच आमच्याकडे तीनहजार फोन आले आहेत, हे पहाता असे म्हटले जाऊ शकते की, सध्या या क्षेत्रात किती काम करण्याची गरज आहे.” ‘मॉडल्स दिल्ली डॉट कॉम’कडे केवळ मोठे शहर तसेच श्रेणी२ आणि श्रेणी३ शहरासारख्या लखनऊ, भोपाळ, मसूरी, भिलाई, सोनीपत, अजमेर इत्यादी शहरांमधून देखील होस्टेसची मागणी आहे. 

image


या कामात होणा-या समस्यांबाबत त्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या समोर सर्वात मोठी समस्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत मेसेज पाठवू न शकण्याचे आहे. कारण ‘ट्राय’ने २०१२–१३मध्ये ‘बल्क मेसेज’वर बंदी घातली आहे. ज्यामुळे मागणीनुसार पुरवठा करू शकत नाही. तर या क्षेत्रात मागणीला लवकरात लवकर पूर्ण करण्याचे असते आणि या लोकांकडे इतका वेळ नसतो की, प्रत्येकाला फोनवर ते संपर्क करू शकतील. त्यांच्या मते, या इंडस्ट्रीमध्ये वर्षाचे ३लाख ७५हजार नोकरीची मागणी येत आहे. ही मागणी देश आणि विदेश दोन्ही ठिकाणांवरून असते. मात्र ‘ट्राय’च्या ‘डीएनडी’ नियमांमुळेच ते या मागणीला पूर्ण करू शकत नाही. पुष्पेंद्र यांच्या मते, जर या समस्येचे समाधान होत असेल तर, ते जवळपास पाच हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देतील.

संकेतस्थळ : www.modelsdelhi.com

लेखक : हरिश

अनुवाद : किशोर आपटे