कला जोपासण्यासाठी शिस्तबद्धता महत्वाची :आयना गुंजन

0

आयना गुंजन यांचा जाहिरात क्षेत्रातला अनुभव आहे तब्बल १८ वर्षांचा! ओगोवी आणि एचटीए/जेडब्ल्यूटी आणि त्यानंतर मुद्रा, बेट्स ४१ , डेण्ट्सु आणि लॉ एंड केनेथ सारख्या कंपन्यांमध्ये नियोजन प्रमुख पदावर त्यांनी काम केलेले आहे. सिमीयोटिक्स अर्थात चिन्ह विज्ञानात  त्यांना विशेष गती असल्याने या विषयात जागतिक स्थानिक पातळीवर, कॉर्पोरेट क्षेत्रात त्यांचा विशेष प्रभाव आहे. यामध्ये त्यांनी गेल्या दोन दशकातल्या सामाजिक-सांस्कृतिक बदलांचा आणि पद्धतींचा मागोवा घेतला आहे. आयना याच कामामध्ये संपूर्ण व्यस्त असतील असं तुम्हाला वाटत असेल पण आज त्यांचं वय आहे पंचेचाळीस आणि त्यांनी या कामाव्यतिरिक्त बरंच काही साध्य केलं आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये त्यांचं चित्र प्रदर्शन नवी दिल्लीतल्या व्हिज्युअल आर्ट्स गॅलरीमध्ये भरलं होतं. ज्याचं नाव होतं, 'द मुविंग फिंगर'. आयना यांना भेटल्यावर कोणाच्याही सहज लक्षात येत की त्या उत्साहाचा सळसळता झरा आहेत.

" तुम्हाला ज्याची आवड आहे ते-ते सर्व करण्यासाठी तुमच्यात एक शिस्तबद्धता असावी लागते." आयना सल्ला देतात. त्या स्वत: एक प्रशिक्षित सतार वादकही आहेत. "कॉर्पोरेट जीवनाने मला उच्च पातळीवर स्थान मिळवून दिले  तर  कला म्हणजे माझ्यासाठी ध्यानस्थ होण्याची एक प्रक्रिया आहे", त्या सांगतात.

"सुलेखनाच्या माध्यमातून  त्यांनी अनेक कॅन्व्हास चितारले आहेत. त्यांच्या या प्रदर्शनाची जबाबदारी इतिहासकार अलका पांडे यांनी पेलली.

कुटुंबातूनच मिळाला कलेचा वारसा :

चित्रकारितेचा वसा त्यांना आपल्या कुटुंबाकडूनच मिळाला आहे. " माझे आजी-आजोबा हे स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी होते. माझ्या कुटुंबात वकिलांचा भरणा अधिक आहे. पण त्यामुळे आमचं संगोपन हे अत्यंत सुधारक विचार, सांस्कृतिकरित्या उच्च आणि धर्मनिरपेक्ष वातावरणात झालं. आमच्या बाराखंबा इथल्या मॉडर्न शाळेत, एक अप्रतिम कलादालन होतं. माझे वडील हे पिडीलाइटमध्ये कामाला होते. ज्यामुळे माझ्या कलात्मकतेला खतपाणी मिळत गेलं. फेविक्रीलची विविधता, फेविकॉलचा जोड, कला पुस्तक आणि पिडीलाइट द्वारे भरवण्यात येणारं कला प्रदर्शन या सर्वांनी मला माझ्या सृजनशील अंत:प्रेरणेला भरारी मिळत गेली. लेडी श्रीराम या महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी मिळवली याच महाविद्यालयातल्या 'हाइव' या कला वसाहतीत त्या संपूर्णपणे गुंतल्या होत्या. आव्हान पेलणं हे आयनाला खूप आवडतं. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी बिसनेस अर्थशास्त्र या विषयात मास्टर्स मिळवलं आणि जाहिरात क्षेत्रात उडी मारली. त्यांच्या सगळ्या मित्रमंडळीनी मात्र वित्तीय क्षेत्राकडे धाव घेतली.

त्यांना देशी आणि विदेशी अशा विविध उत्पादनांसाठी काम करण्याचा अनुभव आहे. ज्यामध्ये नोकिया, कॅनॉन, लोटस हर्बल्स, सोनी एरिक्सन, सॅमसंग, यामाहा  आणि डाबर सारखी नामांकीत उत्पादनं आहेत. या अशा नामांकीत उत्पादनांबरोबर, काम केल्यानंतर, आयना यांनी पुन्हा एकदा स्वतंत्ररित्या संकेतशास्त्रावर काम करायला सुरुवात केली ज्यामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रकल्पांत भारतीय बाजारपेठेचं प्रतिनिधित्व केलं.

नवा प्रदेश :

" पगाराच्या नोकरीपलीकडे जाऊन मला काहीतरी नाव शोधायचं होतं. सिमीयोटिक्स म्हणजे, संकेतशास्त्र - दृक सांस्कृतिक भूप्रदेशाचं चित्रणाचं सोप्या लिपीत भाषांतर करणं - ग्राहकांच्या वर्तणुकीवर आणि वृत्तीवर तिथला भूप्रदेश कश्यापद्धतीने परिणाम करत असतो याचा अभ्यास करणं." त्या सध्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक तज्ञांसोबत काम करत आहेत आणि कामाचं उद्दिष्ट्य आहे ते म्हणजे या प्रकल्पासाठी परस्परांचा सांस्कृतिक दृष्टीकोन समोर आणणे. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवरही काम केलं आहे ज्यामध्ये जे एंड जे, पेप्सिको गटोरेड, नोकिया, अस्ट्राझेनेका तसंच इंग्लंडमधील काही कंपन्यांचा समावेश आहे. ( स्पेस डॉक्टर्स, ट्रुथ कन्सल्टिंग आणि विज्युअल सायनो ) आयाना यांचं आणखी एक काम म्हणजे भारतात त्यांनी फोर्ड कार संस्थापकीय रचनेच्या प्रकल्पासाठी नेतृत्व केलं. हा प्रकल्प त्यांनी टीम डेट्रोइट (डब्ल्यू पी पी ) -फोर्ड मोटर्स, यु एस ए विजुअल सायनो, यु. के यांच्या सहकार्याने साकार केला.

या सर्व काळात आयाना यांचं चितारणं सुरूच होतं. त्याच दरम्यान एका आयुष्य बदलवणाऱ्या गोष्टीनं त्यांना कलेच्या अधिक जवळ आणलं. विशेष म्हणजे अध्यात्म आणि स्वयं प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांना ते जाणवलं. " वयाच्या तिशीत माझा मृत्युशी सामना झाला. त्यानंतर मी निशेरेन डायशोनीन बुद्धीजम, श्री अरोबिंदो योग आदींची मदत घेतली. या अनुभवानं मला अंत:करणाचा शोध घ्यायला  शिकवलं, विचाराच्या कक्षा रुंद करायला शिकवलं. माझ्या कला पदवीपेक्षाही आध्यात्मिक शक्तीमुळेच कलाकार म्हणून माझा अधिक विकास झाला आहे. माझी कला ही स्वयंस्फुर्त आणि ध्यानस्थ मानाने उमटलेली प्रतिक्रिया आहे".

कॅलीग्राफीच्या पलीकडे

त्यांच्या कलेबद्दल सांगताना आयना म्हणतात की त्यांनी कॅलीग्राफीची पुरातन शैली घेऊन त्याला समकालीन अशा जागतिक भाषेत विलीन केलं आहे. विविध धार्मिक शास्त्रामधील वचनं, काव्य आणि ओळींचा वापर त्या आपल्या चित्रात करतात पण त्या सुलेखनाला अनोखं असं रूपडं देण्यासाठी त्या खास कौशल्य आणि अचूकतेचा वापर करतात. " तुम्ही मृत्यूचा सामना जेंव्हा करता, तेंव्हा आकारांचं जग नष्ट होतं त्याअनुभवानं मला आकार आणि सीमांच्या पलीकडे नेलं, एका अमूर्त जगात ".

त्यांनी यापूर्वी विविध गटांमधल्या शो मध्ये आपली चित्र प्रदर्शित केली आहेत, जिथे त्यांच्या कॅलीग्राफीचा वापर करून चितारलेल्या या अध्यात्मिक ओळींना भरभरून दाद मिळाली आहे . " मी भिंती सजवण्यासाठी चित्र काढत नाही. तर भिंती तोडण्यासाठी (अंतरमनातल्या ) चित्र काढते. माझा कलात्मक प्रवास हा माझ्या आध्यात्मिक विकासाचं स्पष्टीकरण देत रहतो. माझ्या चित्रांतून मी नेहमी जगाची असणारी व्याप्ती, परिमाण आणि आयुष्याचा त्यातील दृष्टीकोन यांचा मागोवा घेत असते.

उदाहरणा दाखल सांगायचं झालं तर त्यांच्या 'अस्पायरेशन '(२०१२) या सिरीस मध्ये त्यांनी, अरेबिक थुलुजवरून प्रेरित चित्र प्रदर्शन केलं होतं. " यातील त्रिकोण म्हणजे स्वत:साठी उच्च स्थान निर्माण करणे आणि सामाजिक परिस्थितींच्या अडथळ्यांना पार करणे." २०११ सालच्या त्यांच्या डे एंड नाईट या जलरंग आणि शाहीत रंगवलेलं चित्र प्रदर्शन हे बुद्धिस्ट संकल्पनेवर आधरित होतं. "इचीनेन संझेन म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य काळ हा एका क्षणात पाहणे.

" आजच्या युगात , जिथे आपण संपूर्ण जगाशी सेकंद सेकंदाला जोडलं जातो. तिथे खरंच वेळेचं बंधन नाहीये. दिवस रात्र ही संकल्पनाच नसते." त्या सांगत होत्या . " नारंगी रंग हा आपल्या आयुष्यातला सूर्यप्रकाश दर्शवतो आणि निळा रंग हा अंतर्मनातील व्याप्ती दर्शवतो. "माझा एक आत्मनिरीक्षणात्मक प्रकल्प होता 'आय एम' (२०१५) ज्यामध्ये शिवोहं हे इंग्लिश भाषेतील गाणं मी कॅलीग्राफीच्या माध्यमाचा वापर करत बिंदू किंवा गोलाकारांच्या स्वरुपात मांडलं होतं. दुसर एक काम म्हणजे लोटस सूत्र, आयानाच्या आयुष्याकडे बघण्याच्या दुष्टीकोनावर आधारीत असणारं. ४ फेब्रुवारी २०१० या दिवशी ते साकार झालं. याचं कारण म्हणजे हा दिवस जागतिक कोसेन रुफू दिवस अर्थात वैयक्तिक माध्यमातून जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी  मनवला जातो. " लोटस सूत्र ही प्रार्थना म्हणजे शांती पसरवण्यासाठी केली जाते , बुद्धिजममध्ये ही प्रार्थना केली जाते आणि मला असं वाटत की हे काम म्हणजे माझ्या आध्यात्मिक यशप्राप्तीचं फळ आहे असं मी समजते. मी यामध्ये चार तास केला जाणारा संपूर्ण पाठ चितारला आहे .

कलेचं मोल

उत्पादन धोरणकार ते कलाकार असा प्रवास करणाऱ्या आयना यांच्या मते प्रत्येक कलाकाराची एक अनोखी शैली,अनोखा बाज असतो, जो त्याचा स्वत:चा अनोखा दृष्टीकोन आणि शोध घेऊन आयुष्याच्या आणि कलात्मकेच्या प्रांतात वावरत असतो. त्यानंतर निश्चित स्वरूपाचं उत्पादन आपल्यासमोर अवतरतं. " कोणत्याही अन्य उत्पादनांप्रमाणेच निर्मित कलेला सुद्धा बाजारपेठेत मोल असतं, कोणतीही गोष्ट फुकट येत नसते. कलेची किंमत ही त्यांच्या सच्चेपणावर, दर्जावर आणि अर्थात त्याच्या मागणीवर ठरते. " त्या सांगत होत्या.  या उत्पादन निर्मितीमागचा फरक इतकाच आहे की," सध्याचा कल, गरज किंवा इच्छा यानुसार हि निर्मिती होत नाही, तर कलाकारांच्या स्वत:च्या इच्छेनुसार ती होत असते ." आयाना आपला स्वानुभव सांगत होत्या, त्यांनी तर आपल्या पहिल्या प्रदर्शनापासून ही अनुकुलता अनुभवली आहे .

आणखी काही कला विषयक कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा  :

अनु मल्होत्राच्या कॅमेऱ्यातून शोध अद्भुत भारताचा
चित्रकलेच्या कुंचल्याकडून फॅशनच्या कुंचल्याकडे, ज्योती सचदेव अय्यर नाविन्यतेच्या शोधातअंध व्यक्तींना मिळाला चित्र पाहण्याचा अनोखा अनुभव


लेखिका- पुनम गोयल

अनुवाद - प्रेरणा भराडे