'इंडियन ब्रा क्वीन',एक मिशन : ARE YOU READY?

ज्या उत्पादनाची चर्चा एकतर बंद दरवाज्याच्या आत तरी केली जाते किंवा कानात कुजबूजत तरी केली जाते . असं उत्पादन तयार करण्याच्या व्यवसायात उडी घेणं  हे केवळ धाडस असले तर शक्य आहे. हे उत्पादन स्त्रियांच्या आनंदाशी, सुखसोईशी जोडलं गेलंय. ते वापरायचं आहे म्हणून वापरायचं नसून त्यात आपली आवडनिवड, कंफर्ट आणि फिटिंग अशा गोष्टींकडं हक्काच्या म्हणून अगदी चोखंदळपणे बघायचं असतं हा दृष्टीकोण रूजवणारी धाडसी उद्योजिका म्हणजे अर्पिता गणेश. बटरकप्स या महिलांच्या मनात घर करणा-या बँडची कर्तीधर्ती असलेली अर्पिता गणेश यांची ही कहाणी.

'इंडियन ब्रा क्वीन',एक मिशन : ARE YOU READY?

Sunday August 23, 2015,

9 min Read

बटरकप्सबद्दल तुम्ही ऐकलय का ? भारतातल्या सध्याच्या सर्वात नाविण्यपूर्ण अंतर्वस्त्र बुटीक पैकी ते एक आहे यात जराही शंका नाही (ऑफलाईन आणि ऑनलाईन) . जगातला सर्वोत्कृष्ट आणि खास असा अंतर्वस्त्र ब्रँड्स म्हणून बटरकप्स ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. याबरोबर बटरकप्सनं आपल्या ग्राहकांना अभिनव अशा ऑफर्स देऊन आपलं वेगळेपणही सिद्ध केलंय. प्रत्येकाला हव्या असलेल्या साईझ पासून ते फिटिंग पर्यंत आणि थेट तुमची नेमकी गरज कशा प्रकारची हे व्यक्तिश: बोलून; चोखंदळ महिला ग्राहकवर्गाच्या ज्या आवडीनिवडी आणि गरजा आहेत त्या पुरवण्यासाठी बटरकप्स वचनबद्ध आहे. 

अर्पिता गणेश- 'इंडियन ब्रा क्वीन'

अर्पिता गणेश- 'इंडियन ब्रा क्वीन'



अनेक अडचणींवर मात करत, न डगमगता धाडसानं बटरकप्स अंतर्वस्त्र मोहिमेचं लोण घराघरात पसरवणा-या महत्त्वाकांक्षी उद्योजिकेचं झपाटलेपण हेच त्यांची कथा सांगण्यासाठी प्रेरीत करते. अर्पिता गणेश, या उद्योजिकेच्या हाती या मोहिमेची धुरा आहे. इतर उद्योजकांसारखा त्यांचाही प्रवास निश्चितच सोपा राहिलेला नाही.

अर्पिता गणेश यांच्या वाट्याला यशापेक्षा अपयशच अधिक आलंय. पण अर्पितांनी परिस्थितीसमोर शरणागती पत्करली नाही. आणि त्यांनी ती का म्हणून पत्करावी ? जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयासाठी काही करत असता, महिलांनी आपल्या स्वत:साठी आणि आपल्या शरीराच्या बाबतीत काही गोष्टी जाणून घेण्याचं मिशनच बनवावं यासाठी झपाटल्यासारखे प्रयत्न करत असता, तेव्हा निश्चितच तुम्ही काहीतरी मोठं, असामान्य असं करत असता. चँटिलीमधून औपचारिक शिक्षण घेतल्यानंतर अर्पिता भारतीय महिलांचा अंतर्वस्त्राकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलण्याचा प्रयत्न करताहेत. अर्पितांची कथा तुम्ही वाचावी, आणि ती युवर स्टोरीला वाटते तशी तुम्हालाही प्रेरणादायी वाटली तर तुम्ही भारतातलं सर्वोत्कृष्ट अंतर्वस्त्र लेबल नावारूपाला आणण्याच्या अर्पितांच्या कार्याला नक्कीच मदत कराल.

आंतरराष्ट्रीय दर्जाचा ब्रा अनुभव, आणि तो ही भारतीय किंमतीनुसार, भारतीय महिलांना घेता यावा हाच अर्पितांचा उद्देश आहे.


वायएस – अर्पिता, बटरकपच्या अगदी सुरूवातीच्या दिवसांपासून मी आपल्याला ओळखतो. या उद्योगाबाबत मला जाणून घ्यायला खूप आवडेल.


अर्पिता – हा एक दीर्घ आणि खडतर असा प्रवास होता. स्त्रियांची अंतर्वस्त्र याबाबत जिद्दीन काम करणं आव्हानात्मक आहे. याचं कारण म्हणजे हा विषय भारतात आजही निषिद्ध मानला जातो.

अंतर्वस्त्राबाबतचे समज - गैरसमज, मान्यता, बदलता दृष्टीकोण आणि आपल्या जगण्याच्या चौकटीबाहेर विचार न करणा-या, अंतर्वस्त्राबाबत उघडपणे न बोलणा-या उच्चशिक्षित महिलांना शिक्षित करण्यासाठी माझी लढाई सुरू आहे. बहुतेक गुंतवणूकदार हे पुरूष आहेत आणि त्यांना मी समजावते आहे. हे माझ्यासाठी एक आव्हान आहे. कारण त्यांचं ना माझ्या उत्पादनाशी काही नातं, ना त्यांना मी या उत्पादनावर दिलेल्या ऑफर्सशी देणंघेणं आहे. शिवाय या सगळ्या गुंतवणूकदार मंडळींचं लक्ष हे छोट्या, विशिष्ट उत्पादनाच्या मार्केट ऐवजी टॉप लाईन, मास, क्विक ग्रोथ अशा मार्केट्सवर अधिक असतं. पण अशा बिकट परिस्थितीला मला तोंड देता आलं आणि म्हणूनच मी आज या ठिकाणी पोहचले आहे.

मला जनमत घ्यायला आवडतं कारण बटरकप्स अस्तित्वात यायलाच हवं असं वाटणारे पुरेसे ग्राहक माझ्याकडे आहेत. आणि त्यांना वाटतं की हा ब्रँड प्रत्यक्षात येण्यासाठी जे काही करता येईल ते ते आपण करावं. त्यांचा विश्वास आणि त्यांचा प्रयत्न हेच दाखवतो की माझ्याकडे अशी काही योजना आहे जी महिलांचं जीवन सुखकर करेल आणि अशी प्रत्येक व्यक्ती, जिनं बटरकप्सचा वापर केला आहे, तिला वाटेल की अधिकाधिक महिलांनी या सुखकर बदलाचा अनुभव घेतलाच पाहिजे. आंतरराष्ट्रीय अंतर्वस्त्र दुनियेत माझी ‘इंडियन ब्रा लेडी’ अशी ओळख झाली आहे आणि ही ओळख मला अतिशय प्रिय आहे.

भारतातल्या महिलांना आपल्या योग्य मापाचं ब्रा उपलब्ध व्हावा या उद्देशानं आम्ही एक अॅप (ABTF – iOS and android) लाँच केलं तेव्हा माझ्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला. हे अॅप माझ्या काही उद्योजक सहका-यांनी विकसित केलं होतं. माझं झपाटलेपण पाहिल्यानंतर मला मदत केली गेलीच पाहिजे या भावनेनं माझ्या काही उद्योजक सहका-यांनी हे अॅप विकसित केलं. जगभरातल्या तब्बल ३००० महिला www.abrathatfits.com या माझ्या ब्रा ब्लॉगसोबत जोडल्या गेल्या आहेत हे उल्लेखनीय असंच आहे. हा ब्लॉग मी स्वत: चालवते आणि मीच त्याची सगळी व्यवस्था पाहते. हा लोकप्रिय ब्लॉग तयार करण्याच्या कामात मला माझ्या दयाळू उद्योजक मित्रांनी मदत केली. ब्लॉग कसा हाताळावा, तो कसा चालवावा तसच त्याचे सर्व बारकावे त्यांनी मला सांगितले. शिवाय जगभरातल्या सर्वात प्रसिद्ध असलेल्या अंतर्वस्त्र उत्पादक कंपन्या आणि ब्रँड्सकडून (M&S, Fredericks) मी गेली सहा वर्षे सल्लामसलत करून या क्षेत्रातलं उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे.

सामाजिक रितीरिवाज, मर्यादा, निषिद्ध गोष्टी, नैतिक - अनैतिक गोष्टींचा मोठा पगडा असलेल्या भारतीय समाजातली ‘मी एक भारतीय महिला आहे’ आणि असं असूनही मी उघडपणे अंतर्वस्त्राबाबत बोलते ही एक उल्लेखनीय कामगिरी म्हणायला पाहिजे. किरकोळ विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा हा प्रवास अतिशय खडतर राहिलेला आहे. अशा परिस्थितीत दोन गोष्टींनी मला मोठं बळ दिलं- माझ्यावर असलेला लोकांचा विश्वास आणि मी हे करू शकते हा माझ्यात असलेला आत्मविश्वास. जी जी शक्य आहे ती ती मदत आणि ती ही अगदी मनापासून करणा-या ग्राहक, उद्योजक मित्र, काही गुंतवणूकदार आणि काही मार्गदर्शक अशा पुष्कळ लोकांना मी भेटले आहे. आणि त्यांच्या मदतीच्या आधारानेच मी इथपर्यंत येऊन पोहोचले आहे.

महिलांचे जीवन सुखकारक बनवणारी दुनिया

महिलांचे जीवन सुखकारक बनवणारी दुनिया


वायएस – तुम्हाला जे जे काही करायचे असते ते तुम्ही इतक्या सकारात्मक आणि उत्साहाने कसं काय करता?


अर्पिता – मी जे काही करते त्यावर माझं प्रेम असतं आणि प्रत्येक फिटिंग ब्रा हा माझ्यासाठी मोठीच गोष्ट असते. म्हणजे बघा, जेव्हा ह़ॉटेलमध्ये एखादा शेफ त्याची विशेष अशी डिश बनवतो आणि तिची चव चाखल्यानंतर जेव्हा शेफला सर्वांकडून वाहवा मिळातो, तेव्हा त्याला जो आनंद होतो तसाच मला मिळणारा हा आनंद मोठा आहे.

कारण फिटिंगला योग्य असलेले ब्रा वापरल्यानं आपलं जीवन नक्की बदलतं. ( माझ्या ग्राहकांना विचारा)! प्रत्येक भारतीय महिलेनं फिटिंगला योग्य अशी ब्रा घालायला हवी असं मला वाटतं. ब्रा बद्दल प्रत्येक महिलेला मोठ्या अपेक्षा असल्या पाहिजेत आणि त्यांच्या अपेक्षांनी एक नवी उंची गाठली पाहिजे असं मला वाटतं. आणि याच कामासाठी मी इथं आहे. महिलांनी या दृष्टीनं विचार करावा म्हणूनच अॅप, ब्लॉग आणि फेसबुक ही माध्यमं आम्ही विकसित केली आहेत.


तंत्रज्ञान हे माझं दुसरं प्रेम आहे. तंत्रज्ञानामुळच लाखो महिलांपर्यंत ब्रा फिटिंगचा अनुभव पोहोचवणं शक्य होतं. तंत्रज्ञान आणि ब्रा अधिकाधिक महिलांपर्यंत कसे पोहचतील यावर मी सतत वाचत आले आहे, आणि याच गोष्टीत मी स्वत:ला गुंतवून घेत आले आहे.


वायएस – आपल्या या उत्पादनाचं मार्केट किती विकसित झालंय किंवा विक्रित किती वाढ झालीय ? की ते आजही तसेच आहे ?


अर्पिता – सहा वर्षांमध्ये मार्केट विकसित झालंय. ते विश्वास बसणार नाही इतकं आश्चर्यकारकरित्या बदललं आहे.

ऑनलाईन शॉपिंगनं यात मोठी भूमिका बजावली आहे. यावरून हे ही लक्षात येतं की भारतीय महिलेचा द़ृष्टीकोण कशा प्रकारे बदलत आहे.

कालांतराने महिला आता स्वत: बद्दल जागरूक झाल्या आहेत. त्या स्वत:ची काळजी घेऊ लागल्या आहेत. दर्जेदार गोष्टी त्यांना हव्या आहेत आणि त्या मिळवण्यासाठी त्या बाहेर पडत आहेत. चांगलं आणि कंफर्टेबल दिसण्यासाठी महिला अधिकाधिक मेहनत घेत आहेत. त्यांनी आता साधारण उत्पादनं वापरणं बंद करून तडजोड करणं सोडून दिलेलं आहे. आम्हाला दर्जेदार आणि उत्तमोत्तमच हवं हे त्यांना कळलेलं आहे, कारण सर्वोत्कृष्ट गोष्ट मिळणं हा त्यांचा हक्क आहे, त्यांची ती पात्रता आहे आणि ते मिळवण्यासाठी त्यांना बाहेरही पडायचं आहे.

आणि म्हणूनच बटरकप्ससाठी ही योग्य वेळ आहे.

शब्दांपलिकडला आनंद देणारा ब्रा

शब्दांपलिकडला आनंद देणारा ब्रा



वायएस – ज्यांच्या जवळ भरपूर भांडवल अाहे अशा साईट्ससोबत तुम्ही कशा प्रकारे स्पर्धा करणार आहात ? तुम्हाला तुमच्या स्पर्धात्मक फायद्यापासून काय मिळवायचंय ?


अर्पिता - ज्यांना चांगलं फंडिंग होतय अशा खरंच भरपूर उपयुक्त साईट्स आहेत. मी त्यांच्याकडे स्पर्धेच्या नजरेनं बघत नाही, उलट त्या पुढे माझ्यासाठी विक्रीचा माध्यम ठरणार आहेत. इतर सेल्फ ब्रँड असलेल्या साईट्सनी ‘सेक्सी’, ‘फंकी’ आणि ‘लो कॉस्ट’ मॉडेलवर लक्ष केंद्रीत केलंय. बटरकपनं स्पष्टपणे दर्जा, अनुभव आणि वेगवेगळ्या वयोगटातल्या जागृत ग्राहकांपर्यंत जाण्यावर लक्ष केंद्रीत केलंय. हेच माझं सर्वात मोठं आणि खरंखुरं भांडवल आहे.

या क्षेत्रात कार्यरत असलेल्या फंडेड उद्योजकांमध्ये व्यवसातलं ज्ञान आणि अनुभवानं मी वरचढ आहे. मी भारतातली एकमेव ब्रा फिटर आहे आणि आतापर्यंत ३००० महिलांना मी ही सेवा पुरवली आहे. या अनुभवामुळं आणि अभ्यासामुळं मी इतर कुणापेक्षाही अधिक दर्जेदार उत्पादन आणि त्या उत्पादनाच्या वापराचा अधिक चांगला अनुभव मी ग्राहकाला देऊ शकते. इतरांकडे हे असणं अशक्य आहे.


वायएस – तुमची नवीन मोहीम काय आहे ? तुम्ही क्राऊड सोर्सिंग मॉडेल का निवडले?


अर्पिता – शेवटी भारतातल्या स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट ब्रा उपलब्ध होण्यासाठी मी माझा पुर्वीचा सगळा अनुभव, बॅकएंड एकत्र केलं आहे. भारतीय महिलांना मला ज्या प्रकारचे फिटिंग ब्रा द्यायचे होते त्या फिंटिंगचा अर्थ बरोबर जाणणारा डिझायनर शोधायला मला वर्षाचा कालावधी लागला. मला नेमकं काय अपेक्षित आहे हे जाणून त्यानुसार मटेरियल आणि नवनवीन डिझाईन्स देऊन हॅमबर्ग, जर्मनीचा एक डिझायनर मला सापडला. आणि मला हवा तसं दर्जेदार उत्पादन तयार करून देणारा कारखानदार निर्माता मला हाँगकाँगला भेटला.

हे सगळं मिळवण्यासाठी मी माझे सगळे स्त्रोत, साधनं वापरली. या क्षणाला मला दोन गोष्टांची गरज आहे; एक म्हणजे ब्राचा बटरकप हा ब्रँड लाँच करण्यासाठी पुरेसा पैसा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जे उत्पादन देणार आहे त्यावर विश्वास ठेऊन ते स्वीकारणारा ग्राहक. ही मोहीम म्हणजे या दोन महत्त्वाच्या गोष्टी साकार करण्याचा एक अभ्यास, सराव आहे. आणि मला खूपच छान प्रतिसाद मिळाला याचा मला खूप खूप आनंद आहे. तुम्हाला मदत मिळवायची असेल तर आधी स्वत:ला मदत करावी लागते. म्हणूनच मी क्राऊड सोर्सिंगचा पर्याय निवडला. 

भारतामध्ये गुंतवणूकदार खूप सावधपणे पावलं उचलतात. व्यवसायात धोके काय आहेत यावर त्यांचं बारीक लक्ष असतं, शिवाय ते नव्या व्यवसायातली विश्वासार्हता काय आहे याबाबत सजग असतात. या पार्श्वभूमीचा विचार करता भारतात आपलं नवं जग घडवताना धडपडणा-या उद्योजकांना पैसा उभारण्यासाठी स्वत:ची नवीन इको सिस्टम तयार करावी लागते. अधिकाधिक उद्योजकांनी पैसा उभारण्यासाठी लोकांच्या माध्यामाचा म्हणजेच क्राऊड फंडींगचा मार्ग चोखाळला पाहिजे.

यामुळे अद्याप लाँच न झालेली उत्पादने किंवा सेवा विकत घेण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्राहकांशी बोलण्याचा खूप फायदा होतो. यामुळं बाजारात आपल्या उत्पादनाला मागणी आहे हे आपल्याला कळतं.


वायएस – अर्पिता हे रसायन नेमकं काय आहे ते आम्हाला सांगा.


अर्पिता – सुप्रसिद्ध लेखिका अनी रँडच्या अटलास श्रग्ड या कादंबरीतली मी डॅग्नी टॅगार्ट आहे. हे जग सामान्य व्यक्तीवर कसं प्रेम करतं, आणि बुद्धीमान व्यक्तीला पुढे जाऊ न देता तिचं कसं खच्चीकरण करतं याबाबतच्या तिच्या तत्त्वज्ञानावर माझा विश्वास आहे. वास्तविक जगातल्या निराशेवर आपण कशी मात केली याबाबत तिची पुस्तकं आहेत. मी सुद्धा एक अत्यंत व्यवहारी आणि पॅशनेट व्यक्ती आहे. मी कोणतीही गोष्ट सहज सोडून देत नाही. इतर लोकांप्रमाणे काही गोष्टी मी सोडून देण्याच्या शेवटच्या स्थितीत आले सुद्धा, पण मी स्वत:ला सावरलं आणि जे करायचय त्यावर त्वेषानं तुटून पडली आहे.

मी जे हाती घेते ते सोडून देणं मला माहीत नाही. मी जे काही आहे त्याचा हा अविभाज्य असा भाग आहे. बटरकप्स असो, लोक असोत किंवा मग अँग्री बर्ड्सचा खेळ असो, मी कधीही सोडून देत नाही. हाच माझ्यातला सर्वोत्तम आणि वाईट गूण आहे. माझ्या मुलीला सुंदर जगात सुंदरच जगता आलं पाहिजे असं जग मी तिच्यासाठी तयार केलं पाहिजे. आणि मला वाटतं की निराशा हा प्रकार भूतकाळाशी संबंधीत आहे. वर्तमान आणि भविष्याशी नाही. मी कधीही अकार्यक्षमता सहन करू शकणार नाही.

वय आणि अनुभव या दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत आणि ही विशेष अशी गोष्ट आहे. आदर करणं अपेक्षित आहे म्हणून मी आदर करत नाही, तर मला तो करायचा आहे म्हणून मी करते. काळजी घेणं योग्य गोष्ट आहे म्हणून मी काळजी घेत नाही, तर काळजी घेणं ही माझी स्वत:ची गरज आहे. मला जगावं लागतं म्हणून मी जगत नाही, तर मला जगायचं आहे म्हणून मी जगते. माझं स्पप्न आहे की मी एक दिवस हे संपूर्ण जग फिरेन. नव्या अनुभवाच्या आणि अधिकाधिक विलक्षण अशा लोकांना भेटत रहावं अशी माझी आकांक्षा आहे, आणि या आशेवर मी जगते आहे. 

अर्पिताच्या दृष्टीवर आणि तिच्या लोकोपयोगी हेतूवर आपली आस्था, आपले प्रेम व्य़क्त करण्यासाठी www.fundbuttercups.in इथं सहभागी व्हा.