जीएसटीमुळे बाजारात संभ्रम, पहा काय होणार स्वस्त – महाग!

जीएसटीमुळे बाजारात संभ्रम, पहा काय होणार स्वस्त – महाग!

Friday June 16, 2017,

4 min Read

या ठिकाणी जाणून घेवूया की वस्तू आणि सेवा कर कायदा लागू झाल्यावर काय होणार आहे स्वस्त आणि काय महाग!

संपूर्ण देशात एक जुलै २०१७पासून लागू हौणा-या जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कायद्याबाबत सध्या विश्वासाने सांगितले जाते की, हा कायदा लागू झाल्यावर महागाईतून लोकांची सुटका होणार आहे. फार मोठ्या करांच्या जाळ्यातून व्यापारी आणि करदाते यांना मुक्ती मिळेल. त्यामुळे उद्योग जगताने देखील वस्तू सेवा कर परिषदेच्या या नव्या करप्रणाली लागू करण्याच्या निर्णयाचे स्वागतच केले आहे, तर जाणून घेवूया की पुढच्या महिन्यापासुन काय स्वस्त होणार आणि काय महाग.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वस्तू आणि सेवा कायदा लागू झाल्यावर बाजारातील जग कायमचे बदलून जाणार आहे, त्यामुळे दैनंदिन जीवनावर देखील मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.


image


दरम्यान केंद्रीय महसूल सचिव हसमुख आधीया यानी म्हटले आहे की, “ जीएस टी कायद्यांतर्गत बँकाना वेगेवगळ्या राज्यात वेगळी नोंदणी करून घ्यावी लागेल, त्याना अन्य पर्याय नसेल. यातील अडचणी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू.”

“ जीएस टी लागू होण्यापूर्वी काही आठवडे आधी सरकारने महत्वाचा निर्णय घेत वस्तूंच्या करात कपात केली, जे पूर्वी अपेक्षेपेक्षा जास्त होते, खरेतर वेगवेगळ्या उद्योजकांच्या मागणी नुसार केंद्र आणि राज्यांच्या शक्तिप्रदत्त समितीने सहासष्ट प्रकारच्या वस्तूंवर पूर्वीच संशोधन करून त्यांचे भाव कमीच ठेवण्याचे ठरविले आहे. वस्तू आणि सेवा करात चार स्तरांवर ५,१२,१८,२८ टक्के असे दर ठरविण्यात आले आहेत. उद्योग जगताने जीएसटी परिषदेच्या या निर्णयाचे स्वागत केला आहे. कारण यातून लहान आणि मध्यम उद्योगांचे संरक्षण होणार आहे.”

एक मोठे नुकसानकारक हे होणार आहे की, औषधांचा सध्याचा स्टॉक संपविण्याची गडबड करणा-या स्टॉकिस्टांच्या वखारी खाली पडत चालल्या आहेत. त्यांच्या जवळ केवळ काही दिवसांपूरतीच औषधे आहेत, त्यामुळे एक जुलै रोजी ही प्रणाली लागू झाल्यास देशात औषधांची मोठी टंचाई होवू शकते.औषध व्यापारातील जाणकार चिंता व्यक्त करतात की, त्यांच्या मार्जीनवर याचा परिणाम होणार आहे, त्यामुळे स्टॉकीस्ट कमी प्रमाणात माल घेत आहेत.

दुसरीकडे किरकोळ व्यापा-यांचे सर्वात मोठे संघटन कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स( कँट) ने म्हटले आहे की, “ या साठी व्यापा-यांची अदयाप पूर्ण तयारी झाली नाही, जे मोठे आव्हान आहे. जीएसटी हे तंत्रज्ञानावर आधारीत करप्रणाली असल्याने, त्यात कोणत्याही प्रकारे काही कागदी व्यवहार नसतील. जीएसटीच्या अनेक तरतूदी आहेत ज्यात, विशेषत: जीएसटीचे तत्व, देयक, इनपूट क्रेडीट, प्रत्येक व्यापा-याचे मुल्यांकन, वस्तू सोबत सेवांची जोडणी हे सारे नवे विषय असतील, जे सध्याच्या करप्रणाली पेक्षा पूर्णत: वेगळे आहेत. चिंता हीच आहे की सुमारे ६० टक्के व्यापारी अजूनही संगणक वापरत नाहीत.

जीएसटीमुळे सामान्य लोकांमध्ये सर्वात जास्त खळबळ माजविणारा प्रश्न हाच आहे की, सामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे? काय महाग आणि काय स्वस्त होणार? या एक नजर त्या वस्तूंवर टाकूया ज्या स्वस्त किंवा महागणार आहेत.

जीएसटी परिषदेने धान्याला जीएसटीच्या कक्षेबाहेर केले आहे, म्हणजे त्यावर काहीच कर लागणार नाहीत. मांस, दूध दही,ताज्या भाज्या, मध, गुळ, प्रसाद, कुंकू, बिंदी, आणि पापड देखील जीएसटी करातून मुक्त असतील. त्यामुळे या वस्तू स्वस्त होतील. देशाच्या बहुतांश भागात सोन्याचे भाव वाढतील, कारण सोने आणि दागिने यावर तीन टक्के कर लागणार आहे. तर शंभर रूपयांपर्यंतच्या कपड्यांवर पाच टक्के कर लागणार आहे.

सध्या पाचशे रूपयांच्या बुटांवर ४८ रूपये कर लागतो, जीएसटी लागू झाल्यावर त्यात केवळ २५ रूपये कर द्यावा लागेल. बिस्कीटावर करांचा स्तर १८ टक्केपर्यंत वाढविला आहे. साखर,खाद्य तेल, साधा चहा, कॉफी याच्या पाच टक्के कर लागेल सध्या तो चार ते सहा टक्के आहे.

जीएसटी लागू झाल्यावर कोळसा स्वस्त होणार आहे, त्यामुळे विजेचे उत्पादन स्वस्तात होणार आहे. प्रक्रिया केलेल्या अन्नावर, कन्फेक्शनरी उत्पादने, आणि आईसक्रिमवर १८ टक्के कर असेल, जो पूर्वी २२टक्के होता. म्हणजे शंभर रूपयांच्या आइस्क्रिमला पूर्वी जो बावीस टक्के कर लागत होता तो आता १८ रूपये झाला आहे. केसांचे शाम्पू, परफ्यूम्स, मेकअपचे सामान यावर २८ टक्के कर द्यवा लेगेल जो पूर्वी बावीस टक्के होता, म्हणजे ब्युटी पार्लर महागणार आहे!

मोटार सायकली मात्र स्वस्त होवू शकतात, त्यावरिल करात एक टक्के कपात झाली असून तो २८ टक्के असेल, ईकॉनॉमी क्लासच्या विमान प्रवासासाठी स्वस्तात तर बिझनेस क्लासमध्ये महागडा विमान प्रवास होणार आहे. स्मार्टफोन स्वस्त होणार आहे. उबेर आणि ओलाच्या टॅक्सी बुकींग स्वस्त होतील. टेलीकॉम सेवा महाग होतील. यावर कर १५ टक्क्यावरून वाढून १८ टक्के होणार आहे, हॉटेलमध्ये जेवण देखील महाग होणार आहे, जीएसटी मध्ये याला चार स्तरात विभागण्यात आले आहे, विना वातानुकूलीत, दारू परवाना आणि एसीवाले रेस्तरॉ आणि लग्झरी रेस्तरॉ. जीएसटीमध्ये छोट्या कारचा खर्च वाढेल, आणि त्याचा भार ग्राहकांवर पडेल, रेल्वेत जनरल बोगी, शयनयान,आणि साध्या बसमधून प्रवास करताना आता देखील कोणताही कर नसेल. टूर आणि ट्रँव्हल्स काही प्रमाणात महागेल, आरामदायी बेडचे सामान स्वस्त होणार आहे, बहुतांश राज्यात मोबाइल हँन्डसेटवर करात चार ते पाच टक्के वाढ केली जाणार आहे.