कठीण विषयाच्या मूळ संकल्पनेची ओळख करून देणाऱ्या 'Ed3d' प्रयोगशाळा : राखी चावला यांचा अनोखा शैक्षणिक उपक्रम

0

एक सॉफ्वेअर रिसर्च इंजिनिअर ते एक आई आणि आई ते एक शैक्षणिक उद्योजिका ( Eduentreprenuer) – राखी चावला यांच्या आत्तपर्यंतच्या प्रवासाचा हा सारांश आहे.

‘एमटेक’च्या शेवटच्या सेमिस्टर दरम्यान त्यांना हैद्राबादमध्ये एक प्रसिद्ध ‘एमएनसी’कडून आकर्षक नोकरीची ऑफर मिळाली आणि त्याच्या पुढच्याच महिन्यात त्यांचे लग्न ठरले. राखी यांचे होणारे पती स्लमबर्गरमध्ये नोकरी करत असल्याने त्यांनी हैदराबादमध्येच आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली आणि सुटीमध्ये त्यांना भेटण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांचे लग्नही झाले.

आपल्या मुलाच्या जन्मानंतर राखी त्यांचे स्वत:चे गाव असलेल्या आग्र्याजवळ असलेल्या नोएडाला रहायला गेल्या. तिथे त्यांनी जवळजवळ एक वर्ष काम केले. दरम्यानच्या काळात त्यांच्या पतींची पुन्हा भारतात बदली झाली. राखी म्हणतात, “ माझ्या समोर दोन पर्याय होते. एक तर सगळे काही सोडून त्यांच्यासोबत जगभराचा प्रवास करायचा किंवा मग ब्रेक घेऊन आपल्या स्वत:च्या गावी जायचे आणि मुलाचे संगोपन करायचे. मी दुसरा पर्याय निवडला.”

त्यांनी ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग आणि एमबीए स्तरावर गणित आणि कॉम्प्यूटर सायन्सचे गेस्ट लेक्चर्स घ्यायला सुरवात केली. हे करत असताना आपण शिक्षण पद्धतीत संशोधन करायचे असे त्यांनी ठरवले. त्या सांगतात, “ त्याचवेळी शिक्षणाच्या खालावलेल्या परिस्थितीची मला जाणीव झाली. काहीही महत्त्वाचे न शिकता विद्यार्थी केवळ गुण आणि पदवीवरच लक्ष केंद्रीत करत होते.” त्यांनी सुमारे दोन वर्षे शिकवण्याच्या विविध पद्धतींचा अवलंब केला, परंतु त्या सांगतात की शिकवण्याची नेहमीची पद्धत विद्यार्थ्यांच्या इतकी अंगवळणी पडली होती, की मी वापरलेल्या नाविण्यपूर्ण पद्धतींचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. खरी समस्या ही प्राथमिक आणि माध्यमिक स्तरापर्यंतच ( इयत्ता आठवी पर्यंत) आहे असे राखी यांच्या लक्षात आले.

जेव्हा एखादा विद्यार्थी नवव्या वर्गात जातो तेव्हा त्याच्यावर पालक, शाळा, कोचिंग क्लासेस अशा सगळ्यांचे लक्ष केंद्रीत होते. एज्युप्रेनिअर असलेल्या राखी सांगतात, “ त्यावेळी विद्यार्थ्यांवर मोठ्या महत्त्वाकांक्षा, प्रिमियर संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी द्यायची प्रवेश परिक्षा अशा गोष्टींचा मोठा दबाव असतो.”

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवण्यासाठी स्मार्ट शिक्षक, स्मार्ट मेथडॉलॉजिस्ट आणि स्मार्ट माईंडची आवश्यकता असल्याचा अंदाज राखी यांना आलेला आहे.

अशा प्रकारे आपले होमटाऊन असलेल्या आग्र्यात Ed3d (ईडी३डी) च्या स्थापनेसह त्या आता उद्योजिका बनल्या आहेत. त्या Ed3d च्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांचा हा उपक्रम म्हणजे उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्येक कठीण विषयाच्या बेसिक संकल्पनेची ओळख करून देण्याचा एक प्रयत्न आहे. Ed3d मध्ये गणित आणि तर्कशास्त्र, कॉम्प्युटर तसेच शास्त्रासाठी तीन प्रयोगशाळा आहेत.

राखी यांनी प्राथमिक स्तरावर गणिताची तोंडओळख करून देणारा इंट्रोडक्शन प्रोग्रॅम तयार केला आहे. हा प्रोग्रॅम व्हिज्युअल, टेक्स्टाईल आणि प्रायोगिक पद्धतीवर आधारित आहे. २०१३ च्या अखेरी पर्यंत त्यांच्याकडे १३ वर्षांच्या मुलांसाठी एक अभ्यासक्रमाचा आराखडा तयार होता. राखी यांच्या मुलाची सुद्धा त्यांच्या या कार्यात त्यांना मदत होते. आपल्या मुलाने शिकावे, अन्वेषण करावे, संशोधन करावे, प्रयोग करावेत असे राखी यांना वाटते.

शिक्षण पद्धतीचे गणित सोडवणा-या राखी चावला
शिक्षण पद्धतीचे गणित सोडवणा-या राखी चावला

गणितावर प्रेम करणा-या राखी यांनी स्वत:ला या विषयासाठी समर्पित केले.

राखी यांनी आग्र्यामध्येच गणित आणि कॉम्प्यूटर या विषयांमध्ये बीएससी आणि एमएमसी या पदव्या घेतल्या. कॉलेजला असतानाच मुंबई विद्यापीठाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या आणि आयआयटी, मुंबईमध्ये पार पडलेल्या एमटीटीएस ( मॅथेमॅटिक्स ट्रेनिंग अँड टॅलेंट सर्च प्रोग्रॅम) साठी त्यांची निवड करण्यात आली. हा महिन्याभराचा अभ्यासक्रम होता. यामध्ये देशभरातून गणित या विषयातील प्रतिभावान विद्यार्थी सहभागी झाले होते. राखी म्हणतात, “ शहराबाहेर माझे हे पहिलेच पाऊल होते. मी एकटीच मुंबईला जात आहे हे पाहून माझी आई रडली होती हे मला आजही आठवते. परंतु खरे म्हणजे मला गणिताच्या आणखी जवळ नेणारा तो माझ्या आयुष्यातील एक निर्णायक टप्पा होता.” त्यानंतर एका रिसर्च प्रोजेक्टसाठी आयआयटी, कानपूर इथे त्या गेल्या. त्यानंतर त्यांनी एमटेक केले आणि मग जीएटीई प्रवेश परिक्षेची तयारी सुरू केली. कोणत्याही प्रकारचे कोचिंग न करता राखी यांनी स्वत:च आपली तयारी केली. तरी सुद्धा त्या जीएटीई प्रवेश परिक्षेत रँकिंगमध्ये भारतातून ६६ व्या आल्या.

Ed3D ची युएसपी

इथे विद्यार्थ्यांची वर्गवारी त्यांच्या ग्रेड किंवा वयाच्या आधारे न होता त्यांची शिकण्याची क्षमता, त्यांचा कल आणि त्यांची रूची पाहून केली जाते. राखी सांगतात, “ प्रत्येक मुलात वेगवेगळ्या क्षमता असतात. यामुळे त्या सर्वांकडून एकाच विषयामध्ये एकाच प्रकारची क्षमता असावी अशी अपेक्षा करणे म्हणूनच अनावश्यक आहे. मुलांच्या इयत्तेनुसार त्यांचा बेसिक आयक्यू स्तर आणि गणितीय तर्काचे परिक्षण करण्यासाठी आम्ही एक ‘इंटरेस्ट टेस्ट’ नावाची चाचणी तयार केली आहे. या दोन वर्षांच्या काळात आम्ही अशा प्रकारच्या ५० चाचण्या घेतल्या आणि आम्हाला आश्चर्य वाटते की केवळ ४ टक्के मुलेच आपल्या क्लास स्तरावरच्या चाचण्यांमध्ये पास होऊ शकली. या चाचणीमध्ये विद्यार्थ्यांचे सरासरी गुण होते ३.५ इतके.

यामुळे विद्यार्थी जो पर्यंत आत्मविश्वासाने चाचणी पास होत नाहीत तो पर्यंत त्यांना एक स्तर खालीच ठेवण्यात आले. यानंतरच मग विद्यार्थी मुलभूत बाबींवर काम सुरू करत असत. राखी म्हणतात, “ अशा प्रकारच्या दुरूस्ती आणि घडवण्याला वेळ तर लागतोच, परंतु याचे परिणाम खूपच चांगले येतात.” त्यांनी नुकतीच ‘फिल्ड क्लासरूम’ पद्धत सुद्धा सुरू केली आहे. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व्हिडिओ क्लीप्पिंग्स दिल्या जातात ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यावर विचार करणे, चर्चा करणे आणि प्रॉब्लेम-सोडवण्यात चांगली मदत होते.

शिकवण्याच्या नव्या पद्धतीचा उपयोग करण्याच्या दृष्टीने पालकांना तयार करणे हे रेखा यांच्या या संपूर्ण प्रवासातील सर्वात मोठे आव्हान होते. Ed3D ने विद्यार्थ्यांसाठी कोडिंग पद्धतीसुद्धा लागू केली. राखी हसत हसत म्हणतात, “ सुरूवातीला माझे आई-वडिल द्विधा मनस्थितीत होते. मी आकर्षक नोकरी सोडून एक शैक्षणिक उपक्रम सुरू करण्याच्या माझ्या निर्णयाबाबत ते साशंक होते. परंतु त्यांनी कधीही मला दिलेला पाठिंबा काढला नाही. भलेही माझे सासू-सासरे दूर राहत असतील, परंतु त्यांनी सुद्धा कधी माझ्या व्यस्त वेळापत्रकाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही. कधी कधी तर मला २० तास सुद्धा काम करावे लागले आहे. तरीदेखील त्यांनी त्याबाबत तक्रार केली नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझा सहा वर्षांचा मुलगा सुद्धा मला चांगल्याप्रकारे समजून घेतो आणि माझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण तो अमूल्य बनवतो.” त्यांच्या पतींबरोबरच त्यांच्या Ed3D टीमचे देखील त्यांना चांगले सहकार्य मिळते.

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories

Stories by sunil tambe