विजीगिषू वृत्तीचा मुर्तीमंत आलेख, ४६६६४, ‘मदिबा’ ; अर्थात ‘सर नेल्सन मंडेला’ यांच्या स्मृतीदिनी अभिवादन!

0


‘मी कितीवेळा खाली पडलो यावर माझे मुल्यमापन करु नका, मुल्यमापन करायचेच असेल तर यावर करा की पडल्यांनतरही मी कितीवेळा पुन्हा उभा राहिलो आहे’, हे उद्गार आहेत वर्णभेदाच्या लढ्यात आपले सारे जीवन झोकून देत काम करणारे नेल्सन मंडेला ऊर्फ ‘मदिबा’ यांचे. आज त्यांचा तिसरा स्मृतीदिन. ५ डिसेंबर २०१३मध्ये त्यांचे निधन झाले.

जोहान्सबर्ग येथे वकीली करताना त्यांनी वर्णभेदाविरुध्द लढा उभा केला, त्यानंतर अस्पृश्यांविरुध्दच्या कायद्याच्या विरोधात आंदोलने केली. त्यावेळी शार्पविले शहरात पोलिसांच्या गोळीबारात १८०जण शहीद झाले होते. मंडेला त्यानंतर भूमिगत झाले. मात्र त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अभियान सुरू ठेवले, त्यांनतर त्यांना कैद करण्यात आले.

फोटो सौजन्य : अहमद कथरडा फाउंडेशन
फोटो सौजन्य : अहमद कथरडा फाउंडेशन

तुरुंगात असताना त्यांच्या आईचे निधन झाले, रस्ते अपघातामध्ये मुलगा मृत्य़ू पावला, मात्र त्यांना त्यांच्या अंतिम संस्कारासाठी देखील जावू देण्यात आले नाही. सुमारे १८ वर्षे त्यांनी रोबन बेटांवर शिक्षा भोगली.

त्यांच्या मुक्तिसाठी आंतरराष्ट्रीयस्तरावर अभियान घेण्यात आले, त्यामुळे ८०च्या दशकात त्यांच्यावरील निर्बंध दूर करत त्यांना मुक्त करण्यात आले. १९९४मध्ये देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्यात ते दक्षिण आफ्रिकेचे पहिले राष्ट्रपती झाले.

तुरुंगात असताना मदिबा यांचा कैदी क्रमांक ४६६६४ असा होता. त्यांच्या कार्यकाळात देशातील बंद पडत जाणा-या कापड उद्योगाला नव संजिवनी देण्यासाठी ‘४६६६४ऍप्रल’ असे नाव देण्यात आले, त्यातून हे अभियान त्यांना समर्पित करण्यात आले. २००२ मध्ये एक संघटना तयार करण्यात आली त्या संघटनेलाही ४६६६४असे नाव देण्यात आले. त्यातून एचआयव्ही एडसबाबत तरुणांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मंडेला चांगले बॉक्सर होते, १९९८ मध्ये एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की, ‘मला याबाबत नेहमीच खंत वाटत राहिल की मी हेवीवेट गटात मुक्केबाजीचे सुवर्णपदक मिळवू शकलो नाही’. ते म्हणाले होते की, “तुम्हाला ते तोवर अशक्य असते जोवर ते करून दाखवत नाही.”