कोची येथील या मूकबधीर मुलीला भेटा जी आज सेलिब्रीटी मॉडल आणि ऍथलीट झाली आहे!

0

२४वर्षीय सोफिया एम जो, ही मुलगी जन्मत:च मूक बधीर आहे. त्यामुळे त्यांना यश मिळवण्यात मात्र कोणीही थांबवू शकले नाही. आज सोफिया लोकप्रिय मॉडेल आणि ऍथलीट झाल्या आहेत. तीनवेळा उंच उडी आणि थाळीफेक यामध्ये त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळविला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात त्यांनी भारताचे प्रतिनीधित्व केले आहे. त्या प्रतिभावान चित्रकार आणि दागिन्यांच्या डिझायनर देखील आहेत. 


Image : Facebook
Image : Facebook

कोचीच्या या मुलीचे बालपण काही सहज नव्हते. शाळेत त्यांना प्रवेश मिळाला नाही, त्यांचा भाऊ रिचर्ड यांनाही हाच आजार होता. “ हा माझ्या मुलांचा दोष नव्हता किंवा माझाही नाही, ते अशा प्रकारे जन्मले होते आणि कुणी त्यात मदत करु शकत नव्हते, मात्र लोक आमची मस्करी करत असे टोमणे मारत की जणू आम्ही काहीतरी पाप केले आहे” सोफिया यांचे वडील जो फ्रान्सिस यांनी सांगितले.

आज सोफिया यांच्याजवळ सोफिया महाविद्यालयातील बीए ची इंग्रजी साहित्यातील पदवी आहे, त्या लोकप्रिय मॉडेल आणि खेळाडू आहेत. त्यांच्या आई गोरियाट्टी यांनी सांगितले की, “ त्या सर्वसाधारण मुलांसारख्याच वाढल्या. काही वर्ष आम्ही त्यांना घरातच शिक्षण दिले. त्यानंतर आम्ही त्यांना केरळामधील साधारण शाळेत दाखल केले आणि आमच्याकडूनच प्रशिक्षित केले. त्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने सोबत राहिलो त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला.”

सन २०१४मध्ये सोफिया या पहिल्या मिस इंडिया मूकबधीर धावक होत्या, ज्यांनी भारताचे प्रतिनिधित्व मिस वर्ल्ड मूकबधीर स्पर्धा, प्राग झेक रिपब्लिक येथे केले. त्यांनी बेस्ट विशेश या सिनेमात भूमिकाही केली आणि नृत्याचे शिक्षणही घेतले. सोफिया या केरळातील पहिल्या महिला देखील आहेत ज्यांनी बधीर असतानाही वाहन चालविण्याचा परवाना मिळवला आहे. त्यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवला होता.