आयआयटी २०१८च्या शैक्षणिक वर्षापासून महिलांना २० टक्के आरक्षण देण्याच्या विचारात !

आयआयटी २०१८च्या शैक्षणिक वर्षापासून महिलांना २० टक्के आरक्षण देण्याच्या विचारात !

Thursday April 27, 2017,

2 min Read

देश म्हणून आपण खूप प्रगती केली असली तरी देशात आजही ब-याच भागात मुलींना शाळेत जाण्यास मज्जाव केला जातो. परंतू महाविद्यालयात जावून उच्च शिक्षण घेणे हे तर त्यापेक्षा अवघड आहे. त्यामुळेच मुलींचा उच्च शिक्षणात येण्याचा टक्का घसरला आहे.

सन २०१६मध्ये, आयआयटी मध्ये प्रवेश घेणा-या मुलींचे प्रमाण केवळ आठ टक्के होते. या स्थितीतून बाहेर पडून समतोल साधण्यासाठी अभियांत्रिकीमधील या प्रमुख संस्थेने राखीव वीस टक्के जागा मुलींना देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सांगताना, संयुक्त प्रवेश समितीचे सदस्य म्हणाले की, “ हा विशेष राखीव कोटा लैंगिक समतोल साधावा यासाठी केला जात आहे. कारण महिला विद्यार्थी यांचे प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी आहे. जरी त्या सर्वसाधारण वर्गातून निवडल्या गेल्या नाहीतर त्यांना या विशेष राखीव कोट्यातून प्रवेश दिले जातील”.


image


हा विशेष राखीव कोटा लागू केल्याने एकूण जागांची संख्या वाढणार आहे, ज्या जास्तीच्या जागा असतील त्या महिलांना राखून ठेवल्या जातील. त्यामुळे मुलांच्या आयआयटी मध्ये प्रवेश घेण्याच्या संख्येवर बंधने येणार नाहीत. हे २०१८मध्ये सुरू करण्यात येणार आहे. ज्या मुलींनी संयुक्त प्रवेश परिक्षेची ऍडव्हान्स पातळी पूर्ण केली आहे, आणि त्यांच्या मंडळाच्या गुणवत्ता यादीत पहिल्या वीसात आल्या आहेत त्यांना हा प्रवेश घेता येणार आहे.

याबाबत मानव संसाधन विभागाच्या अधिका-याने सांगितले की, “ या वीस टक्के विशेष राखीव कोट्यामुळे मुलींच्या प्रवेशाचा मार्ग सुकर होणार आहे. उदाहरण म्हणून, जर येथे शंभर जागा असतील आणि त्यातील केवळ दहा मुलींनी घेतल्या असतील तर संस्था आणखी वीस टक्के जागा त्यांना उपलब्ध करून देईल ज्या केवळ महिलांसाठी असतील. हा प्रयत्न तोवर केला जाणार आहे जोवर पुरेशा प्रमाणात महिलांच्या जागा भरल्या जाणार नाहीत.”

आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे, की जर महिलांची जागा रिक्त झाली, तर ती केवळ महिलांना भरता येईल त्यातून महिलांना जास्त प्रमाणात संधी देता येईल. (थिंक चेंज इंडिया)