'द ग्रीन स्नॅक्स': आरोग्याशी नाही तडजोड, स्वादालाही नाही तोड

'द ग्रीन स्नॅक्स': आरोग्याशी नाही तडजोड, स्वादालाही नाही तोड

Wednesday October 21, 2015,

5 min Read

खाण्यापिण्याच्या बाबतीत लोकांना एका गोष्टीची सर्वात मोठी चिंता लागून राहिलेली असते, आणि ती म्हणजे- नाश्त्यामध्ये (न्याहारी) पौष्टिक असे काय खावे. खाण्याबाबत लहानात लहान गोष्टींचा विचार केला आणि व्यायामावर लक्ष केंद्रीत केले तरी देखील दोन जेवणांच्या मधल्या काळात लागणारी भूक हे नेहमीच एक आव्हान राहिलेले आहे. आपले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अडीच दशके खर्च करणा-या आणि दरदिवशी नियमानुसार जेवण घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्या नंतर ‘ग्रीन स्नॅक्स कंपनी’ च्या संस्थापिका जास्मीन कौर यांना कळून चुकले होते, की आपल्या भल्यासाठी आपल्याला आपली जीवनशैली बदलावीच लागेल.

नाश्त्यामध्ये कुरकुरीत आणि चवदार गोष्टींसोबत पौष्टिक तत्त्वे सुद्धा मिळायला हवीत ही जास्मीन यांची गरजच होती. आणि याच गरजेने ‘द ग्रीन स्नॅक्स’ कंपनीचा जन्म झाला. त्या म्हणतात, “ बाजारात अशा प्रकारचा कोणताही नाश्ता यापूर्वी उपलब्ध नव्हता.” लवकरच त्यांनी आपली नोकरी सोडली आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतला. जगभरात उपलब्ध असलेल्या आरोग्यवर्धक नाश्त्याच्या पदार्थांचा शोध घेण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की नाश्त्याच्या दृष्टीने कोबी ही एक उत्कृष्ट भाजी आहे.

आपण कोबीच्या भाजीला काहीशा चटपटीत ढंगाने बनवावे असे त्यांनी ठरवले. जास्मीन सांगतात, “ जेव्हा नाश्त्याची गोष्ट येते, तेव्हा भारतीय ग्राहकांचे विचार आणि त्यांना अपेक्षित असलेल्या चवीबाबत माझ्या मनात काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण होते.” 


आरोग्यदायक नाश्ता तयार करणे


आपल्या उत्पादनाला जेव्हा ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला तेव्हा जास्मीन यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्या सांगतात की पुष्कळ लोकांना कोबीबाबत माहित होते आणि भारतात कोबीला ते नाश्त्याचा पदार्थ म्हणून लाँच होण्याची वाट पाहत होते. जॅस्मीन सांगतात, “ केवळ एक प्रयोग म्हणून नमुन्यादाखल आम्ही कोबीपासून बनवलेला नाश्ता लोकांना देत होतो, परंतु हा पदार्थ पुन्हा विकत घेण्यासाठी ग्राहक स्टॉलवर येत होते. तेव्हा मी ठरवले की या क्षेत्रात गंभीरपणे काम करायचे.”

‘द ग्रीन स्नॅक्स’ ची सुरूवात कोबीच्या वेगवेगळी चव असलेल्या तीन चीप्सपासून झाली होती. या तीन प्रकारच्या चीप्स खाद्य पदार्थांच्या विविध स्टॉल्सवर विकल्या जात होत्या. जास्मीन सांगतात की या नाश्त्याच्या पदार्थांकडे किरकोळ विक्रेते, भोजनालये, ऑनलाईन फूड साईट्स, अन्नाबाबत समिक्षा करणारे आणि ब्लॉगर्सचे लक्ष आकर्षित झाले. जॅस्मीन यांनी पुढे सांगितले, “ हे उत्पादन लाँच केल्यानंतर दोन महिन्यांनी आमच्यासाठी सर्वात मोठा दिवस उगवला. स्वादिष्ट खाद्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘मक्का’ या फूडहॉलकडून आम्हाला फोन कॉल आला आणि त्यांच्याकडे आमचे उत्पादन सादर करण्याची संधी आम्हाला मिळाली. आमच्या व्यवसायाच्या दृष्टीने हा निर्णायक काळ होता.”


प्रक्रिया


‘द ग्रीन स्नॅक्स कंपनी’ आणि कोबी चीप्सबरोबर या टीमने नव्याने सुरूवात करण्याचा निर्णय घेतला. टीमने पुनर्विचार केला, विश्लेषण केले आणि मग आरोग्य, खाणे-पिणे आणि पोषणाबाबत जे जे काही ज्ञान होते त्यानुसार सर्वकाही नव्याने तयार केले. लोकांना आरोग्याच्या दृष्टीने चांगले असलेल्या पदार्थांपासून तयार केलेली पोषक, आरोग्यदायक आणि स्वादिष्ट नाश्ता मिळावा याच उद्देशाने ‘द ग्रीन स्नॅक्स कंपनी’ची स्थापना करण्यात आली असल्याचे जास्मीन सांगतात. हा नाश्ता ताज्या आणि नैसर्गिक पदार्थांपासून बनवला जातो, आणि यात वाढीव साखर, पदार्थ टिकावा म्हणून वापरण्यात येणा-य़ा संरक्षक पदार्थांचा आणि मिश्रणांसोबत एमएसजी अशा पदार्थांचा मुळीच वापर केला जात नाही.

चीप्स बनवण्याची उपकरणे अमेरिकेहून मागवण्यात आली आहेत. चीप्स बनवण्याची जगभर स्वीकारण्यात आलेली पद्धतच ‘द ग्रीन स्नॅक्स कंपनी’ वापरते. या कंपनीची सुरूवात जास्मीन यांनी एकट्यांनीच केली असली तरी आज ही कंपनी पाच सदस्यांची टीम झालेली आहे. त्या सांगतात, “ या कंपनीचा पाया रचला जात असताना माझे पती एखाद्या पहाडासारखे माझ्यासोबत राहिले.” कंपनीच्या बहुतेक सदस्यांकडे इतर कंपनीत काम केल्याचा अनुभव होता. देशभरात आरोग्यदायी नाश्त्याची गरज पूर्ण करू शकेल असा ब्रँड आणि उत्पादन बनवण्याचे या सदस्यांचे स्वप्न होते.


आव्हाने


तसे पाहिले तर कोणतीही स्टार्टअपर कंपनी आव्हानांशिवाय उभी राहू शकत नाही. जास्मीन यांच्या मते योग्य लोकांना आपल्या सोबत आणणे हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते. ज्या लोकांचे समान विचार आहेत, समान निष्ठा, समान आवड आहे आणि नव्याने उभ्या राहणा-या स्टार्टअप कंपनीच्या वातावरणात काम करण्याची तयारी आहे अशा लोकांची या कंपनीला गरज होती आणि हे सुद्धा काही थोडे थोडके मोठे आव्हान नव्हते.

जास्मीन सांगतात, “ आत्ता पर्यंत ग्राहक ज्याला योग्य मानत आले आहेत ते आरोग्यदायक नाही हे ग्राहकांना पटवून देणे हे आणखी एक मोठे आव्हान होते. काय चूक, काय बरोबर याबाबत ग्राहकांना चुकीची माहिती दिली गेल्याचे आमच्या लक्षात आले. यामुळे ग्राहक कोणत्याही प्रकारचे दर्जाहीन खाणे खाण्यासाठी देखील तयार असतात आणि ही गोष्ट त्यांच्या आरोग्यासाठी काही काळानंतर नुकसानकारक सुद्धा सिद्ध होऊ शकते ही गोष्ट सुद्धा आमच्या लक्षात आली.”

image


बाजार


‘द ग्रीन स्नॅक्स कंपनी’ने काही महिन्यांपूर्वीच ‘कोबी चीप्स’ हे उत्पादन लाँच केले आहे. हे उत्पादन मुंबई, दिल्ली आणि पुणे या शहरांमध्ये किरकोळ आणि चविष्ट खाण्याच्या स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, १० हून अधिक स्वादिष्ट अन्नपदार्थांबाबतच्या वेबसाईट्सवर देखील हा पदार्थ उपलब्ध आहे. शिवाय कंपनीने काही कॅफे आणि रेस्टॉँरंट्ससोबत देखील करार केले आहेत. गेल्या तीन महिन्यांच्या काळात या पदार्थांच्या विक्रीमध्ये तिप्पट वाढ झालेली आहे आणि ही टीम दर महिन्याला १५ पीओएस ( पॉईंट ऑफ सेल) जोडते आहे.

सामान्यत: ग्राहक आपल्या आरोग्याविषयी अधिक जागृत झाले आहेत. आज बाजारात योगा बार्स आणि वॉलेंसिया ड्रिंक्ससारखे अनेक प्रकारचे आरोग्यवर्धक नाश्त्याचे पदार्थ आणि पेये उपलब्ध आहेत. आरोग्यदायक खाण्याच्या पदार्थांचा बाजार जवळजवळ २२,५०० कोटी रूपयांचा असून त्याचा सीएजीआर ( compound Annual Growth Rate) २० टक्के इतका आहे अशी माहिती बिझनेस स्टँडर्डच्या एका अहवालात देण्यात आली आहे. जास्मीन सांगतात," सद्या आरोग्य आणि जीवनशैलीसंबंधातील वाढता कल हा प्रतिबंधात्मक विरूद्ध गुणकारी असा आहे. आरोग्यवर्धक वस्तूंची चलती आहे. या कारणामुळे बाजारात आरोग्यदायी पोषक तत्त्वे असलेल्या पदार्थांची मागणी वाढेल अशी आशा आहे.” तथापि, आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्यदायी नाश्त्याच्या पदार्थांचा बाजार अधिक विकसित होत आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्याय आणि ब्रँडसुद्धा अधिक आहेत.

‘द ग्रीन स्नॅक्स कंपनी’ भारतात आरोग्यदायक नाश्त्याच्या पदार्थांना मुख्य प्रवाहात घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. स्वादिष्ट आणि आरोग्यदायक नाश्त्याचे पर्याय बाजारात आणण्याची कंपनीच्या टीमची योजना आहे. याबरोबरच मेट्रो शहरे आणि छोट्या मेट्रो शहरांमध्ये असलेल्या खाद्य पदार्थ विकणा-या किरकोळ विक्रेत्यांकडे भविष्यात आपली उत्पादने उपलब्ध करण्याचा कंपनीचा इरादा आहे.

समारोप करताना जास्मीन सांगतात , “ सध्या मजबूत टीम बांधण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि आमच्या ब्रँडला लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने या टीमला चांगला पाठिंबा कसा मिळेल या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. यामुळे आपला व्यवसाय विकसित करण्याची कंपनीला चांगली मदत तर होईलच, शिवाय ग्राहकांसाठी आरोग्यदायी उत्पादने बाजारात लाँच केली जातील.