या करोडपतीला भेटा, ज्याने केवळ दोन दिवसांत ६१०० कोटी रूपयांची कमाई केली!

1

एकूण मुल्य २.३ कोटी डॉलर्स असलेल्या राधाकृष्ण दमानी यांचे नाव सध्या शेअर बाजारात चर्चेत आले आहे. त्यांच्या अथक प्रयत्ना नंतर,अलिकडेच त्यांना हे यश संपादन करता आले. अव्हेन्यू सूपर मार्केट च्या समभागांनी २.५ वेळा शिखर गाठले जेव्हा त्यांनी शेअर बाजाराच्या यादीत प्रवेश केला. त्यामुळे दमानी आणि त्यांचे कुटूंबिय ६१००कोटी रूपयांनी श्रीमंत झाले आहेत. 


चालू वर्षीच्या मार्च २१रोजी या उद्योगाचा यादीत ११४वा क्रमांक होता. त्यावेळी दर्शनी मुल्य २९९ रूपयांचे समभाग होते, आणि शुक्रवार पर्यंत केवळ दोन दिवसांच्या शेअर बाजारातील व्यवहारात त्यांनी १९ टक्के वाढ नोंदवून मोठी मजल गाठली आहे, असे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे. मुंबई शेअर बाजार बीएसई ७५०.५० ला बंद झाला. त्यावेळी हा समभाग १८.८२ ची वाढ नोंदवत या टप्प्यावर पोहोचला होता. जो बुधवारी ६३१.६०वर होता.

शुक्रवारी, ब्लुमबर्ग बिलीयोनर इंडेक्स मध्ये दमानी जे २०वे श्रीमंत भारतीय आहेत यांचे नाव ४.१० कोटी डॉलर्स सह झळकले होते. जे जगातील ५०० कोट्याधाशांमध्ये एक आहेत. कोट्याधिश गुंतवणूकदार राकेश झुनझूनवाला यांचे ते गुरू देखील आहेत. त्यांच्याच देखरेखीखाली डी-मार्ट, जे भारतातील मोठ्या किराणा आणि ग्रोसरी वस्तूचे किरकोळ थोक विक्रेते आहेत, महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश,तेलंगणा,गुजरात,मध्यप्रदेश,छत्तीसगढ, राजस्थान, एनसीआर आणि कर्नाटकात ११८ आऊटलेटस चालवितात.

बुधवार ते शुक्रवार या दरम्यान बीएसईचा बेंचमार्क सेन्सेक्स ०.९ टक्के घसरून २९,९७४ वरून २९७०७ वर आला होता. असे वृत्तात म्हटले आहे. मात्र दमानी यांच्या पत्नी आणि बंधूंच्या अव्हेन्यू सुपर मार्केटच्या समाभागात ८२.२ टक्के वाढ होवून त्याने मोठी कमाई केली होती.

नेहमी ज्यांचा उल्लेख भारताचे सॅम वॉल्टन म्हणून केला जातो त्या राधाकृष्ण दमानी हे स्वत:च्या मेहनतीने कोट्याधीश झाले आहेत. अव्हेन्यू सूपर मार्केट ने ३.२ दशलक्ष रूपयांची उलाढाल चालू अर्थिक वर्षात केली आहे. डी-मार्ट या ब्रँण्ड नावाने त्यानी सूपर मार्केट आणि हायपर मार्केट सुरू केले आहे. आणि तो सर्वात फायद्यात आणि मोठ्या प्रमाणात चालणारा ब्रँण्ड झाला आहे. जो भारतात रोजच्या जीवनातील वस्तू विकणारा पंधरा वर्षातील सर्वात मोठा ठरला आहे.