‘म्यू सिग्मा’...आपल्या कल्पनेसोबत जगणारी माणसं...

एका अशा माणसाची गोष्ट, ज्यांचा विश्वास होता त्यांच्या हिंमतीवर..त्यांच्या कल्पनांवर...

‘म्यू सिग्मा’...आपल्या कल्पनेसोबत जगणारी माणसं...

Thursday October 08, 2015,

5 min Read

असं म्हणतात की जिथे इच्छा असेल तिथे मार्ग नक्की सापडतो. पण या इच्छेलाही जोड असावी लागते ती हिंमतीची. आपल्या कंपनीला त्यांनी यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. आणि यामागे कोणती जादू नव्हती, तर होती ती त्यांची जिद्द !

जवळपास २८ वर्षांपूर्वी जेव्हा धीरज सी राजाराम यांनी ‘म्यू सिग्मा’ची सुरुवात केली होती, तेव्हा त्यांना याची अजिबातच कल्पना नसावी की त्यांनी एका आमुलाग्र क्रांतीचा पाया रचला होता. आत्तापर्यंत ‘म्यू सिग्मा’वर अनेकवेळा कौतुकाचा वर्षाव झालाय. असं म्हणतात की ‘म्यू सिग्मा’ या क्षेत्रात सर्वोत्तम आहे. पण कदाचित यावर कुणाचा विश्वास बसणार नाही की धीरज राजाराम यांनी कधीही उद्योग-व्यवसाय करण्याचा विचारही केला नव्हता. ते व्यावसायिक कसे बनले, याबद्दल त्यांना स्वत:लाही माहीत नाहीये. आणि कंपनीचं म्हणाल, तर कंपनीनं आत्तापर्यंत मिळवलेलं यशच सर्वकाही सांगून जातं.

‘ व्यावसायिक बनेन असा विचारच केला नव्हता’

धीरज सी राजाराम..'म्यू सिग्मा'चे जादुगार

धीरज सी राजाराम..'म्यू सिग्मा'चे जादुगार


हे सगळं कसं घडलं यावर बोलताना धीरज सांगतात, “ व्यावसायिक होईन असं मला कधीच वाटलं नव्हतं. एखादी कंपनी सुरु करू, किंवा स्वत:चा व्यवसाय सुरु करु असा विचारच कधी केला नव्हता. जे मी करत होतो, त्यातच समाधानी होतो. फक्त डोक्यात काहीतरी फिरत होतं. आणि त्यातूनच ही कंपनी सुरु करण्याची प्रेरणा मला मिळाली.” आता धीरज जर त्यांच्या आहे त्या आयुष्याशी समाधानी होते, तर मग त्यांनी कंपनी सुरु करण्याचं का ठरवलं? उत्तर अगदी सोपं आहे. त्यांना काहीतरी नवीन, वेगळं करायचं होतं, ज्यामुळे त्यांच्यातल्या आजन्म विद्यार्थ्याची नवीन शिकण्याची धडपड देखील साध्य होऊ शकेल.

२००४ मध्ये खूप सारी स्वप्नं उराशी ठेऊन धीरज राजाराम यांनी ‘म्यू सिग्मा’ची सुरुवात केली, आणि आज त्या स्वप्नांचं रुपांतर लाखो डॉलर्स किंमतीच्या कंपनीमध्ये झालंय. ज्या काळात धीरज यांनी ‘म्यू सिग्मा’च्या माध्यमातून डेटा अॅनालिटिक्स अर्थात माहिती विश्लेषण क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांची स्पर्धा होती ती थेट आयबीएम, एसेंचरसारख्या या क्षेत्रातल्या तगड्या कंपन्यांसोबत. पण त्यांची स्वप्नं प्रत्यक्षात उतरवण्यापासून यापैकी कुणीही त्यांना थांबवू शकलं नाही. यासारख्या इतर कंपन्यांमध्ये प्रोग्रॅमिंग आणि बिजनेस अॅनालिसिससाठी स्वतंत्र माणसं काम करत होती. पण त्याचवेळी ‘म्यू सिग्मा’ने अशा लोकांना संधी दिली, जे गणित, व्यावसायिक विश्लेषण आणि प्रोग्रॅमिंग अशा तीनही कामांमध्ये पारंगत असतील.

धीरज त्यांची यशोगाथा सांगत होते,“एक दिवस मी माझ्या बायकोला म्हणालो,” “की माझ्याजवळ एक उत्तम कल्पना आहे. मी तिला सांगितलं की आपण आपलं घर विकून टाकू आणि तो सगळा पैसा कंपनीमध्ये गुंतवू. तिनं क्षणाचाही विचार न करता लगेचच होकार दिला. मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. मी तिला विचारलं, की इतक्या सहज तू कसा होकार दिला, तर ती म्हणाली, तू जर एकदा एखादी गोष्ट ठरवली, तर मग त्यावर तुझ्याशी वाद घालण्यात काहीही अर्थ नसतो.”

प्रारंभीचा खडतर प्रवास...

धीरज सांगतात, “सुरुवातीची काही वर्ष तर कंपनीत काम करण्यासाठी 'माझ्या कंपनीत काम करा' अशी विनंती मी लोकांना करायचो. एक प्रकारचं आव्हानच होतं माझ्या कंपनीसाठी काम करणारी माणसं मिळवणं म्हणजे.” त्या दिवसांची आठवण झाली की धीरज सांगतात, “काहीही झालं, तरी तुमच्याबरोबर काम करण्यासाठी योग्य माणसांची निवड करणं फार गरजेचं आहे.”

“जेव्हा तुम्हाला तुमच्या सेवेसाठी किंवा उत्पादनासाठी ग्राहक मिळायला सुरुवात होते, तेव्हा लोकांना तुमच्या कर्तृत्वाची जाणीव होते, तुमच्या क्षमतांची ओळख होते. मी जेव्हा शिकागोला माझे मित्र आणि इंडस्ट्रीतल्या इतर काही लोकांना भेटायला जात होतो, तेव्हा त्यांना आमच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास होता. त्यांना माहिती होतं, की आम्ही काय करतोय.”

धीरज यांच्यामते, “कोणतीही नवी कंपनी सुरु करण्यासाठी इतर गोष्टींबरोबरच तुमचं मनही त्या गोष्टीत पूर्णपणे गुंतलेलं असणं आवश्यक असतं. लोकांना तुमच्याशी जोडून घ्यायला फार मेहनत घ्यावी लागते. ब-याच वेळा तर त्यांच्या कुटुंबियांशीही बोलावं लागतं. एकदा तर मला एका मुलाच्या आईशीच बोलावं लागलं होतं. त्यांना हे समजावून सांगायला की त्यांच्या मुलानं माझ्या कंपनीसाठी का काम करायला पाहिजे.”

पैसाही तितकाच महत्त्वाचा...

“या व्यवसायात माझा ८० टक्के पैसा लागला होता. हे माझ्यासाठी फारच अवघड होतं. कारण व्यवसायात नुकसान होणं म्हणजे माझं नुकसान होणं. जेव्हा उद्योगात आपला पैसा लागलेला असतो, तेव्हा आपण खूप मन लावून काम करतो. आपल्याला काळ खूप काही शिकवतो.”

एक गोष्ट धीरज फार महत्त्वाची सांगतात. ते म्हणतात, “जेव्हा आपला स्वत:चा पैसा एखाद्या व्यवसायात लागलेला असतो, तेव्हा कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा, ती गोष्ट समजून घेण्याचा आपला दृष्टीकोनच बदलून जातो. आपण प्रत्येक गोष्ट गांभीर्यानं घ्यायला लागतो. कारण एका चुकीची किंमत काय असू शकते हे आपल्याला पूरेपूर माहिती असतं.”

तसं पहायला गेलं तर ‘म्यू सिग्मा’ सुरु झाली२००४ मध्ये. पण अवघ्या चारच वर्षांत, २००८ मध्ये एफटीव्ही व्हेंचर्सने कंपनीमध्ये ३ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली. मग २०११ मध्ये सिकोडिया कॅपिटलने अडीच कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली. आणि लगेचच जनरल अॅटलांटिक आणि सिकोईया कॅपिटल या दोन मोठ्या कंपन्यांनी तब्बल १० कोटी ८ लाख डॉलर्सएवढी घसघशीत गुंतवणूक केली.

कल्पनेसोबत जगणा-या माणसांची कंपनी...

कल्पनेसोबत जगणा-या माणसांची कंपनी...


चुकांकडेही तितकंच लक्ष हवं..

जेव्हा तुमच्या कंपनीचा प्रवास छोट्यापासून मोठ्या कंपनीकडे होत असतो, तेव्हा अनेक वेळा चुकाही होतात. आणि धीरज राजारामही याला अपवाद नव्हते. त्याबद्दल विचारल्यावर धीरज खूप जबाबदारीनं बोलतात, “जेव्हा तुम्ही लोकांना तुमच्या कंपनीसाठी निवडता, तेव्हा अनेक गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. जर पात्र आणि योग्य लोकं मला मिळाले नसते, तर माझी कंपनी कधीच यशस्वी झाली नसती. आणि जेव्हा मी पात्र म्हणतो, तेव्हा त्याचा संबंध फक्त कामाशीच नसून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशीही असतो. आम्ही ज्या लोकांना निवडलं, ते माझे खूप चांगले मित्र आहेत. काही अजूनही आमच्या सोबत काम करतायत आणि खूप चांगलं काम करतायत.”

धीरज पुढे सांगतात, “तुम्ही तुमच्या चुका वेळीच ओळखून त्या सुधारणं खूप गरजेचं असतं. व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर एखादी कंपनी नव्यानं सुरु करताना योग्य निर्णय घ्यायचे असतात. आम्ही सुरुवातीच्या काळात काही चुकीच्या लोकांनाही कामाची संधी दिली होती. पण वेळीच आम्ही आमची चूक सुधारली. तुमच्या चुका लवकरात लवकर सोडवणंही खूप महत्त्वाचं असतं.”

दोन प्रकारचे उद्योगपती...

धीरज म्हणतात म्यू सिग्माच्या या यशस्वी प्रवासामध्ये अनेक वेळा निराशेचे भलेमोठे दगडही आले. ते सांगतात, “आम्ही सुरुवातीपासूनच यशस्वी राहिलो होतो. म्हणून अनेक मोठ्या कंपन्या आमची कंपनी खरेदी करण्यासाठी इच्छुक होत्या. मोठमोठ्या आकड्यांकडे पाहून अनेक वेळा इच्छाही झाली. पण तेव्हाच आम्ही योग्य पाऊल उचललं. तेव्हा मी विचार करायचो, की ही कंपनी अशीच विकली तर ज्या कल्पनेपासून या कंपनीची सुरुवात केली, ती कल्पनाच मरुन जाईल. आणि मला खूप दु:ख व्हायचं. एका कल्पनेची किंमत माझ्यापेक्षाही मोठी आहे. शेवटी आपण सर्वच जण म्हणजे या प्रचंड मोठ्या विश्वाचे एक छोटेसे भाग आहोत.”

ते म्हणतात, “या जगात दोन प्रकारचे उद्योगपती असतात. एक असतात ते अरेंज मॅरेजवाले उद्योगपती आणि दुसरे असतात ते लव मॅरेजवाले उद्योगपती. अरेंज मॅरेजवाल्या उद्योगपतींना उद्योग-व्यवसायातच यायचं होतं. आणि अशा लोकांच्या कथा ब-याचवेळी अरेंज मॅरेजसारख्याच गोडगोड आणि छानछान असतात. त्याचवेळी दुस-या बाजूला असतात लव मॅरेजवाले उद्योगपती. जे त्यांच्या उद्योगाच्या कल्पनेवर एखाद्या नवतरुणीप्रमाणे प्रेम करतात. त्यांना तिच्यासोबतच संपूर्ण आयुष्य घालवायचं असतं. मी उद्योगपती झालो, कारण मला त्या कल्पनेसोबत आयुष्यभर रहायचं होतं.