भारताचा सर्वात लांब रोप-वे मुंबई आणि घारापूरी बेटांदरम्यान साकारणार!

1

भारताचा पहिलाच समुद्रातून जाणारा सर्वात जास्त लांबीचा रोप-वे लवकरच मुंबई आणि एलिफंटा (घारापूरी बेट) यांना जोडणार आहे. जे अरबी समुद्रात आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट याची जबाबदारी घेत असून हा आठ किमी अंतराचा रोप-वे तयार करणार आहे. पूर्व किना-यावरील शिवडी येथील किल्ल्यावरून सुरू होवून रायगड जिल्ह्यातील बंदरात हा रोप-वे पूर्ण होणार आहे. याच्या प्रवासाचा वेळ अंदाजे ४० मिनिटांचा असेल.


फोटो - हिंदुस्तान टाईम्स
फोटो - हिंदुस्तान टाईम्स

यामध्ये केबल कारच्या माध्यमातून एका वेळी २०लोकांना वाहून नेता येणार असून या मार्गाला नेहमीच मध्यंतरात थांबा दिला जातो. याबाबतच्या वृत्ता नुसार, पर्यटकांना टॉय ट्रेनच्या माध्यमातून घारापूरी टेकडीच्या पायथ्यापासून वरपर्यंत घेवून जाण्याची सोय केली जाईल. जे सहाशे मीटरचे अंतर आहे. गुफापर्यंत जाण्याचा हा मार्ग सध्या दुर्गम आहे.

एलिफंटा बेटे ही जागतिक वारसा स्थळापैकी एक आहेत. ज्या एलिफंटा लेणी म्हणून प्रसिध्द आहेत. या बेटांचा पुरातत्व इतिहास असून पुरातन मंदीरे येथे आहेत. दरवर्षी येथे सुमारे पाच हजार पर्यंटक भेट देतात. या बेटावर साधारण १२०० लोकवस्ती असून त्यात बहुसंख्य लोक मासेमारी आणि शेतीचा व्यवसाय करतात.