‘नोटरीमामा’सोबत केवळ एक क्लिक! आणि समस्यांचे समाधान!!

0

दस्तावेजीकरण करण्यासाठी ‘नोटरी मामा’ ही एक खिडकी सेवा आहे. आपल्या इतर सहकार्यांप्रमाणेच गिरीश चल्ला यांना देखील आपले आयकर विवरण भरण्यासाठी, भाडे करार करण्यासाठी एजंट (दलाल)कडे जावे लागत होते. इ-स्टँप ड्राफ्टिंग आणि त्याला नंतर नोटरी करुन घेण्यासाठी खूप त्रास होत असे. आणि या सगळ्याने ‘नोटरी मामा’चा विचार त्यांच्या मनात आला.“नोटरी मामा”व्दारे आम्ही दस्तावेजीकरणसंबंधी लोकांच्या मौल्यवान वेळेची आणि पैशांची बचत करु इच्छितो” गिरीश सांगतात. ‘नोटरी मामा’ची सुरूवात काही सोपी नव्हती. त्यासाठी सा-या व्यवस्थेची पूर्ण माहिती असणे आवश्यक होते आणि त्यासाठी स्टँम्प,रजिस्ट्रेशन, तसेच अन्य संबंधित अधिनियम पूर्णत: वाचून समजून घेणे आवश्यक होते.

गिरीश सांगतात की, “आम्ही एक अशी प्रणाली सुरू केली की ज्यात कोणताही दस्तावेज एका तासात नोंदणी करून ग्राहकांच्या दरवाज्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आहे. आमचे मिशन एक ते शंभर ग्राहकांना एका दिवसात समान सेवा देणे हे होते”. गिरिश आश्चर्याने सांगतात की, अनेक पेट्रोल पंप, बेकरी, रेस्टॉरेंट आणि अन्य ठिकाणी आम्हाला लोकांनी आमचे पोस्टर लावण्यास अनुमती दिली.“आम्ही पन्नास रुपयांचे माफक कूपन जारी केले आणि परिक्षण तसेच त्रुटी विपणन पासून सुरुवात केली. आणि आमचा हा फार्म्यूला चालला.

नोटरीमामा
नोटरीमामा

“आम्हाला लोकांच्या अनेक सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या ज्यातून आमच्या लक्षात आले की, याबाबतीत बंगळूरूच्या लोकांना कश्या प्रकारच्या सेवा हव्या आहेत.” गिरिश सांगतात की,“‘नोटरी मामा’च्या घर किंवा कार्यालयाच्या वितरण पर्यायासोबतच त्याच्या एक खिडकी मॉडेलचे वैशिष्ट्य त्याला अन्य प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वेगळा ठरवते.” त्या अंतर्गत इ-स्टँम्प खरेदी, कायदेशीर मसूदा तयार करणे, ओळख संबंधी वैध पुरावे आणि हस्ताक्षर आणि शेवटी त्यासेवा ग्राहकांना पोहोचवण्याची व्यवस्था यांचा समावेश होतो. आणि हे सारे शक्य आहे ‘नोटरी मामा’च्या संकेतस्थळावर तेही एका क्लिकवर!

याचे संस्थापक गिरीश आणि प्राशनाथ नारायण यांच्या सोबत त्यांच्या कोर टिम मध्ये आदित्य आहेत. गिरीश व्यवसायाचे काम पाहतात. तर आदित्य कार्यसंचालनाची जबाबदारी सांभाळतात. ब्रँडचा विकास करण्याची जबाबदारी प्राशनाथ सांभाळतात. नोव्हेंबर २०१३मध्ये याची सुरूवात झाल्यापासून त्यांना रोजच्या आव्हानांचा सामना करावा लागत होता. परंतू जस जसा काळ लोटला, त्यांच्या लक्षात येत गेले की, कश्या प्रकारे नविन-नविन कामे मिळवता येतील आणि आपल्या सेवांचे विपणन कसे करता येणे शक्य आहे. “आमचे महसूल मॉडेल ऑनलाइन आणि वॉक इन आधारित आहे. बँकिंगसाठी आमची संस्था एसबीआय मधूनच रक्कम देण्या-घेण्याबाबतच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी आम्ही ‘डायरेक्ट पे’चे सदस्यत्व घेतले आहे.” गिरीश सांगतात. “ आतापर्यंत आम्ही आमच्या स्वत:च्या बचतीतून आणि मित्रांकडून घेऊन गुंतवणूक केली. अलिकडेच बंगळू्रूमध्ये आमची दुसरी शाखा सुरू करण्यासाठी आम्हाला ‘एंजल इनवेस्टर’ कडून काही गुंतवणूक मिळाली आहे”. गिरीश सांगतात की, “नोटरी मामा’चा व्यवसाय बँकिंग, शिक्षण संपत्ती किंवा व्यापार सर्वच क्षेत्रात आहे. आम्ही आयटी कंपन्या, बँक, नॉन-बँकिंग वित्तीय संस्था, रियल इस्टेट आणि महाविद्यालयात करारबध्द होण्याच्या प्रक्रियेत आहोत.” जुलै २०१४ ‘नोटरी मामा’च्या या प्रवासात एक महत्वाचा मैलाचा दगड ठरला. त्यावेळी ५०० ग्राहकांना आम्ही सेवा दिल्या. त्यात करार, प्रतिज्ञापत्र, मसुदे आणि त्यांचे नोंदणीकरण यांचा समावेश होता.

आदित्य, गिरीश आणि प्राशनाथ
आदित्य, गिरीश आणि प्राशनाथ

“नोटरी मामा” आपला विस्तार करत आहे, आणि आपल्या चमूचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गिरीश सांगतात की, आम्ही आपल्या कर्मचा-यांमध्ये प्रामाणिकपणा आणि गोपनियता अश्या मानवीमूल्यांना पाहू इच्छितो. कारण आम्ही आमच्या ग्राहकांच्या व्यक्तिगत आणि वि्त्तीय आकडेवारीसोबत कामकाज करतो.” ते पुढे सांगतात की, “ आमच्या ग्राहकांच्या चेह-यावर हास्य आणि आनंद पाहिला की आमचा उत्साह व्दिगुणित होतो. त्यामुळे आम्हाला त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त देण्यासाठी कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळते. आपले उत्पादन आणि सेवांची ग्राहकांसमक्ष पारदर्शिता असेल तर आपण त्या सदैव पुढे घेऊन जाऊ शकतो.”

गिरीश सांगतात की, “भविष्यात तुंम्हाला कर्नाटक आणि बंगळूरूच्या सर्वच प्रमुख ठिकाणी ‘नोटरी मामा’ भेटणार आहे. येत्या पाच वर्षात संपूर्ण भारतात विस्ताराची योजना तयार करत आहोत.”

या अनोख्या कामासारखी कोणत्याही सुरूवातीबाबत जर तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा.

working as accridated jurno from last15yrs.at mumbai mantrly political beat. working for documentry films making, scriptting, tv shows &print media .intersted in social issues.

Related Stories

Stories by kishor apte