भेटा या झांशीच्या षोडशकन्येला, जिने केवळ १८०० रूपयांत बनविले वातानुकूल यंत्र!

1

आजच्या काळातील मुले असाधारण आहेत, ती भव्यदिव्य स्वप्ने पाहतात आणि पूर्ण देखील करत आहेत. ही कहाणी आहे सोळा वर्षाच्या कल्याणी श्रीवास्तवची जी झांशी मध्ये राहते. तिने अलिकडेच केवळ १८०० रूपयात वातानुकूलीत यंत्र तयार केले आहे. झांशीमध्येच लोकमान्य टिळक आंतरमहाविद्यालयात ती १२व्या वर्गात शिकते. तिचे वडील दिनेश श्रीवास्तव शिक्षण विभागात शिक्षक आहेत, तर आई देखील शिक्षिका आहे.

कल्याणी हिने तयार केलेला देशी ‘एसी’ म्हणजे थर्माकोलचा बर्फ घातलेला बॉक्स आहे जेथे १२ बोल्ट डिसी पंखा थंड हवा बाहेर फेकतो. त्यामुळे वातावरणातील हवा चार ते पाच डिग्री सेल्सीयस पर्यंत तासभर थंड राहाते. हा एसी कोणत्याही प्रकारचे वायू सोडत नसल्याने त्यापासून प्रदुषण होत नाही.


कल्याणीचे हे एसी आयआयटी दिल्लीने मागील वर्षी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत निवडले होते, मागील वर्षी   कल्याणीला  उत्तर प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या नारी सन्मान कार्यक्रमात गौरविण्यात आले, अमर उजाला या वृत्तपत्राने हा कार्यक्रम प्रायोजित केला होता. क्रीडा, शिक्षण, आणि सामाजिक क्षेत्रात असामान्य कामगिरी करणा-या महिलांसोबत त्यांचाही सत्कार करण्यात आला होता. त्यांचे कार्य पाहून जपान सरकारने देखील त्यांना एका कार्यक्रमात निमंत्रित  केले होते. विज्ञानात प्राविण्य मिळवणारी कल्याणी गाण्यात देखील तरबेज आहे. इंडियन आयडॉल या दूर चित्रवाणी कार्यक्रमात कल्याणी  सहभागी झाली होती. तिस-या फेरीत ती पोहोचलीआणि पन्नास पेक्षा जास्त बक्षीसे तिला मिळाली ज्यावेळी तिने खनौ आग्रा आणि कानपूर येथे स्पर्धेत तिने भाग घेतला.

गरिबीच्या रेषेत जगणा-या लोकांना त्यांच्या कमी किमतीच्या एसीने दिलासा दिला, हा एसी आता सौर उर्जेवर देखील चालविला जातो त्यामुळे त्याचा खर्च अजून कमी झाला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या सोळा वर्षाच्या कन्येने केलेल्या या संशोधनातून पर्यावरणाची कोणतीच हानी होत नाही.

(थिंक चेंज इंडिया)