हेल्थनेक्स्टजनद्वारे गंभीर आजारांचे अनुमान

 हेल्थनेक्स्टजनद्वारे गंभीर आजारांचे अनुमान

Thursday February 11, 2016,

5 min Read

एकेकाळी योग्य डॉक्टर शोधणं, तपासकेंद्र शोधणं, औषधं आणि वैद्यकीय सेवा मिळवणं चांगलच दिव्य असायचं. पण हल्ली या सगळ्याकरता खूपशा सोयी उपलब्ध आहेत. ऑनलाइन डिलिव्हरी पोर्टल आणि सल्ला पोर्टलमुळे वैद्यकीय सुविधांच्या क्षेत्रात सहजता आलीय. आरोग्यसेवांच्या उपलब्धतेवरच या स्टार्टअप्सचा मुख्य भर आहे. आपली माहिती घेऊन आकडेमोड करत साधनांच्या सहाय्याने हेल्थनेक्स्टजेन (HealthNextGen) एखाद्या रोगाचे अनुमान करते.

चिकित्सक पद्धती (Clinical parameter) आणि जनसंख्येचं प्रमाण यावर आधारित माहितीने आजाराचं अनुमान केलं जातं. सध्या या पोर्टलवर ह्रद्याशी संबंधित आजार, मधुमेह, जंतुसंसर्गामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि हॉस्पीटलमधून घरी आल्यावर घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केलं जातयं.

एखाद्या रोगाची साथ, त्याबाबतची माहिती, वैद्यकीय आकडेवारी, काही सामान्य आजारांवर उपाययोजना यागोष्टीही आपल्याला हेल्थनेक्स्टजन मधून जाणून घेता येतात. अनुमान, विश्लेषण याशिवाय गंभीर रुग्णांनी औषध घेण्याबाबत जागरुकता, त्यांच्या डॉक्टर्ससोबत संवाद आणि त्यांचं आरोग्य पूर्वपदावर येण्याकरता घ्यावी लागणारी खबरदारी यासर्वांची काळजी हे पोर्टल घेतं.

सुरूवात

वेंकटेश हरिहरन आणि सुरेश मल्लांदिरा हे एकमेकांना गेल्या १५ वर्षांपासून ओळखतात. भारतातली आरोग्यसेवा आणि उपचारसेवांचा दर्जा कसा वाढवता येईल याबाबत त्यांनी गेल्या वर्षी विचार करायला सुरूवात केली. वेंकटेश यांचे भाऊ संतोष हरिहरन यांनी स्टॅनफोर्ड बरहॅम आणि टोरोंटो विद्यापीठात आरोग्य संशोधक म्हणून काम केलंय. या क्षेत्रातल्या आपल्या अनुभवाचा उपयोग हेल्थनेक्स्टजनमध्ये करण्याचं त्यांनी ठरवलं.

सेवा व्यवस्थापन आणि इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्डस् (इएमआर) या गोष्टींनी या पोर्टलची सुरूवात करण्यात आली. भारतात इएमआरची उपलब्धता आणि आरोग्याची काळजी यांचा दर्जा उंचावणे हे आव्हानात्मक काम असल्याचं या तिघांच्या लक्षात आलं.

४० वर्षीय वेंकटेश सांगतात, “इएमआरचा वापर करत आमच्याकडचं साधन हे रुग्णाचं पूर्वानुमान, प्राथमिक औषधोपचार आणि सर्वांगिण काळजी याबाबत माहिती देतं. भारतात इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदी करणं बंधनकारक केलं पाहिजे. यामुळे रुग्णाला चांगले उपचार तर मिळतीलच शिवाय आरोग्यसेवांवरील खर्चही कमी होईल”.

हेल्थनेक्स्टजनचे संस्थापक

हेल्थनेक्स्टजनचे संस्थापक


केंद्र आणि वाढ

आजाराचा अचूक अंदाज बांधण्याकरता हेल्थनेक्स्टजनची कार्यक्षमता वाढवण्यावर त्यांचा सध्या भर आहे. या व्यासपीठावर शारिरीक, जीवरासायनिक चिकित्सक गुणविशेष फक्त सांगण्यात येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. विशेषज्ञ, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञाच्या टीमचाही या पोर्टलवर समावेश केला पाहिजे असं त्यांना वाटतयं. रुग्णाची संपूर्ण उपचारपद्धती, प्रगती याबाबत वैयक्तिक माहिती पोर्टल उपलब्ध करून देते.

वेंकटेश सांगतात, त्यांचं पोर्टल वेगवेगळ्या आजारांचे प्रकार आणि राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर लोकांचं आरोग्य यासर्वाची माहिती देतं.

संघ बांधणी

तंत्रज्ञांसोबतच त्यांनी एका गुणसुत्रांच्या संशोधकांचीही बोर्डवर नेमणूक केली आहे. मूळचे टोरंटोचे हे संशोधक Genomics Data संशोधक आहेत.

वेंकटेश सांगतात, “आम्ही काही दिवसांमध्ये काही मेडिकल डॉक्टर्सची आणि व्यवसाय सल्लागारांचीही बोर्डवर नेमणूक करणार आहोत. थोडक्यात, डल्लास, टोरोंटो आणि बेंगळुरू अशी आमची आंतरराष्ट्रीय पातळीवरची टीम आरोग्यसेवांमध्ये चांगला बदल घडवण्याकरता एकत्र येऊन काम करत आहे”.

वेंकटेश म्हणाले की त्यांना अमेरिकेत काही सेवाधारित स्पर्धक आहेत. पण भारतात मात्र अजून त्यांच्या विश्लेषण करण्याच्या क्षेत्रात फारशी स्पर्धा नाही. आरोग्याची काळजी, विश्लेषणात्मक अनुमान आणि लोकसंख्येचं आरोग्य या गोष्टींची त्यांनी सुरूवात केल्याने ते अग्रेसर ठरू शकण्याचा अंदाजही ते व्यक्त करतात.

रुग्णांचं व्यवस्थापन या बाबतीत मात्र त्यांना भारतात स्पर्धक आहे. रुग्णांच्या पातळीवर चिकित्सक माहिती साठवून अनुमान व्यक्त करणे हा त्यांचा निश्चितच वेगळेपणा ठरतो.

महसूल

हेल्थनेक्स्टजनकडे आपलं एक सॉफ्टवेअर आहे. नेटवर्कवर ग्राहक स्वतःच पाहून ते वापरू शकतात (SaaS based model of revenue). प्रत्येक रुग्णागणिक दर आकारला जातो (इएमआर, औषधोपचाराची काळजी आणि त्यांच्या विश्लेषणात्मक अनुमान या दोन्ही करता दर आकारण्यात येतो).

काही सेवापुरवठादारांकडे आधुनिक इएमआर आहेत, ते रुग्णांची संख्या, चिकित्सा इतिहास आणि माहितीचं प्रमाण या सगळ्याच्या प्रमाणानुसार विश्लेषणात्मक अनुमानाकरता दर आकारतात.

सहा महिन्यांपूर्वी त्यांनी HNG@Manage या पोर्टलवरून सुरुवात केली. आता HNG@Clinic app सुरू करताना १५ हजार रुग्ण त्यांची सेवा घेत आहेत.

उत्पादन काय करतात?

वेंकटेश माहिती देतात, “रुग्णालयांकडे असलेल्या माहितीच्या खजिन्यावर आमचं विश्लेषणात्मक अनुमान अंमलात आणण्याकरता, आम्ही भारतासोबतच अमेरिकेतल्याही काही मोठ्या रुग्णालयांच्या संपर्कात आहोत. आम्हांला त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये ते आमचं तंत्रज्ञान स्वीकारतील अशी आशा आम्हाला आहे”.

दोन महत्त्वाची उत्पादन

1) HNG@Explore हे एक मशिनद्वारे विश्लेषण करणारं एप्लिकेशन आहे. लोकसंख्या आणि रुग्ण या दोन्ही पातळ्यांवर ग्राफिकच्या माध्यमातून विश्लेषण, बदल आणि माहिती हे सगळे सांगून आकडेमोड करून धोक्याची पातळी सांगण्यात येते. वेंकटेश म्हणतात, “रुग्णांच्या औषधोपचारांची माहिती वापरून अतिशय योग्य आणि किफायतशीर मान्यताप्राप्त औषधांची माहिती करून देणं हे आमचं ध्येय आहे”.

2) HNG@Manage हे रुग्णाच्या पातळीवरच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आरोग्याची नोंद करण्याचं साधन आहे. याद्वारे रुग्णाच्या औषधांच्या वेळा सांभाळून आठवण करून दिली जाते. ही दोन्ही उत्पादनं मायक्रोसॉफ्ट अझुरवर उपलब्ध आहेत.

भविष्यातील योजना

यंदा, देशातल्या मोठ्या आरोग्य सेवा पुरवठादारासोबत एकत्र येऊन काम करण्याचा त्यांचा मानस आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या वेगवेगळ्या माध्यमातून चिकित्सक (Clinical) आणि महत्त्वाची माहिती अधिक विस्ताराने गोळा करायची आहे.

यासोबत आजार पद्धतीवर संशोधन आणि प्रतिमाधारित (X-ray, CT, MRI, cell based images) रोगनिदान आणि अनुमान याबाबत जास्त खोलात जाण्याचा त्यांचा विचार आहे.

वेंकटेश सांगतात, “आम्ही माहिती संकलित करण्याकरता भारतात आणि जागतिक पातळीवर मोठ्या सेवा पुरवठादारांसोबत काम करणार आहोत. रोगनिदान करता आमच्या अनुमान पद्धतीचा वापर करत, आरोग्यसेवांमध्ये सुधारणा आणि त्यावर होणाऱ्या खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत”.

युअरस्टोरीचं मत

औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन यांच्याकडील २००० -२०१५ दरम्यानची माहिती सांगते की, रुग्णालयं आणि निदानकेंद्र यांच्यामध्ये २,१७७ अब्ज ७६ कोटी ४६ लक्ष ३४ हजार ५०० रुपये एवढी प्रचंड परदेशी गुंतवणूक करण्यात आली. इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशन यांच्यानुसार, भारतातल्या आरोग्यसेवांचा बाजार २०१५ मध्ये ६,७८४ अब्ज १४ कोटी ५० लाख रुपये इतका होता. २०२० मध्ये हा आकडा १८,९९३ अब्ज ९२ कोटी ६० लाख रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीवर आधारित वार्षिक विकासदर (CAGR) २२.९ टक्के एवढा आहे. एकंदरीत बाजाराचा विचार केल्यास आरोग्यसेवा या क्षेत्राचा यात ६५ टक्के एवढा वाटा आहे.

डिएनए आधारित आरोग्य यावर काम करणाऱ्या हेल्थ जेनॉमिक्स कंपनीचे सहसंस्थापक डॉ अब्दुर रब यांच्यानुसार, “२०१५ मध्ये हेल्थकेअर क्षेत्रात आयटीचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाल्याच्या काही चांगल्या गोष्टी दिसून आल्यात. लोकांमध्ये तंत्रज्ञानाद्वारे आरोग्याची काळजी घेण्याकरता वेगवेगळ्या साधनांचा वापरही वाढला आहे”.

हेल्थनेक्स्टजन यादृष्टीनेच पुढे जात आहे. पण त्यांना मोठी गुंतवणूक असणाऱ्या स्टार्टअप्सच्या स्पर्धेला तोंड द्यावं लागणार आहे. ऑनलाईन ऑर्डर आणि इ-कॉमर्समध्ये प्रॅक्टोचाही प्रवेश झालाय. गेल्या वर्षी इन्स्टा हेल्थही यात दाखल झालयं. प्रॅक्टोचे सहसंस्थापक शंशाक एन डी यांनी युअरस्टोरीला सांगितलं की, त्यांच पोर्टल सुधारण्याकरता ते माहिती संकलित करत आहेत.

आणखी काही नाविन्यपूर्ण संशोधनपर कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. लाईक करा.

आता वाचा संबंधित कथा :

पतीच्या आकस्मात मृत्यूनंतरही आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घडवणा-या ‘संध्या चेरियन’

मेडीनफाय – वैद्यकीय क्षेत्राची अस्सल आणि विश्वसनीय माहिती पुरविणारे व्यासपीठ आता नव्या वळणावर...

शाकाहारातून तंदूरुस्तीचा नवा मंत्र ‘वेजीस फिटनेस’

लेखिका – सिंधू कश्यप

अनुवाद – साधना तिप्पनाकजे