‘मोफत सेवा देऊ नका’, यशस्वी व्यवसायाचा मूलमंत्र!

‘मोफत सेवा देऊ नका’, यशस्वी व्यवसायाचा मूलमंत्र!

Monday November 02, 2015,

3 min Read

शॉपिंग अर्थात् खरेदीचा अनुभव आनंददायी, सहज-सोपा व्हावा, त्रासदायक नसावा, या हेतूनं लेझीशॉपर डॉट कॉम ही वेबसाईट सुरु झाली. या वेबसाईटचे संस्थापक हितेश अग्रवाल त्यांच्या बहिणीला तिच्या लग्नाचे कपडे खरेदी करताना होणारा त्रास पाहिला. त्यांनी तिला ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय सुचवला. पण इतके महागाचे कपडे ट्राय केल्याशिवाय थेट विकत घ्यायला तीही इतरांप्रमाणेच घाबरत होती. यातूनच हितेश यांच्या मनात ई-कॉमर्स आणि ऑफलाईन खरेदी याबद्दल विचार सुरु झाला.

लेझिशॉपर डॉटकॉम (lazyshopr.com) म्हणजे उंची वस्त्रांसाठीचं विंडो शॉपिंग, असं हितेश अग्रवाल आपल्या व्यवसायाचं वर्णन करतात. त्यांची वेबसाईट छोटी बुटीक्स आणि दुकानांना ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून देते.

image


लेझीशॉपर डॉट कॉमवर मेड-टू-ऑर्डर उंची कपड्यांचे भरपूर प्रकार पहायला मिळतात. हितेश कोलकात्यात राहतात. जून २०१४ मध्ये त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला. त्यापूर्वी ते एका बँकेत काम करत होते. माझ्या डोक्यात नवनवीन विचार यायचे, पण कॉर्पोरेट क्षेत्रातली नोकरी सोडण्याचं धाडस होत नव्हतं, असं हितेश सांगतात. पण या वेबसाईटचे सहसंस्थापक गौरव झुनझुनवाला यांनी नोकरी सोडली आणि त्यांच्याशी चर्चेदरम्यान हितेश यांनी लेझीशॉपर डॉट कॉमची संकल्पना मांडली. त्यानंतर गौरवसोबत काम सुरु केलं आणि आपली एक टीम होऊ शकते, याची जाणीव काही दिवसांतच झाल्याचं हितेश सांगतात.


image


लवकरच या दोघांनी देबर्घया या त्यांच्या पहिल्या कर्मचाऱ्याची नियुक्ती केली. ते आता यूआय आणि यूएक्स विकास आणि ग्राफिक डिझायनिंगचं काम पाहतात. ग्राहक, विपणन आणि भांडवल उभारणीचं काम हितेश तर उत्पादन आणि दर्जा वाढवण्याचा काम गौरव पाहतात.भारतात डिझायनर कपड्यांची बाजारपेठ दरवर्षाला ४० टक्के वेगानं वाढत आहे. पुढील तीन वर्षांत यातील उलाढाल ६६ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. अनेक डिझायनर्सनं आपआपले ब्रँड्स सुरु केले आहेत.

कोलकातामध्ये आतापर्यंत लेझीशॉपर डॉटकॉमची १० बुटीकसोबत भागीदारी आहे. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी पुढच्या काही महिन्यांत इतर शहरांमधल्या बुटीकसोबत भागीदारीची त्यांची योजना आहे. सुरुवातीला दुकानदारांना लेझीशॉपर डॉट कॉमचं नेमकं काम काय आहे ते समजावून देण्यात खूप अडचणी आल्या. अनेकांना आम्ही ई कॉमर्सचाच भाग असल्याचं वाटत होतं. डिझायनर्सना समजावून सांगण्यात खूप अडचणी आल्या, असं हितेश सांगतात.

ग्राहकांना (बुटीक्स आणि दुकानांना) भेटून वेबसाईटची टीम फोटोशूट आणि वेबसाईट पाहण्यासाठी तीन महिन्यांचं किंवा वर्षभराचं सदस्यत्व देते.


image


सध्या तरी त्यांना कोणीही प्रतिस्पर्धी नाही. ज्यांनी अशा प्रकारचा व्यवसाय सुरु केला होता, ते आता ई-कॉमर्सकडे वळले आहेत. यावरूनच ऑनलाईन सामान विकणं हे किती फायदेशीर आहे हे यावरून स्पष्ट होतं. खरंतर हेच या टीमसाठी एक आव्हान आहे. पण लेझीशॉपर डॉट कॉमला स्वत:वर विश्वास आहे.

एकीकडे व्यवसाय वाढत असतानाच यावर्षाच्या अखेरपर्यंत आम्ही कोट्यवधी रुपये कमवण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. पुढच्या वर्षी तयार कपड्यांसाठी एक मॉडेल सादर करण्याची आमची योजना आहे. ती यशस्वी झाली तर आमचा व्यवसाय खूपच वाढेल.

सुरुवातीला आम्ही मोफत सेवा दिल्याने आमच्या आर्थिक अडचणी खूपच वाढल्या. त्यानंतर आम्ही धाडस करून आमच्या व्यवसायाचं मॉडेल बदललं. त्यानुसार आमच्या वेबसाईटचं सदस्यत्व घेण्यासाठी आम्ही शुल्क आकारू लागलो. आश्चर्य म्हणजे दुकानदारांनी आमच्या या मॉडेलला चांगलाच प्रतिसाद दिला, असं हितेश सांगतात.

एक कॉर्पोरेट कर्मचारी ते संस्थापक या प्रवासात मला खूप शिकायला मिळालं,असं हितेश सांगतात. कोणतंही स्टार्टअप सुरु केल्यानंतर मोफत सेवा देणं हा मूर्खपणा आहे. पहिल्या दिवसापासूनच व्यवसायात पैशाला महत्त्व दिल्यास तुम्हालाच त्याचा फायदा होईल, असं हितेश सांगतात.