या चौदा वर्षाच्या मुलाने गुजरात सरकार सोबत पाच कोटी रूपयांचा करार केला आहे

या चौदा वर्षाच्या मुलाने गुजरात सरकार सोबत पाच कोटी रूपयांचा करार केला आहे

Tuesday April 25, 2017,

2 min Read

यंदाच्या वर्षी झालेल्या ‘व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समीट’ मध्ये, १४ वर्षांचा 'हर्षवर्धन झाला', याने गुजरात राज्य सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागासोबत पाच कोटी रूपयांचा सामंजस्य करार केला. या मधून हर्षवर्धन याने विकसित केलेल्या ड्रोनचा व्यापारी वापर केला जाणार आहे. दहाव्या वर्गात शिकणा-या या विद्यार्थ्याने तीन प्रकारचे प्रोटोटाईप त्याच्या ड्रोनसाठी तयार केले आहेत.


Image Source: News State

Image Source: News State


त्याच्याद्वारे निर्मित ड्रोनचा वापर करून युध्दभूमीत भूसूरूंगाना शोधून निष्प्रभ करता येणार आहे. ही व्यावसायिकतेची कल्पना कशी सूचली याबाबत बोलताना तो म्हणाला की, “ ज्यावेळी मी दूरचित्रवाणी पहात होतो त्यावेळी ही कल्पना सूचली, त्यावेळी मोठ्या प्रमाणात सैनिकांना भुसुरूंगाच्या स्फोटात जखमी झाल्याचे दाखविण्यात आले होते. कारण ते स्वत: जाऊन त्यांचा शोध घेत होते.”

माध्यमांना आपल्या कामाची माहिती देताना हर्षवर्धन म्हणाला, “ सर्वप्रथम मी भुसूरूंग शोधणारा यंत्रमानव तयार केला, पंरतू असे जाणवले की, त्याचे वजन जास्त असल्याने तो स्फोट होऊन नादुरूस्त होतो. त्यामुळे मग मी ड्रोन तयार करण्याचा विचार केला. भुसूरूंग शोधताना ते जास्त सोपे आणि सुरक्षित ठरले.”

हा प्रकल्प ज्यावर तो काम करतो, त्याच्या तीन प्रकारच्या प्रोटोटाईप (अभियांत्रिकी रचना) तयार केल्या आहेत. ज्यांची किंमत सध्या पाच लाख रूपये आहे. दोन प्रोटोटाईपची किंमत दोन लाख आहे, ज्यासाठी त्याच्या पालकांनी पैसे दिले होते. तिस-याची किंमत ३ लाख असून त्याचा खर्च राज्य सरकारने दिला आहे.

आपल्या कामाची माध्यमांना माहिती देताना त्याने सांगितले की, “ या ड्रोनला इन्फारेड आहेत, आरजीबी सेंसर,आणि थर्मल मिटर याशिवाय २१ मेगापिक्सल कॅमेरा ज्याला मेकॅनिकल शूटर जोडला आहे. त्यातून उच्च प्रतीची छायाचित्रे घेतली जातात. या ड्रोन मधून ५० ग्रँम वजनाचे बॉम्ब नेले जातात, ज्याद्वारे भुसूरूंग नष्ट केले जातात.

ड्रोनमधून बाहेर पडणा-या लहरी आठ चौरस मीटर पर्यंत पसरतात, ज्यावेळी तो जमिनीपासून दोन फूटांवर उडत असतो. त्याला भुसूरूंग आढळला की, तो त्याची सूचना त्याच्या मूळ बेस स्टेशनला देतो. हर्षवर्धन याने स्वत:ची कंपनी देखील स्थापन केली आहे. ‘ऑरोबोटिक्स’ या नावाने आणि त्याने पेटंटसाठी देखील नोंदणी केली आहे. हर्षवर्धन ज्याचे वडील लेखा परिक्षक आणि माता गृहिणी आहेत, त्याने गुगलच्या कार्यालयाला यूएस येथे भेट दिली त्यावेळी पेटंट घेण्याचा निर्णय घेतला.

गुजरातच्या या कुमारवयीनाने, त्याच्या छंदातून विज्ञान आणि प्रेरणेतून खूप काही सुंदर घडविले आहे. असे उपकरण जे शहिद होण्यापासून जवानांना वाचवेल. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीने खरोखर आपण सा-यांना प्रेरणा घेता येणार आहे.

    Share on
    close