एक मजूर ज्याने तोट्यात गेलेल्या फॅक्टरीला १६००कोटींचा उद्यम बनविले!

0

सोळा वर्षांच्या सुदीप दत्ता यांच्या समोर लष्करात असलेल्या वडिलांचे आणि मोठ्या भावाचे अकस्मात निधन झाल्याने काहीच पर्याय शिल्लक राहिला नव्हता. त्यांना खूप शिकून अभियंता व्हायचे होते. परंतू त्यांच्या कुटूंबासाठी कमावती व्यक्ती म्हणून ते एकमेव असल्याने, सुदीप यांना पश्चिम बंगाल मधील दुर्गापूर हे गाव सोडावे लागले,आणि ते कामासाठी मुंबईला आले. तेथे ते रोजंदारी कामगार म्हणून रोज १५ रुपये कमावू लागले.

आज ते १६८५ कोटी रुपयांची उलाढाल असलेला उद्योग चालवितात, ज्यात वेष्टनांसाठी लागणारे साहित्य तयार केले जाते जे सर्वात मोठ्या एफसीएमजी आणि फार्मास्युटुकल्सच्या क्षेत्रातील पुरवठादार म्हणून गणले जातात. जसे की, मोंडलेझ इंडिया, परफेटी वँन मेले, नेस्टले, सिप्ला आणि सन फार्मा हे नामवंत प्रतिस्पर्धी आहेत. सुदीप यांच्या एस दी ऍलिम्युनिअम लि. ही देखील आघाडीची वेष्टन बनविणारी कंपनी आहे.

सुदीप यांचे वडिल लष्करात होते ज्यांना १९७१च्या बांगलादेश मुक्ती लढ्यात बंदुकीच्या गोळीने जखमी केले, त्यानंतर तीन महिन्यांनी पक्षाघाताचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्यानंतर लगेच सुदीप यांचा मोठा भाऊ देखील वारला त्यामुळे घरात कमावते कुणीच राहिले नाही,आई आणि चार लहान भावंडे यांची काळजी घेण्याची जबाबदारी सुदीप यांच्यावर होती. त्यांना  त्यासाठी रिक्षा ओढणे किंवा दुर्गापूरच्या हॉटेलात वेटर म्हणून काम करणे असे दोन पर्याय होते किंवा या स्थितीशी बंड करुन नविन काहीतरी करणे हा आणखी एक मार्ग होता. त्यांनी मोठ्या स्वप्नांसाठी मायानगरी मुंबईला जाण्याचा पर्याय निवडला.

मुंबईचे जगणे सोपे नव्हते. काही वर्षे वेष्टने तयार करणा-या कारखान्यात ते काम करत राहिले. २० सहका-यांसोबत एका खोलीत ते राहिले. दररोज कामावर जाण्यासाठी ४० किमी चालत गेले, त्यातून पैसे वाचतील आणि आईला पाठविता येतील हा हेतू होता. दोन वर्षा नंतर कंपनी तोट्यात जावू लागली. मालकाने ती बंद करण्याचा निर्णय घेतला. सुदीप यांना भोवताली होणा-या या घडामोडीनी अस्वस्थ केले, त्यांनी फँक्टरी घेण्याचा विचार केला. त्यांनी मालकाला सोळा हजार रुपये दिले. आणि नफ्यातला वाटा देण्याचे मान्य करणारा करार केला, त्यामुळे मालक तयार झाला.

वेष्टन उद्योगात इंडिया फॉईल्स किंवा जिंदल लि.अश्या प्रस्थापितांचे वर्चस्व असल्याचे माहित असूनही सुदीप यांनी औषधांच्या वेष्टन उद्योगात लक्ष घातले, आणि त्यांच्या गरजेनुसार बदलत्या वेष्टन मागण्या पूर्ण करत गेले. भारतातील औषध उद्योगांच्या भरभराटीच्या लाटेत सुदीप यांचा उद्योग लवकरच मिड- कँप श्रेणीत जावून पोहोचला असे सुदिप सांगतात. ते म्हणाले की, “ माझे ध्येय केवळ ही मोठी भांडवली कंपनी तयार करणे हे नव्हते तर एक बहुराष्ट्रीय कंपनी जसे की पी ऍण्ड जी किंवा युनिलिव्हर आहे तसे बनविणे हा होता.”

नोव्हे.२००८मध्ये सुदीप यांनी वेदांता कडून इंडियन फॉईल्स १३० कोटी रुपयांना घेतली. हा खूप मोठा निर्णय होता, पुन्हा एकदा नशिबाची परिक्षा होती.  आज सुदीप यांनी हळुहळू कंपनीला १६००कोटी पेक्षा मोठी कंपनी म्हणून नावारुपाला आणले आहे, आणि अत्याधुनिक तसेच तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार अशा उत्पादनांसाठी नाव मिळवले आहे.