प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचे १४ एनएसएस स्वयंसेवक राजपथावरील पथसंचलनात होणार सहभागी

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचे १४ एनएसएस स्वयंसेवक राजपथावरील पथसंचलनात होणार सहभागी

Friday January 20, 2017,

1 min Read

प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथ संचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) 14आणि गोव्यातील 2 अशा एकूण 16 विद्यार्थी- विद्यार्थीनींची निवड झाली आहे.

यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयांतर्गत एनएसएस सराव शिबीराला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे 1 जानेवारी पासून सुरुवात झाली. देशभरातील 15 विभागांमधून एकूण 200एनएसएस स्वयंसेवक या शिबीरात सहभागी झाले आहेत. पश्चिम विभागात समावेश असणा-या महाराष्ट्रातून 7 विद्यार्थी आणि 7विद्यार्थीनी तर गोव्यातून प्रत्येकी 1 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थीनी असे एकूण 16 स्वयंसेवक या शिबीरात सराव करीत आहेत.


image


प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी एकूण 200 पैकी 160 विद्यार्थी विद्यार्थीनींची निवड करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्र व गोव्यातील सर्वच म्हणजे 16 विद्यार्थी विद्यार्थीनीची निवड झाली असल्याची माहिती महाराष्ट्राच्या चमुचे समन्वयक तथा जळगाव येथील जेडीएमव्हीपीएस कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक साहेब पडलवार यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना हे एनएसएस स्वयंसेवक भेटणार असून यावेळी सादर होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील ३ विद्यार्थीनी आणि एका विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याचे पडलवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र एनएसएसची गौरवशाली परंपरा 

प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथ संचलनात राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे नेतृत्व करण्याचा बहुमान महाराष्ट्राच्या सोपान मुंडे, खूशबु जोशी आणि आसीफ शेख यांनी मिळविला आहे. (सौजन्य - महान्युज)