अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रारंभीच्या भाषणाचा अन्वयार्थ!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रारंभीच्या भाषणाचा अन्वयार्थ!

Monday January 23, 2017,

3 min Read

अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांच्या पहिल्याच वक्तव्यातून हेच दिसले की, त्यांना महान अमेरिका पुन्हा घडवायची आहे, कोणत्याही धोक्याशिवाय देशांना आणि कंपन्यांना ज्यांचा व्यवसाय अमेरिकेच्या प्रशासनावर अवलंबून आहे. त्यांच्या भाषणातून त्याचा खंबीरपणा स्पष्ट जाणवत होता.

'डोनाल्ड जे ट्रम्प' यांनी युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शुक्रवारी शपथ ग्रहण केली. त्यांना पदाची शपथ मुख्य न्यायाधिश जॉन जी रॉबर्ट यांनी दिली. त्यांच्याच सोबत माईक पेन्स यांना ४८वे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ देण्यात आली.


image


शपथग्रहणानंतर तातडीने त्यांच्या या शपथग्रहण सोहळ्याला ‘याची देही याची डोळा अनुभवणा-या कॅपीटल हिल परिसरात जमा झालेल्या गर्दीला त्यांनी संबोधित केले.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याच शब्दात जसेच्या तसे:

“अनेक दशकांपासून,आम्ही विदेशी उद्योगांना अमेरिकेच्या खर्चाने समृध्द केले आहे. इतर देशांच्या सैन्याला सवलती दिल्या आहेत, आमच्या सैन्याला मात्र वाईट स्थितीत ठेवले आहे. इतर देशांच्या सीमांचे रक्षण केले आहे. अब्जावधी डॉलर्स सात समुद्रापार खर्च केले आहेत आणि अमेरिकेच्या पायाभूत सुविधा ढासळल्या तरी त्यांना दुर्लक्षित आणि वंचित ठेवले आहे.”

भारतीय आयटीइएस कंपन्यांना यातील पहिल्या भागातून स्पष्ट संदेश देण्यात आलेला नाही. याचा अर्थ सरळ आहे की यापुढच्या काळात या कंपन्याना अमेरिकेत व्यवसाय करणे कठीण जाणार आहे.

ट्रम्प म्हणाले की, “ आम्ही इतर कंपन्यांना श्रीमंत बनविले, मात्र आमच्या देशांची संपत्ती, सामर्थ्य, आणि आत्मविश्वास या जगाच्या क्षितीजावरुन लुप्त झाला. एकामागेएक उद्योग बंद पडले आणि पिंजरे शिल्लक राहिले, त्यावेळी लाखो अमेरिकन्सना रोजगाराला मुकावे लागले. आमच्या मध्यमवर्गियांचे धन त्यांच्या घरातून हिसकावण्यात आले, आणि जगातील लोकांना वाटण्यात आले.” भारतासारख्या देशांना अनेक प्रकारच्या नोक-यांचा आणि संपत्तीचा फायदा अमेरिकेच्या खर्चाने झाला. राष्ट्राध्यक्षांनी हे सारे थांबविण्याचे संकेत दिले.

ते पुढे म्हणाले :

“ परंतू हा भूतकाळ झाला आणि आता आम्ही केवळ भवितव्याचा विचार करत आहोत. आज आम्ही येथे जमा झालो आहोत ते प्रत्येक शहरात प्रत्येक नव्या विदेशी भांडवलात, आणि सामर्थ्याच्या प्रत्येक नव्या क्षेत्रात नवी उंची गाठण्यासाठी. इथून पुढे, नवा दृष्टीकोन घेवून ही भूमी वाटचाल करेल, या क्षणापासून पुढे अमेरिकेला प्राधान्यच असेल.”

अमेरिकेला प्राधान्य म्हणजेच विदेशी लोकांना देण्यात येणा-या नोक-यांवर मर्यादा येणार असा होतो. विद्यार्थी, आणि रोजगाराच्या संधी शोधणारे, ज्यात मोठ्या संख्येने भारतीय आहेत, त्यांच्या मोठ्या प्रमाणात देश सोडून जाण्याच्या संकटाची छाया पसरली आहे.

“ इतर देश आमची उत्पादने करत आहेत, आणि आमच्या नोक-या घेत आहेत, आमच्या कंपन्या ढापत आहेत, आम्हाला आमच्या काही मर्यादा आहे. माझ्या शरीरात प्राण असे पर्यत मी तुमच्यासाठी लढा देत राहणार आहे – आणि मी तुमची हार कधीच होवू देणार नाही. अमेरिका पुन्हा जिंकण्यास सुरुवात करेल".

नव्या राष्ट्राध्यक्षांनी बाजू घेतली आहे संरक्षणात्मक विचारसरणीची ज्यातून त्यांना असे वाटते की, अमेरिका आणि येथील नागरिकांसाठी बाहेरून लोकांना बोलाविण्यापेक्षा जसे त्यांनी शेवटच्या वाक्यात उल्लेख केला तसे नव्या रोजगार संधी आणि नोक-या उपलब्ध होतील. “ आम्ही आमच्या नोक-या परत आणू. आम्ही आमचे सामर्थ्य परत मिळवू. आमची संपत्ती पुन्हा आणू. आणि आम्ही आमची स्वप्न पुन्हा मिळवू”.

“ आम्ही आमच्या जनतेला पुन्हा समृध्द करु आणि कामावर परत आणू. देशाची फेरबांधणी करताना अमेरिकेचे मजूर आणि हात असतील. आम्ही साधे दोन नियम पाळणार आहोत, अमेरिकनची सेवा विकत घ्या आणि त्याच्या कडूनच कामे करून घ्या”. आता हेच पहायचे की हे स्पष्ट विचार येत्या काही महिन्यात कसे अंमलात येतात, भारतीय अमेरिकन लगेचच आनंदून गेले होते कारण त्यांची संख्या त्यांच्या प्रशासनात मोठी आहे, जसे अलिकडे दिसून आले आहे.

या सोहळ्यातही भारतीय छटा दिसत होत्या कारण डिजे आणि भारतीय ड्रमर रवी जखोटीया यांनी प्रांरभीच सुरावटीने त्यांचे स्वागत केले होते.

लेखक : अनिल बुदूर लुल्ला.