मिशेल ओबामा यांनी शैक्षणिक मोहिमेसाठी निवड केली भारतीय-अमेरिकी वंशांच्या षोडश कन्येची!

मिशेल ओबामा यांनी शैक्षणिक मोहिमेसाठी निवड केली भारतीय-अमेरिकी वंशांच्या षोडश कन्येची!

Thursday January 12, 2017,

2 min Read

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी १६ वर्षांच्या भारतीय-अमेरिकन श्र्वेता प्रभाकरन यांची निवड एका शैक्षणिक उपक्रमात, ज्यात अमेरिकेत लहान वयात शैक्षणिक संधी दिल्या जातात अशा दीक्षांत विद्यार्थी सल्लागार मंडळावर केली आहे.

श्वेता, ज्यांचे पालक तामिळनाडूच्या तिरुनावेल्ली येथून १९९८ मध्ये स्थलांतरीत झाले आहेत, त्यांची निवड बेटर मेक रुम अभियनात करण्यात आली आहे. विद्यार्थी सल्लागार मंडळावर त्यांची नियुक्ती करताना लहानग्याच्या संगणक शिक्षणासाठीच्या क्षेत्रातील त्यांचे कष्ट लक्षात घेण्यात आले. मंडळाचे सदस्य यासाठी नुकतेच व्हाइट हाऊस येथे जावून आले तेथे त्यांनी मिशेल यांच्या मिशेल स्कूल कौंन्सलर ऑफ द इयर च्या कार्यक्रमात भाग घेतला. भारतीय भूमीत जन्मलेल्या श्वेता यांची निवड सतरा जणामध्ये आहे ज्याना व्हा इट हाऊसने बेटर मेक रुम या उपक्रमात विद्यार्थी सल्लागार मंडळात निवडले आहे. अंतिम पर्वात १२माध्यमिक शाळातून आणि पाच महाविद्यालयातुन ही निवड करण्यात आली.


image


व्हर्जिनिआ येथील थॉमस जेफरसन हायस्कूलच्या सिनी अर वर्गात शिकणा-या श्वेता या विज्ञान आणि तंत्रज्ञान या शाखेच्या विद्यार्थीनी आहेत. ही संस्था एव्हरीबडी कोड नाऊ या उपक्रमाची शोधकर्ता आणि सीईओ असून त्यात ना नफा पध्दतीने भावी पिढ्याना शास्त्रज्ञ, अभियंता आणि उद्योजक बनविण्यासाठी सक्षमी करण करण्यासाठी काम करते. या यादीत त्या एकमेव इंडो-अमेरिकन आहेत. मडळाच्या सदस्यापैकी २/३ सदस्य त्यांच्या कुटूंबातील प्रथमच आहेत ज्यांना पदवीत्तर दुय्यम पदवी दिली जात आहे.

मिशेल यांनी स्थापन केलेल्या, या मंडळाकडून महाविद्यालयात जाणा-या, महाविद्यालयात असणा-या आणि महाविद्यालयातून निघणा-यांच्या संस्कृतीला त्याच्या शाळांशी जोडले जाईल जेणे करून त्यात समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्याना आवश्यक माहिती आणि साधने उपलब्ध करता येतील.

"हा माझा खुप मोठा सन्मान आहे, की मला मंडळावर काम करण्यायोग्य समजण्यात आले. महाविद्यालयात जाणा-या आणि बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांमध्ये समन्वय हा आम्ही 'एव्हरीबडी कोड नाऊ' मध्ये केलेल्या उपक्रमासारखाच आहे. आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये हा अनुभव वाटुन घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. फर्स्ट लेडी यांच्या उच्च मुल्यांकीत उपक्रमात मी भविष्याकडे पाहते आणि माझ्या बेटर मेक रुम सल्लागार मंडळात अधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी उत्सुक आहे", श्वेता म्हणाल्या.

भरतनाट्यमच्या प्रशिक्षित नृत्यांगना असलेल्या श्वेता यांना २०१५मध्ये व्हाइट हाऊस चँम्पीअन ऑफ चेंज हा पुरस्कार मिळाला आहे. २०१६मध्ये तीस वर्ष वयाखालच्या आंतरराष्ट्रीय साक्षरता संघटनेतही त्यांचे नाव आहे. - पीटीआय