वयाच्या ४३व्या वर्षी या मातेने आयआयएमची पदवीच मिळवली नाहीतर स्वत:चा व्यवसाय देखील सुरू केला

2

करन शहा यांनी लहानपणापासून अनेक महत्वाकांक्षा बाळगल्या आणि त्यासाठी अपार कष्ट देखील केले. मात्र ज्यावेळी त्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी आंतरजातीय विवाह केला त्यावेळी स्थिती बदलली कारण त्यांच्या लग्नाला दोन्ही बाजूनी विरोध होता, आणि वयाच्या २३व्या वर्षी पतीशिवाय कुणीच त्यांच्या पाठिशी नव्हते. ३० वर्षांपूर्वी महिलांना सामाजिक दबाव आजच्या तुलनेत अश्या प्रकरणात जास्त झेलावा लागत होता.


करण यांच्या पतीच्या घरची पार्श्वभूमी सुधारणावादी होती तरी त्यांना नोकरी करण्याची किंवा मनासारखे कपडे देखील वापरण्याची अनुमती त्यांच्या घरातून नव्हती. जरी त्यांचे पती दिवसांचे १६ तास काम करत होते तरी करण यांना जाणवत होते की त्यातून त्यांच्या चार जणांच्या कुटूंबाला आवश्यक गोष्टींची पूर्तता होत नव्हती. त्यांनी कायद्याची पदवी मिळवली होती आणि सीएकडे  आर्टिकलशिप केली होती, मात्र त्यांना घरातून बाहेर पडण्यास अनुमती नाकारण्यात आली, त्या दिवसांबाबत सांगताना त्या म्हणाल्या की, “ मला जखडल्या सारखे त्या दिवसांत वाटत असे, मी त्यावेळी देखील काही महत्वाकांक्षा बाळगल्या होत्या आणि मला माझ्या मुलांना चांगले आयुष्य द्यायचे होते. मला घराबाहेर जावून काम करण्यास अनुमती नव्हती त्यामुळे मी घरीच शिकवण्या घेण्यास सुरुवात केली, पण लक्षात आले की,त्यातून फारसे काही मिळत नाही. मला अजून काय करता येईल याचा मी विचार केला, आणि माझ्या फिरण्याच्या छंदाने मला माझे उत्तर गवसले.”

जरी त्यांना प्रवास करणे आवडत होते, त्यांना खात्री नव्हती की व्यवसाय म्हणून ते कितपत योग्य होईल. त्यामुळे त्यानी जवळच्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये जावून व्यवसायातील खाचखळगे जाणून घेण्यास सुरूवात केली. नंतर त्यानी फॅक्स मशीन घरी आणले आणि दलालीचे काम सुरू केले. जरी त्यांचे सुरूवातीचे ग्राहक मित्र आणि परिवारातील होते, नंतरच्या काळात त्यात वाढ होत गेली. २००३मध्ये त्यांनी याबाबतचा छोटा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि व्यवसाय वाढविला.

त्यानंतरच्या काळात त्यांनी त्यांच्या पतीला कार्यालयात जावून काम करण्यास अनुमती देण्यास राजी केले आणि मुंबईत चेंबूर येथे कार्यालय सुरू केले. जरी ती त्यांच्या पतीची मालमत्ता होती तरी त्या त्यांना भाडे देत होत्या, जेणे करून त्यांना त्यांचे स्वातंत्र्य मिळावे. २००९मध्ये वयाच्या ४३व्या वर्षी त्यांनी आयआयएम बंगळुरू मध्ये प्रवेश घेतला, जेणे करून त्यांच्या व्यवसायात त्यांना आणखी काय वाढ करता येईल हे त्या पोस्ट ग्रॅज्यूएट शिक्षणातून जाणून घेतील. नेहमी बंगळुरू-मुंबई ये-जा करणे शक्य नव्हते मात्र किरण यांनी असा विचार केला की या कष्टातूनच त्या त्यांच्या भविष्याला उज्वल करतील, ज्या आता त्यांची कंपनी उभी करतील. प्रवास आणि मुली सोबत राहताना त्यांनी या पूर्वी देखील ६० देशांचा प्रवास केला आहे.

महिलांचा भारतात काम करण्याचा दर हा सातत्याने घसरत राहिला आहे. एका माहितीनुसार, कामकाजातील महिलांचा सहभाग २००५मध्ये ३७ टक्के होता तो २०१४मध्ये २७ टक्के पर्यंत घसरत आला आहे. त्यामुळेच करण यांच्या धीराने काम करण्याला प्रेरणादायी म्हणावे लागेल.